नीता अंबानींची लहान सून राधिका मर्चंटचं फिटनेस सिक्रेट, स्वतःला फिट ठेवण्याचं मोठं रहस्य

Anant Ambani-Radhika Merchant Pre-Wedding | फक्त नीता अंबानी यांची लहान सून नाहीतर, भारतातील असंख्य मुलींचं फिटनेस सिक्रेट आहे 'ही' एक गोष्ट, सध्या सर्वत्र नीता अंबानी यांच्या लहान सूनेच्या फिटनेस आणि सौंदर्याचीच चर्चा...

नीता अंबानींची लहान सून राधिका मर्चंटचं फिटनेस सिक्रेट, स्वतःला फिट ठेवण्याचं मोठं रहस्य
Follow us
| Updated on: Feb 29, 2024 | 12:17 PM

मुंबई | 29 फेब्रुवारी 2024 : जगातील प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी आणि पत्नी नीता अंबानी यांचा लहान मुलगा अनंत अंबानी यांच्या लग्नाची तयारी सुरु आहे. अनंत अंबानी यांचे लग्न एनकोर हेल्थकेअरचे सीईओ वीरेन मर्चेंट यांची मुलगी राधिका मर्चंट यांच्यासोबत होणार आहे. 12 जुलै रोजी अनंत आणि राधिका यांचं लग्न होणार आहे. अंबानी कुटुंबाच्या लहान सूनेबद्दल सांगायचं झालं तर, राधिका फक्त उच्च शिक्षित नाही तर, शास्त्रीय नृत्यांगना देखील आहेत. राधिका यांनी जवळपास 8 वर्ष भरटनाट्यम नृत्याचं शिक्षण घेतलं आहे.

राधिका मर्चंट यांच्या सौंदर्याचं आणि फिटनेसचं सिक्रेट भरतनाट्यम नृत्य आहे. शास्त्रीय नृत्य फक्त एक नृत्याचा प्रकार नाही तर, शास्त्रीय नृत्यामुळे आरोग्य देखील उत्तम राहातं. नृत्य आरोग्यासाठी लाभदायक ठरतं. असंख्य फिटनेस एक्सपर्ट शास्त्रीय नृत्याला शरीरासाठी प्रचंड गरजेचं आणि लाभदायक मनतात.

शास्त्रीय नृत्यामध्ये अनेक प्रकारचे भाव असतात. चेहऱ्यावरचे भाव, डोळ्याची नजाकत, मुद्रा, चक्कर, शास्त्रीय नृत्यात असलेल्या अनेक गोष्टींमुळे आरोग्य उत्तम राहतं… अंबानी कुटुंबाच्या होणाऱ्या सूनबाईच नाहीतर, नीता अंबानी देखील प्रसिद्ध आणि उत्तम भरतनाट्यम नृत्यांगना आहेत. देशातील अनेक मुली आणि मुलं देखील भरतनाट्यम नृत्याचं प्रशिक्षण घेतात.

हे सुद्धा वाचा

राधीका मर्चंट यांची संपत्ती

राधिका यांनी परदेशातून पॉलिटिकल आणि इकोनॉमिक्स या विषयांमध्ये शिक्षण घेतल्यानंतर फॅमिली बिझनेस सांभाळत आहे. राधिका एनकोर हेल्थकेयरच्या बोर्ड ऑफ डायरेक्टरमध्ये सामिल आहे. राधिकाच्या नेट वर्थबद्दल सांगायचं झालं तर राधिका यांच्याकडे जवळपास 10 कोटी रुपयांची संपत्ती आहे.

राधिकाच्या वडिलांकडे जवळपास 755 कोटी रुपयांची संपत्ती आहे. राधिकाचे वडील विरेन मर्चंट देखील भारतातील प्रसिद्ध उद्योजक आहेत. अंबानी कुटुंबाची सून झाल्यानंतर राधिकाच्या संपत्तीत आणखी वाढ होईल. वडिलांच्या संपत्तीची राधिका एकटी वारसदार आहे.

सांगायचं झालं तर, सध्या सर्वत्र राधिका आणि अनंत याच्या लग्नाची चर्चा रंगली आहे. अंबानी कुटुंबाने अनंत-राधिकाच भव्य प्री-वेडिंग आयोजित केलं आहे. प्री-वेडिंगच ग्रँड फंक्शन 1 ते 3 मार्च दरम्यान गुजरातच्या जामनगरमध्ये होणार आहे. लग्नाआधीच्या या सेलिब्रेशनमध्ये बॉलिवूड स्टार्सपासून राजकीय क्षेत्रातील बडे नेते, उद्योजक आणि आंतरराष्ट्रीय पाहुणे सहभागी होणार आहेत.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.