The Kapil Sharma Show | नवाजुद्दीन सिद्दीकी मायानगरीत परतला, ‘द कपिल शर्मा’च्या आगामी भागात हजेरी!

‘द कपिल शर्मा शो’ या कॉमेडी शोमध्ये येणाऱ्या भागात नवाजुद्दीन सिद्दीकी दिसणार आहे. सोनी टीव्हीच्या अधिकृत सोशल मीडियावरून नुकताच हा नवीन प्रोमो शेअर करण्यात आला आहे.

The Kapil Sharma Show | नवाजुद्दीन सिद्दीकी मायानगरीत परतला, ‘द कपिल शर्मा’च्या आगामी भागात हजेरी!
Follow us
| Updated on: Dec 02, 2020 | 12:36 PM

मुंबई : ‘द कपिल शर्मा शो’ या कॉमेडी शोमध्ये येणाऱ्या भागात नवाजुद्दीन सिद्दीकी दिसणार आहे. सोनी टीव्हीच्या अधिकृत सोशल मीडियावरून नुकताच हा नवीन प्रोमो शेअर करण्यात आला आहे. ज्यात नवाजुद्दीन एकदम हटके एंट्री मारताना दिसत आहेत. शोमध्ये नवाजुद्दीन त्याच्या आयुष्यातील जबरदस्त किस्से सांगणार आहे. कपिलही नवाजुद्दीनला अनेक मजेदार प्रश्न विचारताना दिसणार आहे.(Nawazuddin Siddiqui ‘Kapil Sharma will appear in the coming areas in show) प्रोमोमध्ये कपिल शर्मा नवाजुद्दीनला विचारत आहे की, ‘एक अशी अफवा आहे की, तु सकाळी 5 ते 7च्या दरम्यान बाल्कनीत उभे राहून मीच देव आहे, असे म्हणत सर्वांना आशिर्वाद देतोस, असे म्हटले जाते. हे खरं आहे का?’ यावर नवाजुद्दीन जोरजोरात हसताना दिसतो आहे.

पुढे कपिल नवाजुद्दीनला म्हणतो की, तुझ्या विषयी मी आणखी एक गोष्ट ऐकली आहे की, ‘तुझ्या गावात लहानपणी तुला तीतर पहलवान म्हणायचे, ते का?’ त्याला उत्तर देताना नवाजुद्दीन सिद्दीकी म्हणतो की, ‘मी लहानपणी कुस्ती खेळायचो. पण, मी खूप सडपातळ आणि बारीक होतो. म्हणून जेव्हा जेव्हा मी आखाड्यात स्पर्धेसाठी जायचो तेव्हा माझा निर्णय एका मिनिटात व्हायचा. त्यामुळेच मला तीतर पहलवान म्हणायचे’, हे ऐकून कपिलला खूपच हसू येते. शोमध्ये नवाजुद्दीनसोबत बंपर ही बरीच मस्ती करताना दिसत आहे बंपर नवाजुद्दीनला तिच्याबरोबर एक चित्रपट बघण्यासाठी चल म्हणणार आहे. भारतीची आठवण… प्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंह आणि तिचा नवरा हर्ष लिंबाचिया हे गेल्या काही दिवसांपासून ड्रगच्या प्रकरणामुळे चर्चेत आले आहेत. भारतीला सोशल मीडियावर चाहत्यांच्या रोषाला सोमोरे जावे लागत आहे सर्व स्तरातून भारतीवर आता टिका होऊ होत आहे. ड्रग्ज प्रकरणात अडकल्यामुळे सोनी टीव्हीने भारतीची ‘द कपिल शर्मा शो’मधूनही हकालपट्टी केल्याचे कळते आहे. यामुळेच या भागात भारती दिसली नाही. मात्र, सोनी टीव्हीचा हा निर्णय कपिल शर्मा आणि त्यांच्या टिमला मान्य नाही. कपिलच्या कॉमेडी शोमध्ये काम करणारा किकू शारदा म्हणतो की, ‘आम्ही शूट केले आणि भारती आमच्या शूटिंगसाठी हजर नव्हती. पण भारती ‘द कपिल शर्मा शो’ मध्ये नसणार याच्या बद्दल कोणालाही काहीही माहिती नाही. आणि ती काल शूटवर हजर नव्हती कारण, भारतीचे काही शूट नव्हते आणि कपिल शर्माच्या शोचा भाग भारती नसणार अशा कुढल्याच निर्णया बद्दल माहिती नाही. कपिल शर्माच्या अडचणीच्या वेळी भारती सिंहने नेहमीच त्याला पाठिंबा दिला आहे. अलीकडे, जेव्हा कपिल आजारी पडला होता आणि त्याचा परिणाम त्यांच्या शोवर होत होता. त्यावेळी भारतीने त्याची मदत केली होती. कपिल आणि भारती दोघेही पंजाबचे आहेत. कपिल भारतीला त्याची छोटी बहीण मानतो. त्यामुळे अशा प्रकारच्या अडचणीच्या वेळी हा शो भारतींकडून काढून घेतला जाऊ नये, अशी त्याची इच्छा आहे.

संबंधित बातम्या : 

Bharti Singh | भारती सिंहची ‘द कपिल शर्मा शो’मधून हाकलपट्टी? वाचा कृष्णा अभिषेक काय म्हणाला…

Kapil Sharma | ‘द कपिल शर्मा शो’च्या आगामी भागात सुरेश रैनाची जोरदार फटकेबाजी!

(Nawazuddin Siddiqui ‘Kapil Sharma will appear in the coming areas in show)

उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.