nawazuddin siddiqui याने मध्यरात्री पत्नी, मुलांना काढलं घरा बाहेर ! व्हिडीओ व्हायरल

'नवाज मी तुला कधीही...', पत्नीसह मुलांनाही नवाजुद्दीन याने काढलं घरा बाहेर? आलियाने शेअर केलेल्या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून संताप व्यक्त

nawazuddin siddiqui याने मध्यरात्री पत्नी, मुलांना काढलं घरा बाहेर ! व्हिडीओ व्हायरल
Follow us
| Updated on: Mar 03, 2023 | 1:28 PM

nawazuddin siddiqui : अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी (nawazuddin siddiqui) गेल्या अनेक दिवसांपासून त्याच्या खासगी आयष्यामुळे चर्चेत आहे. अभिनेत्याची पत्नी आलिया सिद्दीकी हिने पती नवाजु्द्दीन याच्यावर अनेक गंभीर आरोप लावले आहेत. ज्यामुळे अभिनेता वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. आता आलिया सिद्दीकी हिने एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. जो सध्या तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओ प्रत्येकाला हैराण केलं आहे. सध्या सर्वत्र आलिया हिने पोस्ट केलेल्या व्हिडीओची चर्चा रंगलेली आहे.

आलियाने अशा व्यक्तींसाठी व्हिडीओ शेअर केला आहे, जे नवाजुद्दीन सिद्दीकी याला निर्दोष मानतात. नवाजने तिला त्यांच्या दोन मुलांसह घरातून बाहेर काढल्याचे आरोप आता आलियाने पतीवर केला आहे. मध्यारात्री रस्त्यावर उभं राहून आलियाने नवाज विरोधात व्हिडीओ तयार केला आहे. हा व्हिडीओ आलियाने तिच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे.

हे सुद्धा वाचा

आलियाच्या व्हिडीओने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. व्हिडीओमध्ये आलिया म्हणते, ‘माझी मुलगी रडत आहे, ती त्रासली आहे. मला नाही माहिती नवाज असं का करत आहे. असं करणं त्याला शोभा देतं का?. मी नवाजच्या बंगल्यामधून आली आहे. माझ्यासोबत माझी मुलं आहेत. आम्हाला घरा बाहेर काढण्यात आलं आहे.’

आलिया पुढे म्हणते, ‘माझ्याकडे पैसे नाहीत, मला माहित नाही मी काय करु. तू माझ्या मुलांसोबत जे काही करत आहेस, त्यासाठी मी तुला कधीही माफ करणार नाही नवाज. त्याने मला रात्री मुलांसोबत बाहेर उभं केलं आहे. मला काहीही कळत नाही यावेळी मी कुठे जावू…’ असं देखील आलिया व्हिडीओमध्ये बोलताना दिसत आहे.

आलियाने आणखी एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये मुलं झोपलेली दिसत आहेत. आलियाने व्हिडीओ शेअर करत पोस्ट देखील लिहिली आहे. आता यामागे नक्की सत्य काय आहे, हे फक्त नवाज आणि आलिया यांनाच माहिती आहे. अद्याप नवाज याने याबद्दल कोणताही खुलासा केलेला नाही. तर व्हिडीओ सोशल मीडिडावर व्हायरल होत असल्यामुळे नेटकऱ्यांनी संताप व्यक्त करताना दिसत आहेत.

याआधी देखील नवाजुद्दीन सिद्दीकी याच्या पत्नीने देखील त्याच्यावर गंभीर आरोप केले आहेत. काही दिवसांपूर्वी तिने मुंबई पोलिसांकडे पतीविरोधात तक्रार नोंदवली होती. आलियाने पतीवर बलात्काराचे देखील आरोप लावले आहेत. शिवाय आलियाच्या वकिलांनी देखील नवाजुद्दीन सिद्दीकी याच्यावर गंभीर आरोप लावले आहेत. पत्नीच्या आरोपांनंतर अभिनेत्याच्या अडचणींमध्ये मोठी वाढ होणार असल्याची शक्यता नोंदवण्यात येत आहे.

सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.