‘शारीरिक संबंध फक्त एक कर्तव्य…’, नीना गुप्ता वैवाहिक आयुष्याबद्दल असं का म्हणाल्या, ज्यामुळे…

Neena Gupta : नीना गुप्ता यांच्या वक्तव्याची सर्वत्र चर्चा... वैवाहिक आयुष्य आणि शारीरिक संबंधांबद्दल नीना गुप्ता यांचं मोठं वक्तव्य; म्हणाल्या, 'शारीरिक संबंध फक्त एक कर्तव्य...', अनेक मुद्द्यांवर नीना गुप्ता मांडतात स्वतःचं स्पष्ट मत..

'शारीरिक संबंध फक्त एक कर्तव्य...',  नीना गुप्ता वैवाहिक आयुष्याबद्दल असं का म्हणाल्या, ज्यामुळे...
Follow us
| Updated on: Dec 02, 2023 | 7:51 PM

मुंबई | 2 डिसेंबर 2023 : प्रसिद्ध आणि विवाहित खेळाडूसोबत प्रेमसंबंध, लग्नाआधी मुलीला जन्म… त्यानंतर आयुष्यात आलेल्या अनेक अडचणींमुळे अभिनेत्री नीना गुप्ता कायम चर्चेत राहिल्या. नीना गुप्ता कायम अनेक मुद्द्यांवर स्वतःचं स्पष्ट मत मांडत असतात. आता देखील नीना गुप्ता यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. पूर्वीच्या महिलांचं आयुष्य आणि सध्याच्या काळात महिला स्वतःचे निर्णय स्वतः घेत आहेत.. याबद्दल नीना गुप्ता यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. सध्या सर्वत्र नीना गुप्ता यांच्या वक्तव्याची चर्चा रंगत आहेत. शिवाय पती आणि कुटुंबाला आनंदी ठेवण्यासाठी महिला स्वतःच्या आनंदाचा करत असलेला त्याग…. इत्यादी गोष्टींबद्दल नीना गुप्ता यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

एका मुलाखातीत नीना गुप्ता म्हणाल्या, ‘आजच्या काळात अनेक महिला अशा आहेत, ज्या नको असलेल्या नात्यात अडकल्या आहेत. पण त्यांच्याकडे नात्यातून बाहेर येण्याचा कोणताही मार्ग नाही. प्रत्येक रोमाँटिक रिलेशनशिपची सुरुवात वासनेने सुरु होते. नोकरी, बुद्धीमत्ता, हुशारी इत्यादी गोष्टींमुळे तुम्ही आकर्षित होता. पण बायोलॉजीलक रिलेशनशिपमध्ये वासना असतेच…’

पुढे नीना गुप्ता म्हणाल्या, ‘माझ्या पिढीतील लोकांमध्ये शारीरिक संबंधांचं फार महत्त्व नव्हतं. शारीरिक संबंध फक्त एक कर्तव्य होतं. ज्यामुळे महिला पतीला संतुष्ट करु शकत होत्या. कधी कोणीही आम्हाला आमच्या आनंदाला प्राधान्य द्यायला शिकवलं नाही. महिलांनी फक्त पतीला आनंदी ठेवायला पाहिजे. नात्यात रोमान्स नसायचा…’

हे सुद्धा वाचा

‘महिलांना रोमान्स हवा असायचा, पण मागणी करण्याची परवानगी महिलांना नव्हती. माझ्या काळात महिला फक्त त्यांच्या मुलांसाठी जगायच्या. स्वतःवर लक्ष देणं महिलांनी सोडलं होतं. हेच चक्र कित्येक वर्ष सुरु होतं. महिलांना कायम स्वतःचं मन मारुन जगावं लागत होतं. घटस्फोट तर तेव्हा फार दूरची गोष्ट होती.’

आताच्या पिढीबद्दल नीना गुप्ता म्हणाल्या, ‘पण आता गोष्टी पूर्णपणे बदलत आहेत. मुली स्वतःच्या पायावर उभ्या आहेत. त्या स्वतःचे निर्णय स्वतः घेवू शकतात.’ नीना गुप्ता कायम त्यांच्या स्पष्ट वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. नीना गुप्ता कायम रिलेशनशिप आणि प्रेमाबद्दल बोलताना दिसतात.

नीना गुप्ता कायम त्यांच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असतात. नीना गुप्ता यांनी त्यांच्या खासगी आयुष्यामध्ये चढ – उतारांचा सामना केला. ‘पंचायत’ वेब सीरिज आणि ‘बधाई हो’ यांसारख्या सिनेमामध्ये महत्त्वाची भूमिका बजावत चाहत्यांचं मनोरंजन केलं.

वयाच्या 63 व्या वर्षी देखील नीना गुप्ता चाहत्यांचं मनोरंजन करत आहेत. सोशल मीडियावर देखील त्यांच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी नीना गुप्ता कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असतात.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.