AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO: शांत रहाणं म्हणजे अन्याय करणाऱ्याला साथ देणं, नसीरुद्दीन शाह यांची मोदी सरकारवर टीका

अभिनेते नसीरुद्दीन शाह यांनी शेतकरी आंदोलनावर शांत राहून कोणतीही भूमिका न घेणाऱ्या बॉलिवूडच्या दिग्गजांना चांगलंच सुनावलं आहे.

VIDEO: शांत रहाणं म्हणजे अन्याय करणाऱ्याला साथ देणं, नसीरुद्दीन शाह यांची मोदी सरकारवर टीका
Follow us
| Updated on: Feb 08, 2021 | 5:47 PM

मुंबई : ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. यावेळी देखील त्यांनी शेतकरी आंदोलनावर आपली रोखठोक भूमिका व्यक्त केली आहे. तसेच शेतकरी आंदोलनावर शांत राहून कोणतीही भूमिका न घेणाऱ्या बॉलिवूडच्या दिग्गजांना त्यांनी चांगलंच सुनावलं आहे. “शांत रहाणं म्हणजे अन्याय करणाऱ्याला साथ देणं आहे. बॉलिवूडमधील अनेकांना शेतकऱ्यांना पाठिंबा दिल्यास आपलं खूप मोठं नुकसान होईल, अशी भीती वाटतेय, पण त्यांनी आधीच आपल्या 7 पीढ्या बसून खातील इतकं कमावलं आहे. त्यामुळे त्यांनी भूमिका घ्यावी,” असं मत व्यक्त केलंय. त्यांनी एक व्हिडीओ ट्विट करत यात आपलं म्हणणं माडंलं आहे (Naseeruddin Shah support Farmer Protest criticize Bollywood for not supporting).

नसीरुद्दीन शाह म्हणाले, “हजारो शेतकरी भाऊ बहिणी, वयोवृद्ध शेतकरी, लहान मुलं दिल्लीच्या गोठवणाऱ्या थंडीत या सरकारकडे आपला हक्का मागत आहेत. शेतकरी मोठ्या संख्येने एकत्रित येऊन न्याय मागत आहेत. या सर्वांना माझा सलाम. या देशाचे सत्ताधारी शेतकऱ्यांसोबत बिघडलेल्या आई-बापासारखं वर्तन करत आहेत. हे आई-बाप आपल्या मुलाने काही मागणी केल्यास तुला काहीच माहिती नाही असं उत्तर देतात. तुझ्यासाठी काय चांगलं आहे हे तुझ्यापेक्षा आम्हाला जास्त कळतं, असंही ते सांगतात.”

“मला वाटतं जो शेतकरी आपल्या हातांनी जमिनीत नांगरणी करतो, तो मोठ्या कष्टाने आणि प्रेमाने बियाणं पेरतो. हा शेतकरी या जमिनीची मशागत करतो आणि त्यात आपल्या मुलाप्रमाणे त्या पिकाची काळजी घेतो, त्याचं पालनपोषण करुन वाढवतो. त्या शेतकऱ्याला काय हवं हे त्याच्यापेक्षा जास्त कुणालाच चांगलं माहिती नाही,” असंही त्यांनी नमूद केलं.

‘सरकार काहीही म्हणो, लाखो लोकांचे आशीर्वाद शेतकऱ्यांसोबत’

नसीरुद्दीन शाह म्हणाले, “हे सरकार हजारवेळा तुम्हाला काही कळत नाही सांगेल, गद्दार, देशद्रोही म्हणेल, पण माझ्यासारखे लाखो लोक आहेत ज्यांचे आशीर्वाद शेतकऱ्यांसोबत आहेत. आमच्यासाठी तुम्ही संयम, हिंमत आणि शक्तीचं उदाहरण आहे. तुमच्यासाठी अल्लामा अकबर या शायरने म्हटलं होतं की “आप है नाझीमें गुल, पास बाने रंग बू, गुलशन पनाह, नाझ परवर, लेहलेहाते खेतों का बादशाह, हमारे अन्नदाता, हमारे परवर हमारे सरफरस्त”. तुम्हाला तुमचं ध्येय जरुन मिळो.”

‘बॉलिवूडमधील दिग्गजांनी 7 पीढ्या बसून खातील इतकं कमावलंय, आता शेतकऱ्यांसाठी बोलावं’

“मला वाटतं हे शेतकऱ्यांचं आंदोलन नक्की वाढेल आणि त्यात सर्वसामान्य लोकही सहभागी होतील. शांत राहणं हे अन्याय करणाऱ्याला साथ देणं आहे. चित्रपटसृष्टीचे मोठमोठे दिग्गज लोक शांत बसलेत. त्यांना भीती आहे की शेतकऱ्यांना पाठिंबा दिल्यास त्यांना मोठं नुकसान होईल. तुम्ही इतकी संपत्ती कमावली आहे की तुमच्या सात पिढ्या बसून खाऊ शकतील,” असंही मत नसीरुद्दीन शाह यांनी व्यक्त केलं.

हेही वाचा :

मला माझ्या मुलांची चिंता वाटते : नसीरुद्दीन शाह

भाजप आणि मित्रपक्षांना मतदान करु नका, 600 कलाकारांचं पत्र लिहून आवाहन

व्हिडीओ पाहा :

Naseeruddin Shah support Farmer Protest criticize Bollywood for not supporting

बीडच्या पोलीस अधिक्षकांच्या घरीच केलं जात होतं गांजाचं सेवन
बीडच्या पोलीस अधिक्षकांच्या घरीच केलं जात होतं गांजाचं सेवन.
महाराष्ट्रात कुठे-कुठे होणार उद्या मॉकड्रिल? बघा तुमचा जिल्हा आहे का?
महाराष्ट्रात कुठे-कुठे होणार उद्या मॉकड्रिल? बघा तुमचा जिल्हा आहे का?.
भारत- पाकिस्तान दोघांनी शांतता राखावी; यूएनएससीचं आवाहन
भारत- पाकिस्तान दोघांनी शांतता राखावी; यूएनएससीचं आवाहन.
भारतात उद्या युद्धाचा सायरन वाजणार, आशियाई देशाचं मॉक ड्रिलकडे लक्ष
भारतात उद्या युद्धाचा सायरन वाजणार, आशियाई देशाचं मॉक ड्रिलकडे लक्ष.
आमच्या हाती काय बंदुका देणार? मॉक ड्रिलवरून राऊतांचा सरकारला खोचक सवाल
आमच्या हाती काय बंदुका देणार? मॉक ड्रिलवरून राऊतांचा सरकारला खोचक सवाल.
देशव्यापी मॉक ड्रिल, आपत्कालीन परिस्थितीत कराल? तज्ज्ञांनी सांगितलं...
देशव्यापी मॉक ड्रिल, आपत्कालीन परिस्थितीत कराल? तज्ज्ञांनी सांगितलं....
भारतासोबत युद्ध झालं तर अवघ्या 100 तासांत पाकिस्तानचे 5 तुकडे, कारण...
भारतासोबत युद्ध झालं तर अवघ्या 100 तासांत पाकिस्तानचे 5 तुकडे, कारण....
चोरीला गेलेलं बाळ सुखरूप आईच्या कुशीत, पोलिसांकडून 48 तासात शोध अन्...
चोरीला गेलेलं बाळ सुखरूप आईच्या कुशीत, पोलिसांकडून 48 तासात शोध अन्....
युद्धाची पूर्व तयारी, गृहमंत्रालयाचे सर्व राज्यांना आदेश; 7 मे रोजी...
युद्धाची पूर्व तयारी, गृहमंत्रालयाचे सर्व राज्यांना आदेश; 7 मे रोजी....
पाक पंतप्रधान गायब, पत्रकाराचा सवाल अन् उपपंतप्रधानांचं उत्तर बघा काय
पाक पंतप्रधान गायब, पत्रकाराचा सवाल अन् उपपंतप्रधानांचं उत्तर बघा काय.