घटस्फोटाच्या चर्चेचं लोण फॅन्सपर्यंत?; ऐश्वर्याबाबत फॅन्स नव्याकडे काय म्हणाले?

Aishwarya Rai Bachchan : ऐश्वर्या राय - अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाच्या चर्चा, अनेकांनी साधला अमिताभ बच्चन यांनी नात नव्या नंदा हिच्यावर निशाणा, काय आहे प्रकरण? सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ऐश्वर्या आणि नव्या यांची चर्चा...

घटस्फोटाच्या चर्चेचं लोण फॅन्सपर्यंत?; ऐश्वर्याबाबत फॅन्स नव्याकडे काय म्हणाले?
Follow us
| Updated on: Feb 22, 2024 | 2:36 PM

मुंबई | 22 फेब्रुवारी 2024 : अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिनेता अभिषेक बच्चन यांच्या नात्याची चर्चा कायम रंगलेली असते. अभिनेत्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ऐश्वर्या हिने खास पोस्ट शेअर करत अभिषेक याच्यावर असलेलं प्रेम व्यक्त केलं. पण तरी देखील ऐश्वर्या – अभिषेक यांच्या घटस्फोटाच्या चर्चांना पूर्णविराम लागलेलं नाही. चाहते कायम ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्याबद्दल अनेक गोष्टी जाणून घेण्यासाठी उत्सुक असतात. पण आता ऐश्वर्या आणि महानायक अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा यांच्याबद्दल चर्चा रंगली आहे. नेटकऱ्यांनी ऐश्वर्या हिच्याबद्दल नव्या हिला अनेक प्रश्न विचारले आहेत.

सांगायचं झालं तर, नव्या तिचा पॉडकास्ट शो What The Hell Navya मुळे चर्चेत असते. शोमध्ये अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली आहे. अभिनेत्री जया बच्चन आणि त्यांची मुलगी श्वेता बच्चन नंदा यांनी देखील शोमध्ये हजेरी लावत बच्चन कुटुंबातील अनेक गोष्टी चाहत्यांना सांगतल्या. आता नव्या हिच्या पॉडकास्ट शोमध्ये अभिनेता अगस्त्य नंदा देखील उपस्थित राहणार आहे.

शोमध्ये अगस्त्य सरप्राईज एन्ट्री करतो. शोचा प्रोमो देखील प्रदर्शित झाला आहे. अगस्त्य याला शोमध्ये पाहिल्यानंतर नव्या हिच्याकडे चाहत्यांनी मोठी मागणी केली आहे. पुढील एपिसोडमध्ये ऐश्वर्या हिला बोलाव… अशी मागणी नेटकरी करत आहेत. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त नव्या नवेली हिच्या शोची चर्चा रंगली आहे.

शोमध्ये अगस्त्य याची एन्ट्री होताच चाहते आनंदी झाले आहेत. बहीण, आई आणि आजी यांच्यासोबत अगस्त्य याने शोमध्ये केलेली मस्ती आणि धमाल तुफान चर्चेत आहेत. शोमध्ये ऐश्वर्या कधी येणार या प्रतीक्षेत चाहते आहेत. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, ‘पॉडकास्ट शोमध्ये ऐश्वर्या हिला पाहायचं आहे..’

दुसरा नेटकरी म्हणाला, ‘माझी विनंती आहे शोमध्ये ऐश्वर्या राय हिला बोलाव.’ तिसरा नेटकरी म्हणाला, ‘शोमध्ये ऐश्वर्या आल्यानंतर शोची लोकप्रियता तुफान वाढेल…’ तर नेटकऱ्यांनी ऐश्वर्या आणि अभिषेक यांना एकत्र शोमध्ये बोलावण्याची मागणी केली आहे. आता नव्या चाहत्यांची इच्छा पूर्ण करेल की नाही? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

ऐश्वर्या हिने अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. आज ऐश्वर्या बॉलिवूडपासून दूर आहे पण अभिनेत्री कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर देखील ऐश्वर्या हिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.