‘झी मराठी अवॉर्ड्स’मध्ये या मालिकेने पटकावले सर्वाधिक पुरस्कार; पहा विजेत्यांची संपूर्ण यादी

| Updated on: Oct 30, 2024 | 1:28 PM

झी मराठी पुरस्कार सोहळा अत्यंत थाटामाटात पार पडला. या पुरस्कार सोहळ्यात एका मालिकेने सर्वाधिक नऊ पुरस्कार पटकावले आहेत. ही मालिका कोणती आणि इतर पुरस्कार कोणी जिंकले, याची संपूर्ण यादी पहा..

झी मराठी अवॉर्ड्समध्ये या मालिकेने पटकावले सर्वाधिक पुरस्कार; पहा विजेत्यांची संपूर्ण यादी
प्रचंड लोकप्रियता असलेल्या या मालिकेने पटकावले सर्वाधिक पुरस्कार
Image Credit source: Instagram
Follow us on

झी मराठी पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला. प्रेक्षकांना हा अविस्मरणीय सोहळा 26 आणि 27 ऑक्टोबरला संध्याकाळी 7 वाजता झी मराठी वाहिनीवर पाहता आला. यंदाच्या पुरस्कार सोहळ्यात प्रेक्षकांच्या सर्वांत आवडत्या मालिकेने सर्वाधिक पुरस्कार पटकावले आहेत. या मालिकेनं दोन-चार नाही तर तब्बल नऊ विविध विभागांमध्ये पुरस्कार आपल्या नावे केले आहेत. ही मालिका दुसरी तिसरी कोणती नसून ‘नवरी मिळे हिटलरला’ ही आहे. राकेश बापट आणि वल्लरी विराज यांच्या मुख्य भूमिका असलेली ही मालिका अल्पावधीतच लोकप्रिय झाली. या दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूपच आवडते. ‘नवरी मिळे हिटलरला’ पाठोपाठ ‘शिवा’ या मालिकेने सात विविध पुरस्कार पटकावले आहेत. शाल्व किंजवडेकर आणि पूर्वा फडके यांचीही जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरते.

पुरस्कार विजेत्यांची संपूर्ण यादी-

  • लोकप्रिय मालिका – नवरी मिळे हिटलरला
  • लोकप्रिय कुटुंब – जहागीरदार- एजेचं कुटुंब (नवरी मिळे हिटलरला)
  • लोकप्रिय जोडी – एजे आणि लीला (नवरी मिळे हिटलरला)
  • लोकप्रिय नायिका – अप्पी (अप्पी आमची कलेक्टर)
  • लोकप्रिय नायक – एजे (नवरी मिळे हिटलरला)
  • सर्वोत्कृष्ट मालिका – शिवा
  • सर्वोत्कृष्ट कुटुंब – किर्लोस्कर- आदित्यचं कुटुंब (पारू)
  • सर्वोत्कृष्ट जोडी – आशू आणि शिवा (शिवा)
  • सर्वोत्कृष्ट नायिका – शिवा (शिवा)
  • सर्वोत्कृष्ट नायक – आदित्य (पारू)
  • सर्वोत्कृष्ट खलनायिका – भुवनेश्वरी (तुला शिकवीन चांगलाच धडा)
  • सर्वोत्कृष्ट खलनायक – डॅडी (लाखात एक आमचा दादा)
  • सर्वोत्कृष्ट सहाय्यक व्यक्तिरेखा (स्त्री) – दुर्गा (नवरी मिळे हिटलरला)
  • सर्वोत्कृष्ट सहाय्यक व्यक्तिरेखा (पुरुष) – प्रीतम (पारू)
  • सर्वोत्कृष्ट विनोदी व्यक्तिरेखा (स्त्री) – दामिनी (पारू)
  • सर्वोत्कृष्ट विनोदी व्यक्तिरेखा (पुरुष) – चंदन (शिवा)
  • सर्वोत्कृष्ट सासू – लीला (नवरी मिळे हिटलरला)
  • सर्वोत्कृष्ट सासरे – रामभाऊ (शिवा)
  • सर्वोत्कृष्ट सून – लीला (नवरी मिळे हिटलरला)
  • सर्वोत्कृष्ट जावई – एजे (नवरी मिळे हिटलरला)
  • सर्वोत्कृष्ट आजी – बाई आजी- शिवाची आजी (शिवा)
  • सर्वोत्कृष्ट आई – अहिल्या (पारू)
  • सर्वोत्कृष्ट वडील – मारूती (पारू)
  • सर्वोत्कृष्ट मुलगी – पारू (पारू)
  • सर्वोत्कृष्ट मुलगा – अधिपती (तुला शिकवीन चांगलाच धडा)
  • सर्वोत्कृष्ट बहीण – तेजश्री, धनश्री, राजश्री, भाग्यश्री (लाखात एक आमचा दादा)
  • सर्वोत्कृष्ट भाऊ – सूर्या दादा (लाखात एक आमचा दादा)
  • सर्वोत्कृष्ट मैत्री – शिवा, पाना गँग (शिवा)
  • सर्वोत्कृष्ट बालकलाकार –

अमोल (अप्पी आमची कलेक्टर), गणी (पारू), बनी (पुन्हा कर्तव्य आहे), चिनू (पुन्हा कर्तव्य आहे), मनू (पुन्हा कर्तव्य आहे), बटर (नवरी मिळे हिटलरला)