हार्दिक पांड्याला घटस्फोट दिल्यानंतर नताशाने घेतला आणखी एक मोठा निर्णय? लिहिली पोस्ट
लग्नाच्या चार वर्षांनंतर क्रिकेटर हार्दिक पांड्या आणि मॉडेल नताशा स्टँकोविकने घटस्फोट घेतला. घटस्फोटानंतर मुलाला घेऊन नताशा तिच्या मायदेशी म्हणजेच सर्बियाला गेली. तिथून ती विविध फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करतेय. नुकतीच तिने एक पोस्ट लिहिली असून त्यात नवीन नावाचा उल्लेख केला आहे.
क्रिकेटर हार्दिक पांड्याला घटस्फोट दिल्यानंतर मॉडेल नताशा स्टँकोविक ही मुलाला घेईन तिच्या मायदेशी म्हणजेच सर्बियाला निघून गेली. ज्या दिवशी हार्दिक आणि नताशाने सोशल मीडियावर घटस्फोटाची बातमी जाहीर केली, त्याच्या आदल्याच दिवशी नताशा भारत सोडून गेली. त्यानंतर ती तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर सतत फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करतेय. आता नुकत्याच पोस्ट केलेल्या एका फोटोमध्ये तिने नाव बदलण्याचे संकेत दिले आहेत. घटस्फोटाच्या पोस्टमध्ये हार्दिकने लिहिलं होतं, ‘चार वर्षे एकत्र राहिल्यानंतर नताशा आणि मी परस्परसंमतीने विभक्त होण्याचा निर्णय घेत आहोत. आम्ही एकत्र राहण्याचा खूप प्रयत्न केला आणि नात्याला सर्वकाही दिलं. पण आमच्या दोघांच्या भल्यासाठी हाच निर्णय ठीक असेल असं आम्हाला वाटतं.’
नताशाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये सेल्फी पोस्ट केला आहे. त्यावर तिने लिहिलंय, ‘जेव्हा तुम्ही देवाला सर्वकाही समर्पण करता, तेव्हा तुम्हाला एक नवीन नाव मिळतं. तुम्ही स्वत:ला जे समजता ते तुम्ही नाहीत, तर देव जे म्हणतो ते तुम्ही आहात.’ या पोस्टनंतर नताशाने मुलगा अगस्त्यचा फोटो पोस्ट केला. यामध्ये तो कारवर पाणी टाकत खेळताना दिसतोय. नताशाने गेल्या काही दिवसांत इन्स्टाग्रामवर बरेच पोस्ट शेअर केले आहेत. फसवणूक आणि भावनिक अत्याचार यांबाबतचे हे पोस्ट होते. इतकंच नव्हे तर ‘टॉक्सिक रिलेशनशिप’बाबतचे पोस्टसुद्धा तिने लाइक केले होते.
नताशाची पोस्ट-
नताशा आणि हार्दिकने 2020 मध्ये लग्नगाठ बांधली. त्याचवर्षी नताशाने मुलाला जन्म दिला. 2023 मध्ये या दोघांनी राजस्थानमध्ये पुन्हा थाटामाटात लग्न केलं. आता घटस्फोटानंतर नताशा तिच्या मुलासोबत सर्बियामध्येच राहतेय. ‘कुटुंब म्हणून एकत्र राहिल्यानंतर, आनंदाने आणि आदराने एकमेकांचा सहवास अनुभवल्यानंतर हा निर्णय घेणं आमच्यासाठी खूप कठीण होतं. अगस्त्य हा आम्हा दोघांच्या आयुष्याच्या केंद्रस्थानी नेहमीच राहील. आम्ही दोघं मिळून त्याचं संगोपन करू, जेणेकरून त्याच्या आनंदासाठी आम्ही आम्हाला शक्य ते सर्व प्रयत्न करू शकू. या कठीण आणि संवेदनशील काळात तुम्ही आम्हाला समजून घ्या अशी विनंती करतो’, अशी पोस्ट हार्दिकने लिहिली होती.