Neha Dhupia Baby Boy : नेहा धुपिया पुन्हा एकदा आई झाली, पोराच्या जन्मावर बापाचा भांगडा, अंगद म्हणाला..
बॉलिवूडची दमदार अभिनेत्री नेहा धुपिया पुन्हा एकदा आई झाली आहे. अभिनेत्रीने एका सुंदर गोंडस मुलाला जन्म दिला आहे. नेहा धुपियाचा पती अंगद बेदीने मुलाच्या जन्माविषयी पोस्ट करत याबद्दल चाहत्यांना माहिती दिली आहे .
मुंबई : बॉलिवूडची दमदार अभिनेत्री नेहा धुपिया पुन्हा एकदा आई झाली आहे. अभिनेत्रीने एक सुंदर गोंडस मुलाला जन्म दिला आहे. नेहा धुपियाचा पती अंगद बेदीने मुलाच्या जन्माविषयी पोस्ट करत याबद्दल चाहत्यांमाहिती दिली आहे . नेहा धुपिया आणि अंगद बेदी यांनी रविवारी आपल्या दुसऱ्या मुलाचे स्वागत केले. वडील बनून अंगदला इतका आनंद झाला की त्याने भांगडा करत इन्स्टा स्टोरीवर एक फोटो शेअर केला आणि चाहत्यांना नवीन पाहुण्याच्या आगमनाची माहिती दिली आहे.
जुलै महिन्यात नेहा आणि अंगदने सोशल मीडियावर फोटो शेअर करून चाहत्यां नेहाच्या गर्भधारणेची माहिती दिली. या फोटोमध्ये पती अंगद बेदी आणि मुलगी मेहर नेहासोबत दिसली होती.आता नेहा पुन्हा आई झाल्याच्या बातमीने सर्वजण आनंदी आहेत.
View this post on Instagram
आज अंगद बेदीने नेहा धुपियासोबतचा एक फोटो शेअर करून चाहत्यांसाठी आनंदाची बातमी दिली आहे. अभिनेत्याने लिहिले आहे की ” आज सर्वात श्रेष्ठ शक्तीने आम्हाला मुलाचा आशीर्वाद दिला. नेहा आणि बाळ दोघेही ठीक आहेत. मेहर नवीन आलेल्या पाहुण्याला ‘बेबी’ बोलण्यासाठी आतुर झाली आहे. #Bedisboy असा हॅशटॅग देऊन त्यांनी दोन हार्टचे इमोजी देखील टाकले आहेत.
पुढे अंगद लिहतो ‘वाहेगुरू मेहेर @nehadhupia या प्रवासात एक शूर योद्धा असल्याबद्दल तुझे धन्यवाद. आता आपण आपल्या प्रार्थनांद्वारे आपल्या चौघांसाठी एक सस्मरणीय बनवूया. अंगदच्या या पोस्टवर त्याला खूप प्रेम मिळत आहे. प्रत्येकजण नेहा आणि तिच्या प्रियकराच्या चांगल्या आरोग्यासाठी प्रार्थना करत आहे.
नेहा धुपिया आणि अंगद बेदी यांनी मे 2018 मध्ये लग्नाच्या बंधनात अडकले. विशेष गोष्ट म्हणजे त्याच वर्षी 18 नोव्हेंबर रोजी तिने तिच्या मुलीला जन्म दिला. या काळात लग्नाआधी झालेल्या प्रेग्नेंसीची बातमीमुळे नेहा चांगलीच प्रसिद्धीझोतात आली होती.लग्नानंतर थोड्याच वेळात त्यांच्या मुलीचा जन्म झाला. खरं तर, नेहा लग्नापूर्वी गर्भवती झाली होती, ज्यामुळे तिला घाईघाईत लग्न करावे लागले. अशा परिस्थितीत आता नेहा पुन्हा आई झाल्याच्या बातमीने तिचे चाहते खूप आनंदी आहेत.
नेहा धुपिया नुकतीच ‘देवी’ या लघुपटामध्ये दिसली होती. आता नेहा ‘ सनक’ मध्ये दिसणार आहे. विद्युत जामवाल ‘सनक’मध्ये मुख्य भूमिकेत आहेत.