नरेंद्र मोदींना मुस्लिमांच्या जाळीदार टोपीत पहायचंय; नसीरुद्दीन शाह असं का म्हणाले?

ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत लोकसभा निवडणूक निकाल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी मोकळं मत मांडलं. यावेळी त्यांनी मोदींचा जुना किस्सासुद्धा सांगितला. त्याचप्रमाणे त्यांना एका जाळीदार टोपीत पहायचंय, अशी इच्छा व्यक्त केली.

नरेंद्र मोदींना मुस्लिमांच्या जाळीदार टोपीत पहायचंय; नसीरुद्दीन शाह असं का म्हणाले?
याचा अर्थ तुम्ही नरेंद्र मोदींना उल्लू म्हणत आहात का? या पुढच्या प्रश्नावर नसीरुद्दी शाह म्हणाले, मी तसे म्हणालो नाही. मी घुबड म्हणालो.Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jun 13, 2024 | 9:05 AM

नसीरुद्दीन शाह हे बॉलिवूड इंडस्ट्रीतील दमदार अभिनेत्यांपैकी एक आहेत. अभिनयासोबतच ते त्यांच्या बेधडक वकव्यांमुळे नेहमी चर्चेत असतात. विविध मुलाखतींमध्ये ते राजकीय आणि सामाजिक विषयांवर मोकळेपणे व्यक्त होतात. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या निकालावर प्रतिक्रिया दिली. भविष्यात हे कोणत्या गोष्टीचं सूचक आहे, हेसुद्धा त्यांनी सांगितलं. नसीरुद्दीन शाह हे असंही म्हणाले की जर पंतप्रधान नरेंदी मोदी मुस्लिमांना ही गोष्ट समजावू शकले की ते त्यांचा द्वेष करत नाही, तर त्यांना खूप मदत होईल. ही गोष्ट सांगतानाच त्यांनी मोदींच्या जुन्या घटनेची आठवण करून दिली, ज्यावेळी त्यांनी मुस्लिमांची जाळीदार टोपी घालण्यास नकार दिला होता. या गोष्टीला विसरणं कठीण असल्याचं त्यांनी सांगितलं.

‘द वायर’ला दिलेल्या मुलाखतीत नसीरुद्दीन शाह यांना विचारलं गेलं की त्यांना जेव्हा समजलं की भाजपला बहुमत मिळालं नाही, 10 वर्षांमध्ये निवडणुकीत सर्वांत वाईट कामगिरी केली आणि देशात आघाडीचं सरकार येईल, तेव्हा त्यांच्या डोक्यात कोणता विचार आला? त्यावर ते म्हणाले, “सर्वांत आधी तर मला बरं वाटलं. नंतर मी स्वत:ला म्हटलं की ही पराभूत झालेल्यांसाठी, जिंकणाऱ्यांसाठी, हिंदू, मुस्लीम, सरकार आणि आपल्या सर्वांसाठी आत्मपरीक्षणाची वेळ आहे.” या नव्या सरकारकडून तुम्ही कोणत्या बदलाची अपेक्षा करता, असं विचारलं असता ते पुढे म्हणाले, “मोदींना विविध प्रकारच्या हेडगिअर्सचा (डोक्यावर घालणाऱ्या टोप्या) शौक असल्याचं पहायला मिळतं. त्यामुळे मला त्यांना जाळीदार टोपीमध्ये पहायचंय. मला योग्य मुस्लीमसुद्धा पहायचे आहेत. द्वेषाचा प्रचार बंद व्हावा अशी माझी इच्छा आहे. मला अधिकाधिक महिलांना संसदेत पहायचंय. मोदींना अहंकार खूप आहे, ते कधीच या गोष्टीचा स्वीकार करणार नाहीत की जर चुकी केली आहे तर एक हावभाव म्हणून का होईना जाळीदार टोपी घातली पाहिजे.”

हे सुद्धा वाचा

“एका कार्यक्रमात जेव्हा त्यांना काही मौलवींनी जाळीदार टोपी दिली तेव्हा त्यांनी ती घालण्यास नकार दिला होता. या गोष्टीला विसरणं खूप कठीण आहे. मोदींनी ती टोपी घातली असती तर आम्ही वेगळे नाही आहोत, हे ते मुस्लिमांना समजावू शकले असते. त्यांनी जाळीदार टोपी घातली तर त्याचा अर्थ असाच होणार की ते मुस्लीमसुद्धा या देशाचे नागरिक आहेत. ते त्यांचा द्वेष करत नाही, हे ते स्पष्ट करू शकले असते”, असं मत नसीरुद्दीन शाह यांनी मांडलं.

छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.