‘माझे तिच्या एवढेही मोठे नाहीयेत…’; नीना गुप्तांची प्रसिद्ध अभिनेत्रीवर थेट कमेंट, सर्वांनी केले कान बंद
नीना गुप्ता यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. कपिल शर्माच्या शोमध्ये त्या आल्या असताना त्यांनी एका अभिनेत्रीवर थेट कमेंट केली. ती कमेंट ऐकून लोकांना कान बंद करावे लागले.

काही बॉलिवूड अभिनेत्री या त्यांच्या बोल्ड दिसण्यासोबतच त्यांच्या बोल्ड वक्तव्यासाठीही तेवढ्याच प्रसिद्ध असतात. अशीच एक अभिनेत्री जी तिच्या अभिनयासोबतच तिच्या बोल्ड स्टाईलसाठीही खूप लोकप्रिय आहे. ती अभिनेत्री म्हणजे नीना गुप्ता. नीना गुप्ता त्यांच्या बोल्ड स्टाईल आणि बोल्ड वक्तव्यामुळेही नेहमीच चर्चेत असतात. सध्या त्यांचा एक व्हिडिओ खूप चर्चेत आहे, ज्यामध्ये त्या स्वतःबद्दल तसेच कौतुकास्पर पण एका अभिनेत्रीबद्दलही कमेंट करताना पाहायला मिळतात. पण ती कमेंट ऐकून शोमध्ये उपस्थित असलेले सर्वजण स्वत:चे कान झाकतात.
निना गुप्तांचे उत्तर ऐकून सर्वांनी कान झाकले
निना गुप्तांचा हा व्हिडिओ त्यावेळचा आहे जेव्हा त्या ‘पंगा’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कंगना राणौतसोबत कपिल शर्माच्या कॉमेडी शोमध्ये आल्या होत्या. जेव्हा कपिलने शोमध्ये त्यांना एक प्रश्न विचारला तेव्हा त्याला कदाचित माहित नव्हते की त्याला नीनाकडून असे काही उत्तर मिळू शकते. या व्हिडिओमध्ये कपिल शर्मा त्यांना एक प्रश्न विचारताना दिसतोय, ‘नीना, तुमच्याबद्दल एक अफवा आहे की तू हॉलिवूड मालिका ‘बेवॉच’ मध्ये पामेला अँडरसनची भूमिका करू इच्छिते.’ नीना यांनी या प्रश्नाचे उत्तर अतिशय सहजतेने दिलं. ती म्हणाली, ‘अरे माझे एवढे पण मोठे नाहीयेत” यानंतर, स्टेजवर उपस्थित असलेल्या जस्सी गिलने आपल्या हातांनी चेहरा लपवला आणि रिचा चढ्ढा हिने आपले कान झाकले. ‘पंगा’ मध्ये बाल कलाकार म्हणून दिसलेल्या यज्ञ भसीनलाही त्याचे कान बंद केले. कारण निना असं काही उत्तर देतील याची कोणालाही कल्पना नव्हती.
View this post on Instagram
निना गुप्तांचा हा व्हिडिओ व्हायरल
कपिलने पुन्हा गंमतीत म्हटलं की,” या शोमध्ये काही वेज उत्तर मिळेल का?” तर नीना यांनी लगेच त्यावरही उत्तर दिले की, “तुम्ही शाकाहारी प्रश्नही विचारले पाहिजेत”. यावर कपिल पुन्हा म्हणाला- “हा प्रश्न व्हेज होता” ज्यावर त्या पुन्हा म्हणाल्या की,”पामेलाचा प्रश्न व्हेज असू शकत नाही.” या दोघांच्या संवादावर उपस्थित असलेले सर्वजन हसू लागले. नीना गुप्ता चित्रपटांमध्ये दमदार अभिनयासाठी जितक्या ओळखल्या जाताता तितक्याच त्या खऱ्या आयुष्यातही मजेदार आणि स्पष्टवक्त्या आहेत. नीना सोशल मीडियावरही खूप सक्रिय असतात. अनेक वेळा, नीना त्यांच्या कपड्यांवरून ट्रोल होतात. पण काहींना त्यांचा हा बिनधास्त अंदाज आवडतो.
निना व्यक्तिगत आयुष्यामुळेही नेहमीच चर्चेत
निना त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यामुळेही नेहमीच चर्चेत राहिल्या आहेत. क्रिकेट जगतातील सर्वात मोठ्या नावांपैकी एक असलेल्या सर विवियन रिचर्ड्स आणि नीना गुप्ता यांच्या नात्याचीही बरीच चर्चा रंगली. त्यांना मसाबा नावाची मुलगी आहे. खरं तर,दोघेही वेगळे झाल्यानंतर नीनाने एकटी आई म्हणून तिच्या मुलीचे संगोपन केले.