Nawazuddin Siddiqui च्या पहिल्या पत्नीचा मिस्ट्री मॅनसोबत रोमँटिक फोटो; चाहते म्हणाले, ‘आडनाव कधी बदलणार?’

'आडनाव कधी बदलणार?', मिस्ट्री मॅनसोबत रोमँटिक फोटो पोस्ट केल्यानंतर नवाजुद्दीन सिद्दीकी याची पहिली पत्नी नेटकऱ्यांच्या निशाण्यावर... सर्वत्र आलियाच्या खासगी आयुष्याची चर्चा

Nawazuddin Siddiqui च्या पहिल्या पत्नीचा मिस्ट्री मॅनसोबत रोमँटिक फोटो; चाहते म्हणाले, 'आडनाव कधी बदलणार?'
Follow us
| Updated on: Jun 07, 2023 | 1:41 PM

मुंबई | बॉलिवूडमध्ये कोणाचं नाव कधी कोणाला जोडलं जाईल सांगता येत नाही. अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी याच्या पहिल्या पत्नीच्या खासगी आयुष्याबद्दल तुफान चर्चा रंगत आहे. गेल्या काही दिवसांपासून अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी (nawazuddin siddiqui) त्याच्या सिनेमांमुळे नाही तर खासगी आयुष्यामुळे तुफान चर्चेत आहे. आता देखील एका मोठ्या कारणामुळे अभिनेता चर्चेत आला आहे. काही दिवसांपूर्वी नवाजुद्दीन सिद्दीकी याची पहिली पत्नी आलिया सिद्दीकी हिने अभिनेत्यावर अनेक आरोप केले होते. नवाज याच्यापासून विभक्त झाल्यानंतर आलिया तिच्या आयुष्यात पुढे गेली आहे. सोशल मीडियावर आलियाने एका मिस्ट्री मॅनसोबत फोटो पोस्ट केला आहे. सध्या सर्वत्र अभिनेत्रीचे फोटोची चर्चा आहे.

अभिनेत्रीने फोटो पोस्ट करत कॅप्शनमध्ये, ‘ज्या नात्याला मी स्वीकारलं होतं, त्या नात्यातून बाहेर येण्यासाठी मला १९ वर्ष लागली. पण आयुष्यात  मुलं माझी जबाबदार आहेत आणि कायम राहतील.. काही नाती मैत्री पेक्षाअधिक असतात आणि मी प्रचंड आनंदी आहे. आम्ही एकत्र आयुष्याचा आनंद घेत आहोत.. मला आनंदी राहण्याचा हक्क नाही का?’ असं लिहिलं आहे.

आलियाच्या पोस्टवर चाहते कमेंट करत निशाणा साधत आहेत. आलियाच्या पोस्टवर एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, ‘तू आडनाव बदलून घे…’ तर दुसऱ्या नेटकऱ्याने, ‘प्रत्येकाला आनंदी राहण्याचा हक्क आहे…’ असं कमेंटमध्ये म्हटलं आहे. आलियाच्या पोस्टवर नेटकरी लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.

हे सुद्धा वाचा

दरम्यान, पत्नीसोबत असलेल्या भांडणांमुळे नवाजुद्दीन सिद्दीकी कायद्याच्या कचाट्यात देखील आडकला. आता नवाजुद्दीन सिद्दीकी याची पहिली पत्नी आलिया सिद्दीकी (Aaliya Siddiqui) हिचा एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. आलियाचा फोटो पाहिल्यानंतर अभिनेत्याच्या चाहत्यांनी मात्र संताप व्यक्त केला आहे.

नवाजुद्दीन सिद्दीकी याच्यावर आलियाने केले गंभीर आरोप…

मुलांच्या कस्टडीवरून नवाजुद्दीन सिद्दीकी आणि आलियामध्ये वाद सुरू आहे. कोर्टात वाद सुरु असताना आलियाने नवाजुद्दीन सिद्दीकी याच्यावर घरगुती हिंसाचार झाला आणि तिच्या मुलांनाही वाईट वागणूक दिली जात असल्याचे आरोप केले आहेत. दरम्यान नवाजुद्दीन सिद्दीकी याच्यावर गंभीर आरोप करत आलियाने अनेक व्हिडीओ आणि फोटो देखील सोशल मीडियावर पोस्ट केले.

व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर करत आलियाने अनेक प्रश्न देखील उपस्थित केले होते. या प्रकरणावर नवाजुद्दीन कधीच काही बोलला नाही. मुलांच्या योग्य संगोपनासाठी त्यांची कस्टडी हवी आहे… एवढंच अभिनेता म्हणाला. शिवाय आलिया आणि मी गेल्या अनेक दिवसांपासून विभक्त राहत आहोत असं देखील अभिनेता म्हणाला.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.