‘त्या मुलींना…’, सलमान खान यांच्याबद्दल परदेशी अभिनेत्रीचं मोठं वक्यव्य
अभिनेता कायम सलमान खान कायम त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतो, परदेशातील अभिनेत्री भाईजानबद्दल असं काय बोलून गेली, ज्यामुळे सर्वत्र चर्चांना उधाण
मुंबई : अभिनेता सलमान खान कायम त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतो. आतापर्यंत अनेक अभिनेत्रींसोबत अभिनेत्याचं नाव जोडण्यात आलं. पण कोणासोबत देखील भाईजानचं लग्न होवू शकलं नाही. सलमान खान याच्याकडे प्रसिद्ध, पैसा सर्वकाही आहे, पण तरी देखील अभिनेता एकटं आयुष्य जगत आहे. कायम चाहत्यांमध्ये चर्चेत असलेल्या सलमान खान याच्याबद्दल परदेशातील एका अभिनेत्रीने मोठं वक्तव्य केलं आहे. ज्यामुळे अभिनेता पुन्हा चर्चेत आला आहे. सलमानबद्दल मोठं वक्तव्य करणाऱ्या अभिनेत्री नाव नटालिया असं आहे. नटालिया रुस तेथील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.
अभिनेत्री नटालिया लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. नटालिया ‘दिल्लीवाली जालिम गर्लफ्रेंड’ सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. नटालिया हिला बॉलिवूड सिनेमे प्रचंड आवडतात. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री आगामी सिनेमामुळे भारतात होती. दरम्यान नटालियाने अभिनेता सलमान खान याच्याबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. ज्यामुळे ती प्रचंड चर्चेत आली आहे.
रिपोर्टनुसार, सलमान खान याच्याबद्दल अभिनेत्री म्हणाली, ‘मला त्या मुलींबद्दल नाही माहिती ज्यांना सलमान खान याने बॉलिवूडमध्ये ब्रेक दिला आहे. पण त्याच्या सामाजिक कार्याबद्दल मी प्रचंड ऐकलं आहे. सलमान प्रचंड चांगला व्यक्ती आहे आणि मला सलमानसोबत काम करायचं आहे. माझं स्वप्न लवकरच पूर्ण होईल अशी आशा आहे…’ असं देखील अभिनेत्री नटालिया म्हणाली.
फक्त सलमान खानच नाही तर, बॉलिवूडच्या अन्य सेलिब्रिटींबद्दल देखील नयटालियाने मोठं वक्तव्य केलं. ‘मी बॉलिवूडमध्ये वाढली आहे. शाहरुख खान, अमिताभ बच्चन या सेलिब्रिटींवर मी प्रेम केलं आहे. हॅप्पी न्यू ईअर सिनेमा पाहिला आणि दीपिका पादुकोण मला प्रचंड आवडली…’ सध्या नटालिया तिच्या बॉलिवूड पदार्पणामुळे चर्चेत आहे.
अभिनेता सलमान खान याने आतापर्यंत अनेकांना बॉलिवूडमध्ये संधी दिली. बिग बॉसच्या ‘विकेंड का वार’मध्ये सलमान स्पर्धक प्रियंका चौधरी हिला बॉलिवूडमध्ये संधी देणार असल्याची घोषणा केली.