Adipurush | ओम राऊत यांचे 500 कोटी पाण्यात, नेटकऱ्यांनी थेट ‘आदिपुरुष’ला म्हटले PUBG, संताप व्यक्त करत…

ओम राऊत यांचा बहुचर्चित आदिपुरुष हा चित्रपट नुकताच रिलीज झालाय. विशेष म्हणजे या चित्रपटाकडून निर्मात्यांना मोठ्या अपेक्षा आहेत. सैफ अली खान या चित्रपटात रावणाच्या भूमिकेत आहे. चित्रपट धमाकेदार कमाई करणार असल्याचे सांगितले जात आहे.

Adipurush | ओम राऊत यांचे 500 कोटी पाण्यात, नेटकऱ्यांनी थेट 'आदिपुरुष'ला म्हटले PUBG, संताप व्यक्त करत...
Follow us
| Updated on: Jun 16, 2023 | 10:00 PM

मुंबई : ओम राऊत यांचा आदिपुरुष (Adipurush) हा चित्रपट नुकताच 16 जूनला रिलीज झालाय. हा चित्रपट प्रचंड चर्चेत होता. मुळात म्हणजे हा चित्रपट रिलीज होण्याच्या अगोदर मोठा वाद हा सातत्याने बघायला मिळाला. आदिपुरुष चित्रपटाचा टिझरमध्येही लोकांनी ढिगभर चुका काढल्या. सतत चित्रपट निर्माते चित्रपटामध्ये बदल करताना दिसले. शेवटी मोठ्या वादानंतर आता आदिपुरुष हा चित्रपट (Movie) प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. ओम राऊत यांना या चित्रपटाकडून प्रचंड अशा अपेक्षा या नक्कीच आहेत. आदिपुरुष चित्रपटाने धमाकेदार ओपनिंग केल्याचे अनेक रिपोर्टमध्ये सांगण्यात आलंय. मात्र, सोशल मीडियावर (Social media) चित्रपट नेटकऱ्यांच्या निशाण्यावर दिसत आहे.

आदिपुरुष हा चित्रपट अत्यंत बिग बजेटचा आहे. या चित्रपटाला तब्बल 500 कोटी रूपये लागले आहे. प्रभास हा या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. सैफ अली खास हा देखील रावणाच्या भूमिकेत आहे. मात्र, अनेकांनी सैफ अली खान याच्या लूकची खिल्ली उडवल्याचे बघायला मिळत आहे. या चित्रपटाबद्दल नकारात्मक प्रतिक्रिया या मोठ्या प्रमाणात बघायला मिळत आहेत.

आदिपुरुष चित्रपट बघून आलेल्या एका व्यक्तीने तर थेट आदिपुरुष चित्रपट बघितला की, PUBG बघितला हेच कळाले नसल्याचे म्हटले आहे. चित्रपट PUBG गेम सारखाच असल्याचे म्हणत त्या व्यक्तीने चित्रपटाची खिल्ली उडवल्याचे बघायला मिळाले. एकाने हनुमान जीच्या रोलचे काैतुक करत म्हटले की, हनुमानजीचा रोल सोडला तर चित्रपटात बाकी काहीच बघण्यासारखे नाहीये.

अजून एकाने चित्रपटाबद्दल बोलत म्हटले की, रामायणच्या मानाने चित्रपट अजिबातच चांगला नाहीये. आम्ही नक्कीच या चित्रपटाकडून खूप जास्त वेगळ्या अपेक्षा होत्या. मात्र, एखादा व्हिडीओ बघितल्यासारखा चित्रपट वाटला. एकाने तर थेट म्हटले की, कॉमेडी चित्रपट म्हटले तर हा चित्रपट जबरदस्त आहे. रामायण नाही तर हा कॉमेडी चित्रपट वाटत आहे. लोक चित्रपटावर टीका मोठ्या प्रमाणात करताना दिसले आहेत.

अजून एका व्यक्तीने सांगितले की, ज्यावेळी तुम्ही चित्रपट पाहाल तर हसून हसून पागल नक्कीच व्हाल. आदिपुरुष चित्रपटाबद्दल मोठ्या प्रमाणात नकारात्मक कमेंट येताना दिसत आहेत. अनेकांनी सोशल मीडियावर थेट पोस्ट शेअर करत आदिपुरुष चित्रपटाची खिल्ली उडवली आहे. पुढील काही दिवसांमध्ये चित्रपट बाॅक्स आॅफिसवर धमाल करेल असेही सांगितले जात आहे. आता हा चित्रपट नेमका काय धमाका करतो हे पाहण्यासारखे ठरणार आहे.

धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.