Neena Gupta | नीना गुप्ता यांना एअरपोर्टवर अशी वागणूक; म्हणाल्या “अजून मी VIP बनू शकले नाही”

| Updated on: Oct 04, 2023 | 5:53 PM

अभिनेत्री नीना गुप्ता यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. नीना यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. बरेली एअरपोर्टवरून त्यांनी हा व्हिडिओ शूट करून एक तक्रार केली आहे. यावर नेटकऱ्यांकरून विविध प्रतिक्रिया येत आहेत.

Neena Gupta | नीना गुप्ता यांना एअरपोर्टवर अशी वागणूक; म्हणाल्या अजून मी VIP बनू शकले नाही
Neena Gupta
Image Credit source: Instagram
Follow us on

मुंबई | 4 ऑक्टोबर 2023 : अभिनेत्री नीना गुप्ता सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतात. चाहत्यांसोबत ते स्वतःचे विविध फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतात. नुकताच त्यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये त्या बरेली एअरपोर्टवर बसलेल्या दिसत आहेत. या व्हिडिओतून नीना गुप्ता यांनी एक तक्रार केली आहे. एअरपोर्टच्या रिझर्व्ह लाऊंजमध्ये त्यांना एण्ट्री नाकारण्यात आली. त्यानंतर त्यांनी एअरपोर्टवरूनच हा व्हिडिओ शूट करून पोस्ट केला आहे.

या व्हिडिओमध्ये नीना बोलतायत, “मी बरेली एअरपोर्टवर आहे आणि हा एअरपोर्टवरील रिझर्व्ह लाऊंज आहे. जिथे जाऊन मी एकदा बसली होती. मात्र आज मला तिथे जाऊ दिलं नाही. हे रिझर्व्ह लाऊंज व्हीआयपी लोकांसाठी असतं आणि मला असं वाटलं की मी व्हीआयपी आहे. मात्र मी अजून व्हीआयपी बनू शकले नाही. कदाचित मला व्हीआयपी बनण्यासाठी आणखी बरीच मेहनत करावी लागणार आहे. त्यामुळे चांगलंच आहे, यानिमित्ताने मी व्हीआयपी बनण्यासाठी आणखी मेहनत करीन. धन्यवाद” हा व्हिडिओ पोस्ट करत नीना यांनी कॅप्शनमध्ये रडण्याचे इमोजी पोस्ट केले आहेत. नीना यांच्या व्हिडिओवर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत.

हे सुद्धा वाचा

पहा व्हिडीओ

योग्य व्यक्तींची किंमत कशी करावी हे या लोकांना माहीत नाही, अशी कमेंट एका युजरने केली. तर तुम्ही जिथे बसाल तोच एरिया व्हीआयपी बनेल. तुम्हाला त्या रिझर्व्ह लाऊंजची काहीच गरज नाही, असं दुसऱ्याने म्हटलं आहे. तुम्ही तुमच्या प्रामाणिकतेमुळे नेहमीच आमच्यासाठी व्हीआयपी आहात, असंही नेटकऱ्यांनी कमेंट बॉक्समध्ये लिहिलंय. तर या देशात फक्त राजकारणीच व्हीआयपी आहेत, अशी तक्रार काहींनी केली.

नीना गुप्ता या नुकत्याच ‘मिसेस चॅटर्जी वर्सेस नॉर्वे’ या चित्रपटात झळकल्या होत्या. याशिवाय त्यांनी विशाल भारद्वाज यांच्या ‘चार्ली चोप्रा अँड द मिस्ट्री ऑफ सोलंग वॅली’ या वेब सीरिजमध्येही काम केलं. नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या ‘लस्ट स्टोरीज 2’मधील एका कथेतही त्यांनी भूमिका साकारली आहे. नीना गुप्ता या लवकरच अनुराग बासू यांच्या ‘मेट्रो इन दिनो’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.