आलिया – रणबीर यांच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण, नीतू यांच्या खास पोस्टमध्ये ऋषी कपूर यांची झलक

कपूर कुटुंबिय आजही ऋषी कपूर यांच्या आठवणीत..., आलिया - रणबीर यांच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण... नीतू यांच्या पोस्टमध्ये दिसली ऋषी यांची एक झलक... सध्या सर्वत्र नीतू कपूर यांच्या पोस्टची चर्चा..

आलिया - रणबीर यांच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण, नीतू यांच्या खास पोस्टमध्ये ऋषी कपूर यांची झलक
Follow us
| Updated on: Apr 14, 2023 | 3:42 PM

मुंबई : अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट हे दोघे कायम त्यांच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असतात. अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर आलिया आणि रणबीर यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. आज त्यांच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण झालं आहे. गेल्यावर्षी याच दिवशी दोघांनी कमी लोकांच्या उपस्थितीत लग्न केलं. दोघांच्या लग्नाची देखील तुफान चर्चा रंगली. आलिया आणि रणबीर यांच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण झाल्यामुळे चाहत्यांसह कुटुंबाने देखील दोघांना शुभेच्छा दिल्या आहे. सोनी राजदान, नीतू कपूर यांनी देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून आलिया आणि रणबीर यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

आलिया आणि रणबीर यांचा फोटो शेअर करत सोनी राजदान म्हणाल्या, ‘गेल्या वर्षी या खास दिवशी माझ्या स्वीटहार्टने चांगल्या वाईट काळत एकमेकांना साथ देण्याचं वचन दिलं… दोघांच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा… नव्या प्रवासासाठी देखील खूप शुभेच्छा…’ सध्या सर्वत्र आलियाच्या आईने लेक आणि जावयाला दिलेल्या शुभेच्छांची चर्चा रंगत आहे.

नीतू कपूर यांनी देखील आलिया आणि रणबीर यांना शुभेच्छा दिल्या आहेत. नीतू कपूर यांनी देखील इन्स्टाग्रामवर स्टोरीवर दोघांचा फोटो शेअर केला आहे. फोटो शेअर करत त्यांनी कॅप्शनमध्ये, ‘प्रेमळ आणि सुंदर कपलसाठी लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा… माझ्याकडून प्रेम आणि शुभेच्छा…’ महत्त्वाचं म्हणजे नीतू कपूर यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये दिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांची देखील एक झलक दिसत आहे.

हे सुद्धा वाचा

सध्या सर्वत्र नीतू कपूर यांनी शेअर केलेल्या फोटो आणि कॅप्शनची चर्चा आहे. आलिया आणि रणबीर यांच्या लग्नात देखील नीतू कपूर प्रचंड आनंदी दिसत होत्या. शिवाय अनेकदा त्यांना आलिया आणि रणबीर यांच्यासोबत देखील स्पॉट करण्यात आलं. एवढंच नाही तर, त्या कायम आलिया आणि रणबीर यांच्या नात्याबद्दल सांगत असतात.

गेल्या वर्षी १४ एप्रिल २०२२ मध्ये आलिया आणि रणबीर यांनी कमी पाहुण्यांच्या उपस्थितीत लग्न केलं. लग्नाच्या चार महिन्यांनंतर आलियाने सोनोग्राफीचा फोटो शेअर करत प्रेग्नेंट असल्याची आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली. तेव्हा देखील आलिया तुफान चर्चेत आली.

६ नोव्हेंबर २०२२ रोजी आलियाने गोंडस मुलीला जन्म दिला. आलिया आणि रणबीर यांनी त्यांच्या मुलीचं नाव राहा कपूर असं ठेवलं आहे. आलिया आणि रणबीर कायम त्यांच्या मुलीबद्दल सांगत असतात. पण दोघांनी अद्याप चाहत्यांना राहाचा चेहरा दाखवलेला नाही. आलिया आणि रणबीर यांनी राहासाठी ‘नो फोटो’ पॉलिसी कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.