ऐश्वर्या-अभिषेकची मुलगी खऱ्या आयुष्यात कशी? बहीण नव्याकडून खुलासा

ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांची मुलगी आराध्या बच्चन ही सोशल मीडियावर नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आराध्याविषयी तिची बहीण नव्या नवेली नंदा नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मोकळेपणे व्यक्त झाली.

ऐश्वर्या-अभिषेकची मुलगी खऱ्या आयुष्यात कशी? बहीण नव्याकडून खुलासा
आराध्या बच्चनImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Feb 26, 2024 | 1:39 PM

मुंबई : 26 जानेवारी 2024 | अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांची मुलगी आराध्या ही सर्वांत चर्चेत असलेल्या स्टारकिड्सपैकी एक आहे. आराध्याचे फोटो किंवा व्हिडीओ क्षणार्धात सोशल मीडियावर व्हायरल होतात. आराध्या आता 12 वर्षांची झाली असून आई-वडिलांसोबत तिला अनेकदा पाहिलं गेलंय. अभिषेक बच्चनची भाची अर्थात श्वेता बच्चनची मुलगी नव्या नवेली नंदाने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत आराध्याचा उल्लेख केला. आराध्याविषयी जाणून घेण्यासाठी नेटकरी उत्सुक असतात. अशातच तिची बहीण नव्याने एका मुलाखतीत आराध्या अत्यंत हुशार असल्याचं सांगितलं. आराध्याला तू कोणता सल्ला देशील, असा प्रश्न नव्याला विचारण्यात आला होता. त्यावर नव्याने दिलेलं उत्तर सोशल मीडियावर चर्चेत आहे.

‘न्यूज 18’ला दिलेल्या मुलाखतीत नव्या म्हणाली, “मला आराध्याला विशेष असा काही सल्ला द्यायचा नाहीये. कारण तिच्या वयोमानानुसार ती खूपच हुशार आहे. ती आता 12 वर्षांची आहे आणि त्या वयोमानानुसार ती खूप हुशार आहे. तिला बऱ्याच गोष्टींचं योग्य ज्ञान आहे. त्यामुळे ही गोष्टच इतकी भारी आहे की या पिढीला जगातील किती ज्ञान आहे. समाज आणि आपल्या आजूबाजूच्या गोष्टींविषयी ती खूप जागरूक झाली आहे. तिला मी वेगळा काय सल्ला द्यावा हे मला कळत नाही.”

हे सुद्धा वाचा

नव्या पुढे म्हणाली, “ती इतकी लहान असून मी तिची प्रशंसा करतेय. पण ती खरंच खूप हुशार आहे. बऱ्याच गोष्टींबद्दल ती जागरुक असते आणि तिला बऱ्याच गोष्टींची योग्य माहितीसुद्धा आहे. घरातील बऱ्याच गोष्टी शेअर करण्यासाठी मला एक छोटी बहीण आहे, याचा मला खूप आनंद आहे. पण मला असं वाटत नाही की मी तिला काही सल्ला देऊ शकेन. तिचा आत्मविश्वास भारावून टाकणार आहे.”

आराध्या ही आई ऐश्वर्या राय आणि वडील अभिषेक बच्चन यांच्यासारखीच एक उत्तम अभिनेत्री बनू शकते, अशी चर्चा तिच्या शाळेतल्या परफॉर्मन्सनंतर सुरू झाली होती. इतर स्टारकिड्सप्रमाणेच आराध्या ही धीरुभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकते. काही महिन्यांपूर्वी आराध्याच्या शाळेचा वार्षिक समारंभ पार पडला. यावेळी आराध्याने खास परफॉर्मन्स दिला होता. त्यावेळी तिचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. आराध्याने सर्वांसमोर एक नाटक सादर केलं होतं आणि यावेळी तिचा लूक पाहून नेटकऱ्यांना सुरुवातीच्या दिवसांतील ऐश्वर्याच आठवली होती.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.