प्रसिद्ध अभिनेत्रीच्या बहिणीने एक्स-बॉयफ्रेंडला जिवंत जाळलं, म्हणाली, ‘गेल्या 20 वर्षांपासून ती…’
Nargis Fakhri Sister Aliya Fakhri: 'गेल्या 20 वर्षांपासून ती...', प्रसिद्ध अभिनेत्रीच्या बहिणीने एक्स-बॉयफ्रेंडला जीवेमारण्याची धमकी देत जिवंत जाळलं..., सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेत्रीच्या बहिणीच्या कृत्याची चर्चा...
Nargis Fakhri Sister Aliya Fakhri: झगमगत्या विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. ‘रॉकस्टार’ फेम अभिनेत्री नरगिस फाखरी हिची बहीण आलिया फाखरी हिने एक्स-बॉयफ्रेंडला जिवंत जाळलं आहे. आलिया कुटुंबापासून दूर न्यूयॉर्क येथे राहात होती. बहिणीवर होत असलेल्या गंभीर आरोपांवर अद्याप नरगिस हिने अधिकृत घोषणा केली नाही. पण नरगिस आणि आलिया गेल्या 20 वर्षांपासून एकमेकींच्या संपर्कात नाहीत. याप्रकरणी आलिया फाखरी हिला अटक करण्यात आली आहे. यावर पोलीस अधिक चौकशी करत आहेत.
सांगायचं झालं तर, 2 डिसेंबर रोजी आलिया हिचा एक्स-बॉयफ्रेंड एडवर्ड जॅकब्स गॅरेजमध्ये त्याची मैत्रीण अनास्तासिया एटिएन सोबत होता. तेव्हा आलिया त्याठिकाणी आली धमकी देत म्हणाली, ‘आज तुम्ही सगळे मरणार आहात…’ धमकी देत असताना एका शेजाऱ्याने पाहिलं होतं. शेजारच्या व्यक्तीने कोर्टात सांगितलं, धमकी दिल्यानंतर आलियाने गॅरेजला आग लावली.
View this post on Instagram
आलिया फाखरी हिच्यावर फर्स्ट डिग्रीमध्ये हत्येचे चार आणि सेकंड डिग्रीमध्ये चार गुन्हे दाखल आहेत. तिच्यावर ग्रँड ज्युरीने जाळपोळ केल्याचा आरोपही केला आहे. आरोपात ती दोषी आढळल्यास तिला जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते, असे वकिलाने सांगितले. आलिया फाखरी सध्या पोलिस कोठडीत असून तिला 9 डिसेंबर रोजी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
आलियाला ड्रग्ज आहे व्यसन
आई – वडील विभक्त झाल्यानंतर काही दिवसांनंतर नरगिस आणि आलिया यांच्या वडिलांचं निधन झालं. आलियावर नुकताच झालेल्या आरोपांबद्दल तिच्या आईला विचारण्यात आलं आहे. आलियाच्या आई म्हणाल्या, ‘विश्वास बसत नाहीये आलियाने कोणाची हत्या केली आहे. आलिया अशी बिलकूल नव्हती. ती कायम सर्वांची काळजी घ्यायची… सर्वांचा मदत करायची…’, त्यांनी खुलासा केला की आलियाला काही काळापासून दातांच्या समस्येनं ग्रासलं होतं. त्यानंतर तिला ओपिओइड्सचं (ड्रग्ज) व्यसन लागले होते.
नरगिस फाखरी
नरगिस फाखरी हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, ‘रॉकस्टार’ सिनेमामुळे नरगिस हिच्या प्रसिद्धी आणि लोकप्रियतेत मोठी वाढ झाली. पण नगरिस हिला बॉलिवूडमध्ये स्वतःचं स्थान भक्कम करता आलं नाही. पण सोशल मीडियावर नरगिस कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर नरगिस हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.