हार्दिक पांड्या याच्यासोबतच्या घटस्फोटानंतर असे जगत आहे नताशा आयुष्य, ‘तो’ फोटो शेअर करत तिने अखेर…
भारतीय क्रिकेटर हार्दिक पांड्या याने नताशा स्टॅनकोविक हिच्यासोबत घटस्फोट घेतलाय. दोघांच्या आयुष्यात मोठे वादळ आल्याचे बघायला मिळतंय. गेल्या कित्येक दिवसांपासून यांच्यात वाद सुरू असल्याचे सातत्याने सांगितले जात होते. शेवटी यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत याची घोषणा केलीये.
हार्दिक पांड्या याच्या खासगी आयुष्यात मोठ्या घडामोडी सुरू असल्याचे बघायला मिळतंय. नताशा स्टॅनकोविक हिच्यासोबत हार्दिक पांड्याने घटस्फोट घेतलाय. मुळात म्हणजे गेल्या काही दिवसांपासून सतत यांच्या घटस्फोटाची जोरदार चर्चा ही रंगताना दिसली. मात्र, घटस्फोटावर भाष्य करणे हार्दिक पांड्या आणि नताशा यांनी टाळले. T20 वर्ल्डकप जिंकून आल्यानंतर हार्दिक पांड्याचे घरी खास स्वागत करण्यात आले. मात्र, यावेळी नताशा ही उपस्थित नव्हते. अगस्त्य याच्यासोबतचे खास फोटो हे हार्दिक पांड्याने सोशल मीडियावर शेअर केले होते. भारतीय संघाने T20 वर्ल्डकप जिंकल्यानंतरही एकही पोस्ट नताशा हिने सोशल मीडियावर शेअर केली नव्हती.
मुलगा अगस्त्य याला घेऊन नताशा स्टॅनकोविक हे तिचा देश सर्बियाला पोहोचली. घटस्फोटाची घोषणा करण्याच्या अगोदरच नताशा हिने भारत सोडला. सोशल मीडियावर हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविक यांनी पोस्ट शेअर करत आपण घटस्फोट घेत असल्याचे स्पष्ट केले. मात्र, नताशा स्टॅनकोविक आणि हार्दिक पांड्या यांनी घटस्फोट नेमका का घेतला याबद्दल खुलासा हा होऊ शकला नाहीये.
घटस्फोटानंतरही नताशा स्टॅनकोविक ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय दिसते. सर्बियाला गेल्यानंतर ती सतत फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करताना दिसतंय. घटस्फोटाचे दु:ख विसरण्यासाठी जास्त बिझी राहण्याचा प्रयत्न करताना सतत नताशा स्टॅनकोविक ही दिसत आहे. मुलाचा एक खास व्हिडीओही तिने शेअर केला होता.
आता नताशा स्टॅनकोविक हिने तिचा एक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केलाय. पहिल्या फोटोमध्ये नताशा स्टॅनकोविक ही जिममध्ये दिसत आहे. व्हिडीओमध्ये नताशा ही सायकलिंग करताना दिसत आहे. त्याचा व्हिडीओ तिने शेअर केलाय. सायकलिंग करताना चांगलीच आनंदात नताशा स्टॅनकोविक ही दिसत आहे.
आयुष्यात इतक्या मोठ्या घडामोडी सुरू असताना नताशा स्टॅनकोविक ही स्वत:ला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करताना या व्हिडीओमधून दिसत आहे. अशी एक चर्चा जोरदार रंगताना दिसत आहे की, नताशा स्टॅनकोविक हिने कायमसाठी भारत सोडलाय. नताशा स्टॅनकोविक हिने काही चित्रपटांमध्येही काम केले आहे. हार्दिक पांड्या याला डेट करण्याच्या अगोदर नताशा स्टॅनकोविक ही अली गोनी याच्यासोबत बरीच वर्षे रिलेशनमध्ये होती.