Nayanthara Wedding: नयनतारा-विग्नेशच्या लग्नाचे फोटो आले समोर; लग्नाला दिग्गज सेलिब्रिटी उपस्थित

या लग्नसोहळ्याला शाहरुख खान, रजनीकांत, सूर्या, विजय सेतुपती, मणी रत्नम, अटली असे अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते. चेन्नईमधल्या महाबलीपुरम इथल्या शेरॅटॉन ग्रँडमध्ये हा लग्नसोहळा पार पडला.

Nayanthara Wedding: नयनतारा-विग्नेशच्या लग्नाचे फोटो आले समोर; लग्नाला दिग्गज सेलिब्रिटी उपस्थित
Nayanthara, Vignesh Shivan weddingImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jun 09, 2022 | 4:12 PM

दाक्षिणात्य अभिनेत्री नयनतारा (Nayanthara) आणि दिग्दर्शक विग्नेश शिवन (Vignesh Shivan) यांनी आज (9 जून) चेन्नईमध्ये लग्नगाठ (Wedding) बांधली. या लग्नाचे पहिले फोटो समोर आले आहेत. विग्नेशने सोशल मीडियावर या लग्नातील खास क्षणांचे फोटो पोस्ट केले आहेत. या लग्नसोहळ्याला शाहरुख खान, रजनीकांत, सूर्या, विजय सेतुपती, अजित, मणी रत्नम, अटली, बोनी कपूर असे अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते. चेन्नईमधल्या महाबलीपुरम इथल्या शेरॅटॉन ग्रँडमध्ये हा लग्नसोहळा पार पडला. मार्च 2021 मध्ये नयनतारा आणि विग्नेश यांनी साखरपुडा केला. हे दोघं 2015 पासून एकमेकांना डेट करत आहेत. ‘नानुम राऊडी धान’ या चित्रपटाच्या सेटवर दोघांची पहिल्यांदा भेट झाली होती.

शाहरुख आणि नयनतारा आगामी ‘जवान’ या चित्रपटात एकत्र काम करणार आहेत. दिग्दर्शक अटली या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहेत. अटली आणि शाहरुख यांचेही लग्नसोहळ्यातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. नयनतारा आणि विग्नेशच्या लग्नातील फोटोंवर नेटकरी आणि सेलिब्रिटींकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. लग्नात नयनताराने ‘जेड बाय मोनिका’ या डिझायनर ब्रँडची साडी नेसली आहे. त्यावर भरजरी दागिने परिधान केले आहेत. तिच्या या ब्रायडल लूकची सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे.

हे सुद्धा वाचा

पहा लग्नाचे फोटो-

नयनतारा आणि विग्नेशच्या लग्नातील महत्त्वपूर्ण विधी ही रजनीकांत यांनी पार पाडली. रजनीकांत यांनी विग्नेशच्या हाती नयनताराच्या गळ्यात बांधण्यासाठी मंगळसूत्र दिलं. दाक्षिणात्य पद्धतीने पार पडलेल्या लग्नातील जेवणाचा मेन्यूसुद्धा ‘साऊथ स्पेशल’ होता. काई पोरिचट्टू, पोन्नी राईस, कठल बिर्याणी, सांबार सदम, कर्ड राईस, पोंडू मिलागू रस्सम असे पदार्थ मेन्यूमध्ये समाविष्ट होते. तमिळनाडूमध्ये या लग्नाच्या रिसेप्शनचं आयोजन करण्यात येणार आहे. नयनताराने 2003 मध्ये चित्रपटसृष्टीतील कारकिर्दीला सुरुवात केली. त्यापूर्वी ती मॉडेलिंग करायची. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील यशस्वी अभिनेत्रींमध्ये नयनताराचं नाव आवर्जून घेतलं जातं.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.