Neetu Kapoor यांच्या लेकीला किचनमध्ये काम करण्यास सक्त मनाई, जावयाने घेतला मोठा निर्णय

Neetu Kapoor | नीतू कपूर यांचे जावई पत्नीला किचनमध्ये देखील जावू देत नाहीत, 'त्या' घटनेनंतर रिद्धिमा कपूर हिच्या पतीने घेतला मोठा निर्णय... सध्या सर्वत्र नीतू कपूर यांची मुलगी आणि जावयाची चर्चा... नीतू कपूर यांच्या मुलीबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे... रिद्धिमा झगमगत्या विश्वापासून असते दूर...

Neetu Kapoor यांच्या लेकीला किचनमध्ये काम करण्यास सक्त मनाई, जावयाने घेतला मोठा निर्णय
Follow us
| Updated on: Sep 23, 2023 | 8:23 PM

मुंबई : 23 सप्टेंबर 2023 | कपूर कुटुंब बॉलिवूडमधील लोकप्रिय आणि प्रसिद्ध कुटुंब आहे. कपूर कुटुंबाबद्दल अनेक गोष्टी जाणून घेण्यासाठी चाहते कायम उत्सुक असतात. कपूर कुटुंबाच्या मुली करिष्मा कपूर आणि करीना कपूर यांच्याबद्दल प्रत्येकाला माहिती आहे. पण दिवंगत अभिनेते ऋषी कपूर आणि अभिनेत्री नीतू कपूर यांची मुलगी रिद्धिमा कपूर हिच्याबद्दल फार कमी लोकांना महिती आहे. रिद्धिमा कपूर कुटुंबाची लेक असली तरी, झगमगत्या विश्वापासून दूर असते. रिद्धिमा आज तिच्या खासगी आयुष्यात पत्नी आणि मुलीसोबत आनंदी आहे. रिद्धिमा हिच्या पतीचं नाव भरत साहनी असं आहे. त्यांच्या लग्नाला १७ वर्ष पूर्ण झाली आहेत. दरम्यान, रिद्धिमा आणि भरत यांच्याबद्दल एक मोठी गोष्ट समोर येत आहे. स्वयंपाक घरात जायचं नाही… अशी सक्त मनाई भरत यांनी पत्नीला केली आहे.

नुकताच झालेल्या एका मुलाखतीत, रिद्धिमाने तिच्या खासगी आयुष्याबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या. लॉकडाऊन दरम्यान रिद्धिमा गॉर्डन रामसे यांचा कुकिंग शो पाहायची. लग्नाआधी स्वयंपाक शिकून घे… असा सल्ला रिद्धिमला आई नीतू कपूर यांनी दिला होता. पण लग्नानंतर भरत यांनी पत्नीला किचनमध्ये काम करण्यास सक्त मनाई केली.

रिद्धिमाला विचारलं, ‘गॉर्डन रामसे यांचा कुकिंग शो पाहिल्यानंतर तू कोणती रेसीपी बनवली? यावर नकार देत रिद्धिमा म्हणाली, ‘पती आणि लेकीसाठी मी पास्ता बनवते आणि दोघांना मी बनवलेला पास्ता प्रचंड आवडतो. जेव्हा मी लग्न करणार होती, तेव्हा आई मला कायम स्वयंपाक शिकून घे असं सांगायची. कारण पंजाबी कुटुंबात जाणार होती… तिकडे सर्वांना नवीन पदार्थ आवडत होते….’

हे सुद्धा वाचा

पुढे रिद्धिमा म्हणाली, ‘लग्नानंतर विविध प्रकारचे पदार्थ बनवायची. ज्यामुळे माझ्या पतीचं वजन ९० किलो झालं होतं. म्हणून त्यांनी मला स्वयंपाक करू नको असं सांगितलं. भरत यांचं सतत वजन वाढत असल्यामुळे मी स्वयंपाक करणं बंद केलं…. मझ्या मुलीला आणि पतीला मी बनवलेले पदार्थ आवडतात. पण त्यांचं वाढतं वजन पाहून मी नवनवीन पदार्थ तयार करणं बंद केलं…’

रिद्धिमा कायम तिच्या कुटुंबासोबत सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत असते. अभिनेता रणबीर कपूर याच्या लग्नात देखील सर्वांचं लक्ष रिद्धिमा हिच्या सौंदर्यावर येवून थांबलं… रिद्धिमाने अभिनेत्री करिश्मा कपूर आणि करीना कपूर यांच्याप्रमाणे बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं नाही. पण सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे.

भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार.
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?.
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?.
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'.
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत...
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत....
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच.
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?.
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी.
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम.
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?.