सर्वांसमोर दिग्दर्शकाने अभिनेत्रीसोबत असं काय केलं? ज्यामुळे ‘ती’ ढसाढसा रडू लागली

सेटवर दिग्दर्शकाने अभिनेत्रीसोबत असं काय केलं, जे पाहून समोर उभे असलेली जुही चावला देखील काही करू शकली नाही...

सर्वांसमोर दिग्दर्शकाने अभिनेत्रीसोबत असं काय केलं? ज्यामुळे 'ती' ढसाढसा रडू लागली
सर्वांसमोर दिग्दर्शकाने अभिनेत्रीसोबत असं काय केलं? ज्यामुळे 'ती' ढसाढसा रडू लागली
Follow us
| Updated on: Dec 30, 2022 | 11:58 AM

Neena Gupta abused by the director : ‘बधाई हो’ चित्रपटाच्या यशानतंर अभिनेत्री नीना गुप्ता (Neena Gupta) यांच्या लोकप्रियतेत प्रचंड वाढ झाली. नुकताच प्रदर्शित झालेल्या ‘उंचाई’ चित्रपटाला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं. सिनेमात नीना यांच्याशिवाय महानायक अमिताभ बच्चन आणि अभिनेते अनुपम खेर यांनी मुख्य भूमिका साकारली. आज अभिनय क्षेत्रात अव्वल स्थानी असलेल्या नीना गुप्ता त्यांच्या प्रोफेशनल आणि खासगी आयुष्यमुळे चर्चेत असतात. नीना यांनी कायम आयुष्यात अनुभवलेल्या क्षणांबद्दल मनमोकळेपणाने सांगितलं. एवढंच नाही, तर शुटिंग दरम्यान सेटवर घेडलेल्या गोष्टी देखील त्यांनी चाहत्यांसोबत शेअर केल्या.

नुकताच नीना यांनी सेटवर घडलेल्या एका प्रसंगाविषयी सांगितलं. जेव्हा त्यांना सर्वांसमोर आई-बहिणीवरून शिवीगाळ करण्यात आली होती. सेटवर नीना यांना दिग्दर्शकाने शिवीगाळ केली होती. नीना यांनी सांगितलं, चित्रपटात त्यांचा लहान रोल होता. ज्यामध्ये जवळपास फक्त २-३ डायलॉग होते.

पण शुटिंग दरम्यान नीना यांचे असलेले लहान डायलॉग देखील वगळण्यात आले. तेव्हा चित्रपटात असलेली त्यांची भूमिकाच नष्ट करण्यात आली. असा प्रकार घडल्यानंतर नीना थेट दिग्दर्शकांकडे गेल्या आणि म्हणाल्या, ‘मी दिग्दर्शकांकडे गेली आणि त्यांनी सांगितलं, माझ्याकडे फक्त दोन डायलॉग होते आणि ते देखील तुम्ही कट केले.’ (neena gupta controversy)

नीना गुप्ता यांनी दिग्दर्शकांना सवाल केल्यानंतर त्यांनी अभिनेत्रीला आई-बहिणीवरुन शिवीगाळ केली. यावर नीना म्हणाल्या, ‘सेटवर तेव्हा अभिनेता विनोद खन्ना आणि अभिनेत्री जुही चावला देखील होती. सर्वांसमोर दिग्दर्शकांनी मला शिवीगाळ केली. तेव्हा मी सर्वांसमोर ढसाढसा रडू लागली.’

या घटनेवर बोलताना नीना पुढे हासत म्हणाल्या, ‘पूर्वी अशा गोष्टी सर्रास व्हायच्या. पण आता अशी परिस्थिती नाही. आज मला कोणी आई-बहिणीवरुन शिवीगाळ करत नाही.’ असं देखील नीना गुप्ता म्हणाल्या.

नीना गुप्ता यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, एककाळ असा होता जेव्हा नीना गुप्ता वेस्ट इंडिजचे दिग्गज क्रिकेटर विवियन रिचर्डसोबत रिलेशनशिपमध्ये होत्या. त्यांना एक मुलगी देखील आहे. त्यांच्या मुलीचं नाव मसाबा असं आहे. विवियन रिचर्डसोबत विभक्त झाल्यानंतर नीना यांनी सिंगल मदर म्हणून लेकीचा सांभाळ केला.

...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.