नीना गुप्ता यांना बॉयफ्रेंड सतत मारयचा टोमणे, ‘लाज वाटली पाहिजे, तू…’
Neena Gupta | मोफत जेवण मिळवण्यासाठी नीना गुप्ता यांनी हॉटेलमध्ये केलंय काम, तेव्हा बॉयफ्रेंड सतत मारायचा टोमणे, खुद्द नीना गुप्ता यांनी सांगितलं कसे होती आयुष्यातील वाईट दिवस... नीना गुप्ता कायम त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल सांगत असतात... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त नीना गुप्ता यांची चर्चा...
अभिनेत्री नीना गुप्ता अशा अभिनेत्रींपैकी एक आहेत, ज्यांनी स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर बॉलिवूडमध्ये स्थान पक्क केलं आहे. आज नीना गुप्ता अनेकांच्या मनावर राज्य करतात. वयाच्या 64 व्या वर्षी देखील नीना गुप्ता बॉलिवूडमध्ये सक्रिय आहेत. पण एका काळ असा होता, जेव्हा नीना गुप्ता भूक भागवण्यासाठी हॉटेलमध्ये काम करायच्या… पोटाची भूक भागवण्यासाठी आणि बॉलिवूडमध्ये स्वतःचं करियर करण्यासाठी नीना गुप्ता यांनी अनेक संकटांचा सामना केला आहे. खुद्द नीना गुप्ता आयुष्यात घडलेल्या गोष्टी चाहत्यांसोबत शेअर करत असतात.
नीना गुप्ता हॉटेलमध्ये काम करत असल्यामुळे अभिनेत्रीचा बॉयफ्रेंड त्यांनी टोमणे देखील मारायचा… ‘मुंबईत आल्यानंतर मी कॅफेमध्ये काम करायचे. त्यामुळे मला बॉयफ्रेंड म्हणायचा, ‘तुला लाज वाटली पाहिजे, तू मुंबईत मोलकरीण व्हायला आली आहेस, हे सगळं करायला आली आहेस?… ‘ एवढंच नाही तर नीना गुप्ता यांचा एक्स – बॉयफ्रेंड त्यांच्याकडून सिगारेटसाठी देखील पैसे मागायचा…’
‘मला कोणत्या कामाची लाज वाटत नाही…’ असं देखील नीना गुप्ता मुलाखतीत म्हणाल्या होत्या. ‘मला कामाची लाज वाटत नाही. पण मला कोणाकडून पैसे मागयची प्रचंड लाज वाटते…फर्शी साफ करण्यापासून भांडी धुण्यापर्यंत मी सर्व कामे केली आहेत. माझ्या घरी घरकाम करण्यासाठी कोणीही नव्हतं. आमचं घर देखील आम्ही स्वतः साफ करायचो… त्यामुळे काम करायला मला लाज वाटत नाही…’ असं देखील नीना गुप्ता म्हणाल्या.
सोशल मीडियावर देखील नीना गुप्ता यांच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी नीना गुप्ता कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असतात. नीना गुप्ता कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात.
सांगायचं झालं तर, नीना गुप्ता फक्त त्यांच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे नाहीतर, खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असतात. सोशल मीडियावर देखील त्यांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. महत्त्वाची गोष्ट म्हणजे ‘बधाई हो…’ सिनेमा आणि ‘पंचायत’ या वेब सीरिजमुळे नीना गुप्ता यांच्या लोकप्रियतेत मोठी वाढ झाली.