हार्दिकसोबत घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान नताशाने भारत सोडलं? मुलालाही नेलं सोबत

क्रिकेटर हार्दिक पांड्या आणि त्याची पत्नी नताशा स्टँकोविक यांच्यात काही आलबेल नसल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून आहेत. यावर हार्दिक किंवा नताशाने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. आता नताशाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हार्दिकसोबत घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान नताशाने भारत सोडलं? मुलालाही नेलं सोबत
Natasa StankovicImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jul 17, 2024 | 11:18 AM

क्रिकेटर हार्दिक पांड्या आणि मॉडेल नताशा स्टँकोविक यांच्या वैवाहिक आयुष्यात समस्या असल्याच्या चर्चा गेल्या काही महिन्यांपासून आहेत. या चर्चांवर अद्याप हार्दिक किंवा नताशाने कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही. घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान नताशा नुकतीच मुंबई विमानतळावर दिसली. यावेळी तिच्यासोबत तिचा तीन वर्षांचा मुलगा अगस्त्यसुद्धा होता. पापाराझींनी सोशल मीडियावर नताशा आणि अगस्त्यचा हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. नताशा तिच्या मुलासोबत मुंबईबाहेर गेली आहे. आंतरराष्ट्रीय विमानतळावर मायलेक एकत्र दिसल्यानंतर पापाराझींनी त्याचा व्हिडीओ शूट केला. तोच व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला आहे. यावेळी कॅमेऱ्याच्या फ्लॅश लाइट्समुळे अगस्त्य थोडा वैतागलेला दिसला.

नताशा आणि अगस्त्यच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘कदाचित ती कायमची भारत सोडून जात असेल. तिच्या सामानाकडे पाहून हेच वाटतंय’, असं एकाने लिहिलं. तर ‘ही पत्नी आहे, तर 70 टक्के शेअर होल्डर आहे’, असं दुसऱ्याने म्हटलंय. एकीकडे नताशा भारताबाहेर जाताना दिसली तर दुसरीकडे हार्दिकने श्रीलंकेच्या सीरिजमधून माघार घेतली आहे. एका अधिकाऱ्याने हार्दिकच्या या निर्णयाबद्दलच्या चर्चांना दुजोरा दिला. “हार्दिकने एकदिवसीय सामन्यांमधून अत्यंत वैयक्तिक कारणांसाठी ब्रेक घेतला आहे. त्याला फिटनेसची कोणतीही समस्या नाही. सोशल मीडियावर ज्या चर्चा होत आहेत, त्यात तथ्य नाही”, असं त्या अधिकाऱ्याने स्पष्ट केलंय.

हे सुद्धा वाचा

हार्दिक आणि नताशा हे दोघं लॉकडाउनदरम्यान एकमेकांना डेट करू लागले होते. त्यानंतर 31 मे 2020 रोजी त्यांनी लग्न केलं. त्याचवर्षी 30 जुलै रोजी नताशाने मुलाला जन्म दिला. मुलाच्या जन्मानंतर गेल्या वर्षी हार्दिक-नताशाने पुन्हा लग्न केलं. ख्रिश्चन आणि हिंदू विवाहपद्धतीनुसार त्यांनी सर्व विधी केल्या होत्या. नताशाने काही दिवसांपूर्वी अचानक सोशल मीडियावरून हार्दिकसोबतचे लग्नाचे फोटो काढून टाकले होते. तेव्हापासून घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आलं होतं. टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारताच्या विजयानंतरही नताशाने हार्दिकसाठी कोणतीच पोस्ट लिहिली नव्हती. तेव्हासुद्धा नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं होतं. या चर्चांदरम्यान हार्दिक एकटाच अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नात दिसला होता.

सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.
Sadavarte Video: सदावर्तेंचा सुरेश धसांवर टीका, 'हवालदार म्हणून काम..'
Sadavarte Video: सदावर्तेंचा सुरेश धसांवर टीका, 'हवालदार म्हणून काम..'.
Karad Property Video : घरगडी कराड कसा झाला अरबपती? संपत्ती नेमकी किती?
Karad Property Video : घरगडी कराड कसा झाला अरबपती? संपत्ती नेमकी किती?.
Walmik Karad Video : कराडवर मकोका अन्10 मिनिटांत परळी बंदची हाक
Walmik Karad Video : कराडवर मकोका अन्10 मिनिटांत परळी बंदची हाक.
Walmik Karad Video : कराडवर मकोका....हत्येच्या गुन्ह्यात अडकला!
Walmik Karad Video : कराडवर मकोका....हत्येच्या गुन्ह्यात अडकला!.
MSRTC Viral Video : 'मी कसं चढू?', व्हायरल होणाऱ्या एसटीच वास्तव काय?
MSRTC Viral Video : 'मी कसं चढू?', व्हायरल होणाऱ्या एसटीच वास्तव काय?.