लग्नाआधी राहिली प्रेग्नेंट, सिनेमांमध्ये काम मिळणं कठीण, तरीही रॉयल आयुष्य जगते ‘ही’ अभिनेत्री

Actress Luxury Life: 10 - 20 नाही तर, 75 महिलांसोबत प्रेमसंबंध असणाऱ्या अभिनेत्यासोबत लग्न, अभिनेत्री लग्नाआधी राहिली प्रेग्नेंट, आज तिच्यासाठी सिनेमांमध्ये काम मिळणं कठीण, तरीरी जगते रॉयल आयुष्य, आहे गडगंज संपत्तीची मालकीण

लग्नाआधी राहिली प्रेग्नेंट, सिनेमांमध्ये काम मिळणं कठीण, तरीही रॉयल आयुष्य जगते 'ही' अभिनेत्री
Follow us
| Updated on: Aug 27, 2024 | 9:45 AM

झगमगत्या विश्वात अनेक अभिनेत्री बॉलिवूडची टॉप अभिनेत्री होण्याचं स्वप्न घेवून येतात. काही अभिनेत्रींचं हे स्वप्न पूर्ण होतं, तर काहींच्या वाट्याला मात्र निराशा येते. पण बॉलिवूडमध्ये काही अशा अभिनेत्री देखील आहेत, ज्यांना सिनेमांमध्ये काम करण्याची संधी तर मिळाली, पण बॉलिवूडच्या अव्वल अभिनेत्रींच्या यादीत त्यांना स्वतःची ओळख निर्माण करता आली नाही. पण अभिनेत्री त्यांच्या खासगी आयुष्यामुळे तुफान चर्चेत आल्या. आता देखील अशाच एका अभिनेत्रीची चर्चा रंगली आहे, ज्या अभिनेत्रीने अनेक सिनेमांमध्ये काम तर केलं. पण झगमगत्या विश्वात लोकप्रिय अभिनेत्री म्हणून स्वतःचं स्थान निर्माण करता आलं नाही.

अभिनेत्रीला आता सिनेमांमध्ये काम मिळणं कठीण झालं आहे. पण अभिनेत्री कुटुंबासोबत रॉयल आयुष्य जगते. सध्या ज्या अभिनेत्रीची चर्चा रंगली आहे ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री नेहा धुपिया आहे. नेहा आज 43 वा वाढदिवस साजरा करत आहे. त्यामुळे तिच्या आयुष्यातील काही खास गोष्टी जाणून घेऊ…

नेहा धुपाया हिने ‘कयामत’ सिनेमातून करियरची सुरुवात केली. पण अभिनेत्रीला खरी ओळख ‘जुली’ सिनेमातून मिळाली. त्यानंतर अभिनेत्रीने कधीच मागे वळून पाहिलं नाही. अभिनेत्रीने ‘शीशा’ आणि ‘चुप चुपके’ सिनेमात देखील दमदार भूमिका बजावली. पण नेहा गेल्या अनेक दिवसांपासून अभिनेत्री मोठ्या पडद्यापासून दूर आहे.

हे सुद्धा वाचा

सिनेमांमध्ये काम करत नसली तरी, नेहा रॉयल आयुष्य जगते. अभिनेत्री सोशल मीडियावर कायम तिचे खासगी फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. आता नेहा टीव्ही विश्वातून अधिक कमाई करते. शिवाय जाहिराती आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील अभिनेत्री कोट्यवधींची कमाई करते.

नेहा धुपिया हिच्या संपत्ती बद्दल सांगायचं झालं तर, रिपोर्टनुसार, अभिनेत्रीकडे जवळपास 37 कोटी रुपयांची संपत्ती आहे. एका सिनेमासाठी अभिनेत्री 40 ते 50 लाख रुपये घेते. शिवाय अभिनेत्रीकडे महागड्या गाड्यांचं कलेक्शन देखील आहे.

नेहा धुपिया हिच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्रीने अभिनेता अंगद बेदी याच्यासोबत लग्न केलं. पण लग्नाआधी अंगद बेदी याच्या 10 – 20 नाही तर तब्बल 75 गर्लफ्रेंड्स होत्या. लग्नाआधीच नेहा प्रेग्नेंट राहिल्यामुळे दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

लग्नानंतर नेहा हिने मुलीला जन्म दिला. नेहा धुपिया आणि अंगद बेदी आता दोन मुलांचे आई – वडील आहेत. दोघांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. नेहा सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.