नेहा कक्करने आदित्यला विचारली लव्हस्टोरी, भर शोमध्ये केला प्रेमाचा खुलासा
आदित्य नारायण यांनी नुकत्याच त्याच्या शो दरम्यान नात्याविषयी एक मोठा खुलासा केला आहे. त्याची लव्हस्टोरी खूपच गमशीर असल्याचं यावेळी त्याने म्हटलं.
मुंबई : बॉलिवूडमधील स्टार अभिनेता, गायक आणि होस्ट आदित्य नारायण हा लग्नबंधनात अडकल्यापासून चांगलाच चर्चेत आहे. गेल्या महिन्यात आदित्य नारायणने त्याची प्रेयसी श्वेता अग्रवालसोबत लग्न केलं. यावेळी तो इंडियन आयडल या सिंगिंग रिअॅलिटी शोचा होस्टही होता. आदित्य नारायण यांनी नुकत्याच त्याच्या शो दरम्यान नात्याविषयी एक मोठा खुलासा केला आहे. त्याची लव्हस्टोरी खूपच गमशीर असल्याचं यावेळी त्याने म्हटलं. (Neha Kakkar asked Aditya about love story aditya narayan revealed about his lovestory on indian idol set)
फॅमिली एपिसोडमध्ये श्वेता अग्रवालही शोमध्ये पोहोचली
इंडियन आयडॉल या कार्यक्रमाच्या फॅमिली स्पेशल एपिसोडमध्ये आदित्यची पत्नी श्वेता अग्रवाल, वडील उदित नारायण आणि आई दीपा नारायणसुद्धा आले होते. सोनी टीव्हीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर या भागाचा प्रोमोही शेअर केला होता. या प्रोमोमध्ये शोची जज नेहा कक्कर आदित्य आणि श्वेताला त्यांच्या लव्हस्टोरीविषयी विचारत आहे.
पहिल्याच नजरेत पडला श्वेताच्या प्रेमात
श्वेता अग्रवाल आणि आदित्यची पहिली भेट ही 2010 मध्ये झाल्याचं श्वेताने सांगितलं. ती त्याला एका सिनेमाच्या सेटवर भेटली होती. यावेळी श्वेताने आणखी एक खास गोष्ट उघड केली आहे. ज्यामध्ये तिला पटवण्यासाठी आदित्यला खूप वाट पाहावी लागली असं तिने म्हटलं आहे. यावर मला तर पहिल्यांदा पाहताच प्रेम झालं होतं अशी कबुली आदित्यने भर कार्यक्रमात दिली.
आईचीही आहे महत्त्वाची भूमिका
श्वेता आणि माझं नात टिकावं यासाठी आईची महत्त्वाची भूमिका असल्याचंही आदित्यने उघड केलं आहे. सुरुवातीला श्वेताने प्रेमाचं प्रपोझल स्वीकारलं नव्हतं. एकदा त्याने याबद्दल आईला सांगितलं आणि पुढच्या वेळी आईचीची श्वेताशी गाठ घालून दिली. यानंतर श्वेता आणि आदित्यचं प्रेम प्रकरण सुरू झाल्याचं त्याने स्टेजवर सांगितलं. (Neha Kakkar asked Aditya about love story aditya narayan revealed about his lovestory on indian idol set)
संबंधित बातम्या –
Fighter | अखेर चाहत्यांची प्रतीक्षा संपली, हृतिकने ‘या’ चित्रपटाची केली घोषणा!
Self Obsessed | कंगना रनौतने स्वतःची तुलना केली अमिताभ बच्चन यांच्याशी, म्हणते तापसी माझी मोठी फॅन!
(Neha Kakkar asked Aditya about love story aditya narayan revealed about his lovestory on indian idol set)