‘मी कायम चुकीच्या पुरुषांसोबत…’, अभिनेत्रीने मुलीचं आयुष्य देखील केलं उद्ध्वस्त; म्हणते, ‘दुःख होतंय कारण…’

Relationship : वयाच्या 63 व्या वर्षी अभिनेत्रीने मान्य केल्या स्वतःच्या चुका; म्हणाली, 'मी कायम चुकीच्या पुरुषांसोबत...', नुकताच झालेल्या मुलाखतीत अभिनेत्री केलं मोठं वक्तव्य... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेत्रीच्या वक्तव्याची चर्चा...

'मी कायम चुकीच्या पुरुषांसोबत...', अभिनेत्रीने मुलीचं आयुष्य देखील केलं उद्ध्वस्त; म्हणते, 'दुःख होतंय कारण...'
Follow us
| Updated on: Nov 27, 2023 | 8:15 AM

मुंबई : 27 नोव्हेंबर 2023 | आयुष्यात अनेकदा अशा काही घटना घडतात ज्याचा आपण विचार देखील करु शकत नाही. ज्याचा परिणाम आपल्या जीवनावर होतो. अभिनेत्री नीना गुप्ता यांनी देखील वयाच्या 63 व्या वर्षी अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. नुकताच झालेल्या मुलाखतीत नीना गुप्ता यांनी स्वतःच्या आयुष्याबद्दल आणि मुलगी मसाबा हिच्या लग्नाबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. ‘मी कायम चुकीच्या पुरुषाला डेट केलं…’ एवढंच नाही तर लेकीच्या घटस्फोटाला देखील नीना गुप्ता यांनी स्वतःला जबाबदार ठरवलं आहे.. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त नीना गुप्ता यांच्या वक्तव्याची चर्चा रंगत आहे.

नुकताच झालेल्या मुलाखतीत नीना गुप्ता त्याच्या पतीबद्दल म्हणाल्या, ‘जेव्हा मी माझ्या पतीला भेटली तेव्हा ते विवाहित होते. त्यांना मुलं देखील होती. अशात आमच्या नात्यात अनेक अडचणी आहे. सुखी आयुष्यासाठी आणि कपल थेरपी घेतली. खरं तर, संवाद होणं फार गरजेचं असतं. मी भिंतींसोबत देखील बोलू शकते…’

पुढे नीना गुप्ता यांना रिलेशनशिपबद्दल काय सल्ला द्याल? यावर नीना गुप्ता म्हणाल्या, ‘रिलेशनशिपबद्दल सल्ला देण्यासाठी मी एक चुकीची व्यक्ती आहे. कारण मी कायम चुकीच्या पुरुषांना डेट केलं आहे. त्यामुळे मला रिलेशनशिपबद्दल नका विचारु कारण मी चुकीचं उत्तर देईल…’ असं देखील नीना गुप्ता म्हणाल्या.

हे सुद्धा वाचा

यावेळी नीना गुप्ता यांनी मुलगी मसाबा गुप्ता हिच्या आयुष्याबद्दल देखील मोठा खुलासा केला. ‘माझ्याकडून मोठी चुक झाली, जेव्हा मी मसाबा हिला लग्न करण्याचा सल्ला दिला. मसाबा हिला मधु मंतेना याच्यासोबत लिव्हइन रिलेशनशिपमध्ये राहायचं होतं. पण मी तिला लग्न करण्याचा सल्ला दिला. शेवटी त्यांचा घटस्फोट झाला… तेव्हा मला प्रचंड दुःख झालं…’ सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त नीना गुप्ता यांची चर्चा रंगत आहे.

नीना यांच्या रिलेशनशिपबद्दल सांगायचं झालं तर, नीना गुप्ता आणि विवियन अलेक्जेंडर रिचर्ड्स रिलेशनशिपमध्ये होते. पण दोघांचं नातं लग्नापर्यंत पोहोचू शकलं नाही. त्यानंतर Amlan Kusum Ghose यांच्यासोबत 1977 मध्ये लग्न केलं. पण दोघांचं लग्न फार काळ टिकलं नाही. त्यानंतर 2008 मध्ये नीना गुप्ता यांनी विवेक मेहरा यांच्यासोबत लग्न केलं.

नीना गुप्ता कायम त्यांच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असतात. नीना गुप्ता गेल्या काही दिवसांपासून वेग-वेगळ्या भूमिकांमध्ये दिसत आहे. ‘बधाई हो..’ सिनेमानंतर त्यांच्या लोकप्रियतेत मोठी वाढ झाली… सोशल मीडियावर देखील नीना गुप्ता कायम चर्चेत असतात.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.