विवाहित पुरुषाच्या प्रेमात पडणाऱ्या तरुणींना ‘या’ अभिनेत्रीने दिला महत्त्वाचा सल्ला

| Updated on: Feb 14, 2023 | 3:56 PM

विवाहित पुरुषावर प्रेम केल्यामुळे अभिनेत्रीने केला अनेक संकटांचा सामना..., प्रेग्नेंट राहिल्यानंतर बॉयफ्रेंडने दिला लग्नाला नकार... आयुष्यात आलेल्या अनुभवानंतर अभिनेत्रीचा तरुणींना सल्ला....

विवाहित पुरुषाच्या प्रेमात पडणाऱ्या तरुणींना या अभिनेत्रीने दिला महत्त्वाचा सल्ला
neena gupta
Follow us on

मुंबई : बॉलिवूडमध्ये काही अशा लव्हस्टोरी अशा आहेत, ज्या कायम चर्चेत राहिल्या आणि काही अभिनेत्री त्यांच्या नात्यामुळे चर्चेत रहिल्या. अशाच अभिनेत्रीं पैकी एक म्हणजे नीना गुप्ता (neena gupta). नीना यांनी त्यांच्या आयुष्यात अनेक चढ-उतार पहिले. प्रग्नेंट राहिल्यानंतर बॉयफ्रेंडने सोडलेली साथ आणि आयुष्यभर मुलीचा सिंगल मदर (neena gupta daughter) म्हणून सांभाळ केलेल्या नीना गुप्ता कायम त्यांच्या संघर्षामुळे चर्चेत असतात. नीना कायम त्यांच्या आयुष्याबद्दल चाहत्यांना अनेक महत्त्वाच्या गोष्टी सांगत असतात. एका व्हिडीओमध्ये नीना यांनी तरुणींना विवाहित पुरुषाच्या प्रेमात न पडण्याचा सल्ला दिला. त्यांनी हा व्हिडीओ फारपूर्वी इन्स्टाग्रामवर पोस्ट केला होता. पण तो आजही सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतो.

तरुण मुलींनी सल्ला देत नीना गुप्ता म्हणाल्या, ‘काही ठरलेले डायलॉग असे आहेत, जे तो तुम्हाला मी आज तुम्हाला सांगेल. त्याला त्याची पत्नी आवडत नाही. मला तिच्यासोबत राहण्याची इच्छा नाही. आमचं नातं फार काळ टिकू शकत नाही, त्यानंतर तुम्ही त्या विवाहित पुरुषाच्या प्रेमात पडता आणि त्याला सांगता की, पत्नीपासून विभक्त का होत नाहीस.. त्यानंतर तो पुरुष म्हणतो, की नाही मी घटस्फोट नाही घेवू शकत… मुलं, संपत्ती यांचा प्रश्न उपस्थित राहतो. जे सुरु आहे ते असंच सुरु ठेवूया पुढे बघू काय होतं…

हे सुद्धा वाचा

 

 

पुढे नीना गुप्ता म्हणाल्या, ‘पुरुषाच्या वक्यव्यानंतर तुम्ही त्याच्याकडून अपेक्षा करता. फिरायला जाणं, एकत्र वेळ व्यतीत करणं इथपर्यंत हे नातं येऊन पोहोचतं. पुढे अर्थातच अपेक्षा वाढतात आणि तुम्ही जेव्हा ‘त्या’ व्यक्तीशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त करता. तेव्हा तो म्हणतो प्रतीक्षा कर. ही सोपी गोष्ट नाही.’

‘त्यानंतर अनेक वाद होतात. अखेर तो म्हणतो हे सर्व प्रचंड कठीण आहे. आपण पुढे काहीही नको करायला. याठिकाणी हे सर्व संपवायला हवं. तो असं म्हणाल्यानंतर आपण काय करणार? म्हणून माला प्रत्येक तरुणीला सांगायचं आहे, की विवाहित पुरुषाच्या प्रेमात कधीही पडू नका… ‘ असं नीना गुप्ता म्हणाला.

एका काळ असा होता जेव्हा विवियन रिचर्ड्स यांच्यासोबत असेलल्या नात्यामुळे नीना गुप्ता प्रचंड चर्चेत होत्या. ब्रेकअपनंतर त्यांनी एका मुलीला जन्म दिला. त्यांच्यामुलीचं नाव मसाबा गुप्ता आहे. मसाबा एक सेलिब्रिटी फॅशन डिझायनर आहे. नुकताच मसाबाने लग्न केलं, तिच्या लग्नात नीना गुप्ता यांच संपूर्ण कुटुंब पहिल्यांदा एकत्र समोरं आलं.