नसिरुद्दीन आणि रत्ना यांची विलक्षण लव्हस्टोरी; दोघांच्या लव्हस्टोरीची सुरुवात म्हणजे…

‘संभोग से सन्यास’ पासून नसिरुद्दीन आणि रत्ना यांच्या लव्हस्टोरीला सुरूवात; विवाहित असतानाही रत्ना यांच्या प्रेमात शाह... घटस्फोटानंतर याठिकाणी झालं लग्न...

नसिरुद्दीन आणि रत्ना यांची विलक्षण लव्हस्टोरी; दोघांच्या लव्हस्टोरीची सुरुवात म्हणजे...
Follow us
| Updated on: Mar 08, 2023 | 5:21 PM

Naseeruddin Shah Love Story : बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांनी आपल्या दमदार अभिनयाने लाखो प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. फक्त अभिनयच नाही तर शाह त्यांच्या स्पष्ट भूमिकेमुळे देखील कायम चर्चेत असतात. आताच्या घडीला अभिनय आणि स्पष्ट भूमिकांमुळे चर्चेत असलेले शाह एकेकाळी त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत होते. सिनेमांमध्ये उत्तम अभिनय करत चाहत्यांच्या मनात घर करणाऱ्या नसीरुद्दीन शाह याचं आयुष्य देखील एका सिनेमाच्या कथेपेक्षा कमी नाही. आजही शाह त्यांच्या लव्हलाईफमुळे कायम चर्चेत असतात.

वयाच्या 19 व्या वर्षीच नसिर त्यांच्या कुटुंबापासून दुरावले. अशात AMU मध्ये शिकणाऱ्या एका मेडिकलच्या विद्यार्थीनीशी त्यांनी लग्न केल्याची माहिती समोर आली. 1 नोव्हेंबर 1969 दोघांचं लग्न झालं अशी माहिती समोर आली. पण पत्नीसोबत शाह याचं नातं अधिक काळ टिकलं नाही. अखेर 1975 मध्ये रत्ना नसिर यांच्या आयुष्यात आल्या.

हे सुद्धा वाचा

नसीरुद्दीन शाह चर्चेत आले जेव्हा त्यांनी अभिनेत्री रत्ना पाठक यांच्यासोबत शाह यांचं नाव जोडण्यात आलं. रत्ना आणि शाह यांच्यातील नातं दिवसागणिक घट्ट होत होतं. सत्यदेव दुबे यांच्या ‘संभोग से संन्यास’ या नाटकापासून दोघांच्या लव्हस्टोरीची सुरुवात झाली. तेव्हा एका मुलाखतीत रत्ना म्हणाल्या, ‘आमच्या नात्यातील अजब गोष्ट म्हणजे पहिल्या दिवशी आम्ही खास मित्र देखील झालो नव्हतो आण दुसऱ्या दिवसापासून आम्ही एकमेकांना भेटायला सुरुवात केली..’

पहिल्या पत्नीपासून शाह विभक्त झाले होते, पण त्यांचं घटस्फोट झाला नव्हता. त्यामुळे रत्ना आणि शाह लग्न करू शकत नव्हते.अखेर त्यांनी लिव्हइन रिलेशनशिपमध्ये राहण्याचा निर्णय घेतला. पण घटस्फोट झाल्यानंतर रत्ना आणि नसीरुद्दीन शाह यांनी लग्न केलं.

1 एप्रिल 1982 मध्ये त्यांनी रत्ना यांच्या आईच्याच निवासस्थानी लग्नगाठ बांधत रत्ना पाठक आणि नसीरुद्दीन शाह नव्या आयुष्याची सुरुवात केली. या लग्नसोहळ्यात रत्ना आणि शाह यांचे आई – वडील यांच्यासह खास मित्र इतक्याच मंडळींची निमंत्रण देण्यात आलं होतं.

आज रत्ना पाठक आणि नसीरुद्दीन शाह, इमाद शाह आणि विवान शाह या दोन मुलांचे पालक आहेत. यापैकी विवान हा अभिनेता आहे जो काही सिनेमे आणि वेब सीरिजमध्ये झळकला आहे

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.