Neena Gupta | ‘वाढदिवसाच्या शुभेच्छा नाही तर माझ्या निधनावर शोक…’, नीना गुप्ता यांच्या वक्तव्याने चाहते हैराण

नीना गुप्ता यांच्या मुलीने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये अभिनेत्रीने व्यक्त केलेल्या भावना हैराण करणाऱ्या.. वयाच्या ६४ व्या वर्षी असं का म्हणाल्या नीना गुप्ता?

Neena Gupta | 'वाढदिवसाच्या शुभेच्छा नाही तर माझ्या निधनावर शोक...', नीना गुप्ता यांच्या वक्तव्याने चाहते हैराण
Follow us
| Updated on: Jun 05, 2023 | 10:46 AM

मुंबई | अभिनेत्री नीना गुप्ता कायम त्यांच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असतात. बॉलिवूडमध्ये स्वतःची ओळख निर्माण करण्यापासून ते ‘सिंगल मदर’ म्हणून नीना गुप्ता यांचा प्रवास फार कठीण होता. खुद्द नीना गुप्ता यांनी त्यांच्या आयुष्यात आलेले अनेक चढ -उतार चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. सध्या सर्वत्र नीना गुप्ता आणि त्यांच्या आयुष्याबद्दल अनेक चर्चा रंगत आहेत. नुकताच नीना गुप्ता यांनी वाढदिवस साजरा केला. अनेक चाहत्यांनी नीना गुप्ता यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. दरम्यान, आईच्या वाढदिवसाच्या दिवशी नीना गुप्ता यांची मुलगी मसाबा गुप्ता हिने आईचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. ज्यामध्ये लेकीने नीना गुप्ता यांनी भेट दिली, पण नीना यांनी निधनाबद्दल मोठं वक्तव्य केलं..

आईच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मसाबा म्हणाली, ‘आज तुमचा वाढदिवस आहे…’ पुढे नीना गुप्ता म्हणाल्या, ‘हा माझा वाढदिवस आहे.. माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने दिलेल्या भेटवस्तूसाठी धन्यवाद… ‘ सध्या मसाबा गुप्ता हिने पोस्ट केलेला व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. एवढंच नाही तर, चाहते त्यांच्या व्हिडीओवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.

हे सुद्धा वाचा

पुढे व्हिडीओमध्ये मसाबाने आईला विचारलं, ‘वाढदिवसाच्या दिवशी काय विचार आहेत…’, यावर खिल्ली उडवत नीना म्हणाल्या, ’60 वर्षांनंतर वाढदिवस आला की मला असं वाटतं.. लोकांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा ऐवजी निधनावर शोक व्यक्त केला पाहिजे. कारण आता वय कमी होत आहे… म्हणजे… जगण्याचे वय! त्यामुळे कोणत्याही प्रकारचं सेलिब्रेशन नाही.’

View this post on Instagram

A post shared by Masaba (@masabagupta)

पुढे नीना गुप्ता म्हणाला, ‘सेलिब्रेशन नाही.. घरात बसली आहे.. एसी रुममध्ये कुटुंबासोबत.. आज आवडीचे पदार्थ बनवेल आणि खाईल…बस इतकंच… ‘ आईचा व्हिडीओ पोस्ट करत मसाबाने कॅप्शनमध्ये, ‘नीना यांचा वाढदिवस आहे – प्रत्येकजण वाढदिवसाच्या शुभेच्छा देवू शकतो…’

नीना गुप्ता यांच्या खासगी आयुष्याबद्दल प्रत्येकाला माहिती आहे. व्हिव्हियन रिचर्ड्स यांनी साथ सोडल्यानंतर नीना यांनी सिंगल मदर म्हणून लेकीचा सांभाळ केला. एवढंच नाहीतर, नीना यांनी विवाहित पुरुषाच्या प्रेमात पडू नका असा सल्ला देखील अनेक मुलींना दिला. अखेर २००८ मध्ये नीना गुप्ता यांनी वयाच्या ५४ व्या वर्षी विवेक मेहरा यांच्यासोबत लग्न केलं. आज वयाच्या ६४ व्या वर्षी देखील नीना गुप्ता अभिनय क्षेत्रात सक्रिय आहेत. ‘बधाई हो’ सिनेमानंतर ‘पंचायत’ या वेब सीरिजमुळे त्यांच्या लोकप्रियतेत प्रचंड वाढ झाली.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.