बॉलिवूडची सुप्रसिद्ध गायिका नेहा कक्करच्या (Neha Kakkar) लग्नाच्या बंधनात अडकणार आहे. याआधी तिच्या लग्नासंबंधी अनेक चर्चा रंगल्या होत्या. पण आता तिने लग्नाचा मुहूर्तही ठरवला असल्याचं बोललं जात आहे.
खरंतर, इंडियन आयडल या रिअॅलिटी शोमुळे नेहा आणि आदित्य नारायण हे दोघे एकमेकांच्या प्रेमात असून ते लग्न करणार असल्याची अफवा उठली होती.
आदित्य नारायणच्या आधीही हिमांश कोहली हे नाव नेहासोबत जोडलं गेलं होतं. नेहा आणि हिमांश अनेक दिवस एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये होते. पण नंतर त्यांचा ब्रेकअप झाला.
या सगळ्या चर्चेनंतर अखेर नेहाने लग्नाचा फायनल निर्णय घेतला असल्याचं सांगण्यात येत आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, रोहनप्रीत सिंग आणि नेहा लग्न करणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. या महिन्याच्या शेवटच्या अखेरीस त्यांचा विवाह होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. दोघांमध्येही लग्नाविषयी फायनल चर्चा झाली असल्याची माहितीही देण्यात आली आहे.
नेहाच्या होणारा नवरा म्हणजेच रोहनप्रीत सिंग सुरुवातीला शहनाज गिलच्या प्रेमात होता. पण सिद्धार्थ शुक्लाच्या एन्ट्रीमुळे हे प्रेम बंधन जुळता-जुळता राहिलं.
रोहनप्रीत सिंग ‘रायझिंग स्टार’ या गायन रियलिटी शोमध्ये पहिला रनरअप होता. तो शहनाज गिलच्या टीव्ही रिअॅलिटी शो ‘मुझसे शादी करोगे’ मध्येही चाहत्यांच्या पसंतीस उतरला होता.
अखेर रोहनने नेहासोबत लग्नगाठ बांधण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या हे दोघेही इंस्टाग्रामवर प्रेमाची कबूली देत अनेक पोस्ट शेअर करत आहेत.