नात राहावरून आलियासोबत झालं भांडणं; नीतू कपूर यांचा खुलासा, सोनी राजदान यांच्यासोबतही वाजलं

राहाच्या जन्मापासूनच रणबीर आणि आलियाने तिच्या फोटोंबद्दल महत्त्वाचा निर्णय घेतला होता. तिचे फोटो कुठेच पोस्ट करायचे नाहीत किंवा पापाराझींना क्लिक करू द्यायचे नाहीत, असा त्यांचा आग्रह होता. अखेर ख्रिसमसनिमित्त त्यांनी राहाला सर्वांसमोर आणलं.

नात राहावरून आलियासोबत झालं भांडणं; नीतू कपूर यांचा खुलासा, सोनी राजदान यांच्यासोबतही वाजलं
राहावरून आलियासह तिच्या आईसोबतही झालं भांडणImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jan 11, 2024 | 1:36 PM

मुंबई : 11 जानेवारी 2024 | निर्माता-दिग्दर्शक करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण 8’ या चॅट शोमध्ये नुकतीच अभिनेत्री नीतू कपूर आणि झीनत अमान यांनी हजेरी लावली. 70-80 च्या दशकातील या लोकप्रिय अभिनेत्रींनी या शोमध्ये मनमोकळ्या गप्पा मारल्या. यावेळी नीतू कपूर यांनी त्यांच्या खासगी आयुष्यातील काही किस्से सांगितले. त्यापैकी एक किस्सा हा सून आलिया भट्ट आणि तिची आई सोनी राजदान यांच्याविषयीचा आहे. नात राहा कपूरवरून आलिया आणि तिच्या आईसोबत झालेल्या भांडणाचा प्रसंग नीतू यांनी यावेळी सांगितला.

नात राहा कपूर एक वर्षाची झाल्याबद्दल आधी करण जोहरने नीतू कपूर यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी नीतू यांनी तिच्याबद्दलचा मजेशीर किस्सा सांगितला. राहावरून सून आलिया भट्ट आणि तिची आई सोनी राजदान यांच्यासोबत भांडणं होत असल्याचं त्यांनी सांगितलं. “राहा आता मोठी होतेय. त्यामुळे तिने पापा बोलावं असं मी शिकवण्याचा प्रयत्न करतेय. पण सोनी राजदान यांना असं वाटतं की तिने मम्मा आधी बोलावं,” असं त्या पुढे सांगतात. हे ऐकून करण जोहर हसतो आणि चकीत होऊन विचारतो, “या कारणामुळे तुमच्यात घरी भांडणं होतात?” त्यावर उत्तर देताना नीतू कपूर एक प्रसंग सांगतात.

हे सुद्धा वाचा

“मी एके दिवशी जेव्हा त्यांच्या घरी गेले, तेव्हा आलियाने सांगितलं की राहाने मम्मा असं म्हटलंय. त्यावर मी तिला उत्तर दिलं की तिने मम्मा नाही तर मम-मम असं म्हटलंय. त्यामुळे तू जास्त खुश होऊ नकोस. मी तिला पुढे असंही सांगितलं की राहा दा-दा बोलते, ना-ना नाही”, असं नीतू म्हणाल्या. घरातील हे छोटे-मोठे किस्से ऐकून करण जोहरसह झीनत अमानसुद्धा हसू लागतात.

या चॅट शोमध्ये नीतू कपूर या राहाच्या नावाबद्दलही व्यक्त झाल्या. “मी जेव्हा कधी तिला पाहते, तेव्हा मला खूप शांत वाटतं. तिच्यासाठी हे नाव परफेक्ट आहे. तिच्याकडे पाहून अत्यंत समाधानाची भावना माझ्या मनात येते. राहाचा चेहरा अत्यंत सुंदर आणि प्रसन्न आहे”, असं त्या पुढे म्हणाल्या.

ख्रिसमसनिमित्त रणबीर कपूर आणि आलिया भट्टने अखेर त्यांची मुलगी राहाचा चेहरा सर्वांना दाखवला. दरवर्षी ख्रिसमसनिमित्त कपूर कुटुंबीय एकत्र येतात. लंचच्या आधी रणबीर आणि आलिया राहाला घेऊन पापाराझींसमोर आले होते. राहाचा चेहरा पाहून तिचे डोळे हुबेहूब रणबीरचे आजोबा ऋषी कपूर यांच्यासारखेच असल्याच्या प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.