ऐश्वर्या राय हिला मी कधीच…, मामीबद्दल नव्या नवेली हिचं मोठं वक्तव्य, चर्चांना उधाण

Navya Naveli Nanda | अमिताभ बच्चन यांच्या नातीचं ऐश्वर्या राय हिच्याबद्दल मोठं वक्तव्य, मामीला असं काय म्हणाली नव्या नवेली? सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त नव्या नवेली हिच्या वक्तव्याची चर्चा... बच्चन कुटुंब कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे असतं चर्चेत...

ऐश्वर्या राय हिला मी कधीच..., मामीबद्दल नव्या नवेली हिचं मोठं वक्तव्य, चर्चांना उधाण
Follow us
| Updated on: Apr 02, 2024 | 8:48 AM

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन आणि बच्चन कुटुंब कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतं. आता देखील बिग बी यांची नात नव्या नवेली नंदा हिच्यामुळे बच्चन कुटुंबाच्या चर्चा रंगत आहेत. नव्या फक्त अमिताभ बच्चन यांची नात म्हणून लोकप्रिय नाहीतर, ‘व्हाट द हेल नव्या’ या तिच्या पॉडकास्ट शोमुळे देखील नव्या चर्चेत असते. शोच्या पहिल्या सिझनमध्ये नव्या हिने आजी जया बच्चन आणि आई श्वेता बच्चन – नंदा यांच्यासोबत अनेक विषयांवर गप्पा मारल्या…

नव्या हिच्या शोचा दुसरा सिझन भाऊ अगस्त्य नंदा याच्यामुळे चर्चेत आला. आता नव्या तिसऱ्या सिझममध्ये कोणाला बोलवणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. नव्याने सिझनमध्ये ऐश्वर्या राय, अभिषेक बच्चन, अमिताभ बच्चन यांना बोलवावं अशी अनेकांची इच्छा आहे. यावर नुकताच झालेल्या एका मुलाखतीत नव्या हिने मोठं वक्तव्य केलं आहे.

मुलाखतीत नव्या हिला ‘शोमध्ये आजोबा, मामा-मामी यांना कधी बोलावणार?’ असा प्रश्न विचारण्यात आला. यावर नव्या  म्हणाली, ‘नाही… मला नाही वाटत की ‘व्हाट द हेल नव्या’ शोचा तिसरा सिझन आल्यास मी कुटुंबातील लोकांना बोलवेल.’ नव्या हिच्या अशा उत्तरानंतर चाहत्यांमध्ये निराशेचं वातावरण निर्माण झालं आहे.

शोमध्ये कोणाला बोलावणार नव्या नवेली?

नव्या म्हणाली, ‘इतर क्षेत्रातील व्यक्ती माझ्या शोमध्ये आल्यानंतर मला आनंद होईल…मी क्रिकेटर दिप्ती शर्मा हिची फार मोठी फॅन आहे. ती अविश्वसनीय आहे आणि माझ्या शोमध्ये दिप्तीला बोलवायला मला आवडेल…’ असं देखील नव्या म्हणाली. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त नव्या नवेली हिच्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे.

नव्या नवेली हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, श्वेता बच्चन आणि निखील नंदा यांची मुलगी आहे नव्या… कुटुंब फिल्म इंडस्ट्रीमधील असलं तरी, नव्या हिने बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याचा निर्णय घेतला नाही. नव्या हिने वयाच्या 21 व्या वर्षी उद्योजिका होण्याचा निर्णय घेतला.

नव्या बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी, सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत नव्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. नव्या हिच्या सौंदर्यापुढे बॉलिवूडच्या प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्री देखील फिक्या आहेत. सोशल मीडियावर नव्या हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. सध्या सर्वत्र फक्चा आणि फक्त नव्या हिची चर्चा रंगली आहे.

हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.