“जणू आम्ही इथे न्यूड आहोत”; डेटिंग लाइफबद्दल प्रश्न विचारल्यावर अभिनेत्री असं का म्हणाली?

"मी कोणाला डेट करतेय याने तुम्हाला.."; 'रॉकस्टार' फेम अभिनेत्री भडकली

जणू आम्ही इथे न्यूड आहोत; डेटिंग लाइफबद्दल प्रश्न विचारल्यावर अभिनेत्री असं का म्हणाली?
Nargis FakhriImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Dec 11, 2022 | 9:33 AM

मुंबई: रणबीर कपूरच्या ‘रॉकस्टार’ या चित्रपटात भूमिका साकारून प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री नरगिस फाख्री सध्या तिच्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत नरगिसला तिच्या खासगी आयुष्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर तिने दिलेलं उत्तर सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. “मला माझं खासगी आयुष्य खासगीच ठेवायचं आहे. सोशल मीडियामुळे आता सेलिब्रिटींचं आयुष्य खुल्या पुस्तकाप्रमाणे झालंय. मला असं वाटतं, आम्ही सर्वजण इथे न्यूड आहोत”, असं ती म्हणाली.

इम्तियाज अली दिग्दर्शित रॉकस्टार या चित्रपटात नरगिसने रणबीर कपूरसोबत भूमिका साकारली होती. त्यानंतर ती मद्रास कॅफे, फटा पोस्टर निकला हिरो, मै तेरा हिरो यांसारख्या चित्रपटांमध्ये झळकली. मध्यंतरीच्या काळात ती अभिनेता आणि निर्माता उदय चोप्राला डेट करत असल्याची चर्चा होती. त्याच्यासोबत ब्रेकअप झाल्यानंतर अमेरिकेतील एका उद्योजकासोबत तिचं नाव जोडलं गेलं.

हे सुद्धा वाचा

याच डेटिंग लाइफविषयी तिला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत बोलताना नरगिस म्हणाली, “मी प्रामाणिक आणि कुठलाही दिखावा न करणारी व्यक्ती आहे. लोकांनी माझ्या खासगी आयुष्याबद्दल प्रश्न विचारण्याला माझा आक्षेप नाही. पण कामाव्यतिरिक्त फक्त त्यावरच लक्ष केंद्रीत केलं जातं, याचं मला वाईट वाटतं.”

“माझ्या खासगी आयुष्याबद्दल बोलण्यासाठी मी लाजत नाही. पण प्रामाणिकपणे बोलायचं झाल्यास, मला माझ्या कामाबद्दल बोलायचा अधिक आवडेल. असे काही लोक आहेत ज्यांना त्यांच्या डेटिंग लाइफबद्दल बोलायला आवडत नाही आणि त्यात काहीच वाईटन नाही. आपण दुसऱ्यांच्या प्रायव्हसीचा आदर केला पाहिजे. हा बिझनेसच खूप विचित्र आहे”, असं ती पुढे म्हणाली.

खासगी आयुष्याबद्दल बोलताना नरगिसने सोशल मीडियावरही निशाणा साधला. “आता आपल्या फोनलाही माहीत असतं की आपण काय विचार करतोय. आपण काय शोधतोय, काय पाहतोय हे सर्व सोशल मीडियालाही माहीत असतं. प्रायव्हसी या शब्दाचा अर्थच इंटरनेटने बिघडवून टाकला आहे. आपण इथे जणू न्यूडच आहोत असं वाटतं. मी कोणाला डेट करतेय, याचा विचार लोक का करतात, या विचाराने मला कधीकधी चिड येते”, अशा शब्दांत ती व्यक्त झाली.

2020 मध्ये नरगिस ‘तोरबाज’ या चित्रपटात झळकली. हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला होता. यामध्ये संजय दत्त, राहुल देव, राहुल मित्रा यांच्या भूमिका होत्या.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.