Neena Gupta: वयाच्या 63 व्या वर्षी नीना गुप्ता यांनी केले पुशअप्स; नेटकऱ्यांकडून कौतुक

वयाची साठी ओलांडलेल्या नीना गुप्ता यांचा 'फिटनेस फंडा'; Video एकदा पहाच!

Neena Gupta: वयाच्या 63 व्या वर्षी नीना गुप्ता यांनी केले पुशअप्स; नेटकऱ्यांकडून कौतुक
'मैं तो पब्लिक प्रॉपर्टी हूं', असं म्हणत का भडकल्या Neena Gupta?Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Nov 29, 2022 | 3:17 PM

मुंबई: अभिनेत्री नीना गुप्ता यांच्या दमदार अभिनयकौशल्याचे असंख्य चाहते आहेत. राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या नीना गुप्ता या एकेकाळी कामाच्या शोधात होत्या. कामाची गरज असल्याची त्यांची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. त्यानंतर त्यांना ‘बधाई हो’ या चित्रपटाची ऑफर मिळाली. या चित्रपटातील त्यांच्या भूमिकेने प्रेक्षकांची मनं जिंकली. त्यानंतर त्या विविध चित्रपटांमध्ये झळकल्या. वयाची साठी ओलांडलेल्या नीना गुप्ता यांनी नुकताच वर्कआऊटचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

हा व्हिडीओ पोस्ट करत त्यांनी सांगितलं की त्यांच्या मॉर्निंग वर्कआऊटची सुरुवात ‘Knee Pushups’ने (गुडघ्यांचे पुशअप्स) होते. यामध्ये त्या पुशअप्स करताना दिसत आहेत. मात्र हे पुशअप्स सर्वसामान्य नाहीत. त्यांनी ट्रेनरची मदत घेत पुशअप्स केले. हे करताना त्यांचे गुडघे जमिनीला टेकलेले होते. अप्पर बॉडी टोन करण्यासाठी हा व्यायाम केला जातो.

हे सुद्धा वाचा
View this post on Instagram

A post shared by Neena Gupta (@neena_gupta)

‘सुरुवात केली आहे, मात्र शो ऑफ करतेय’, असं कॅप्शन देत त्यांनी हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यांच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतोय. नीना या नेहमीच सोशल मीडियावर त्यांचे व्हिडिओ आणि फोटो शेअर करत असतात. नेटकऱ्यांकडून त्यांना पसंती मिळते. याशिवाय त्या बिनधास्तपणे आपली मतं मांडण्यासाठीही ओळखल्या जातात. आपलं जीवन आपल्या अटी-शर्तींवर जगा, लोक काय म्हणतात याची पर्वा करू नका, असं त्या नेहमी म्हणतात.

नीना गुप्ता यांनी नुकतीच ‘उंचाई’ या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारली. यामध्ये त्यांच्यासोबत अमिताभ बच्चन, अनुपम खेर, बोमन इराणी आणि परिणिती चोप्रा यांच्या मुख्य भूमिका आहेत.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.