Neha Kakkar : चर्चांना अखेर पूर्णविराम! ‘हे’ आहे नेहाच्या प्रेग्नेंसी पोस्टमागचं खरं वास्तव

नेहा कक्करनं आता तिच्या आगामी गाण्याचं पोस्टर रिलीज केलं आहे.(Neha Kakkar's New Song 'KhyaalRakhyaKar')

Neha Kakkar : चर्चांना अखेर पूर्णविराम! 'हे' आहे नेहाच्या प्रेग्नेंसी पोस्टमागचं खरं वास्तव
Follow us
| Updated on: Dec 19, 2020 | 3:08 PM

मुंबई : बॉलिवूड सिंगर नेहा कक्करनं काल (18 डिसेंबर) बेबी बंप फ्लॉन्ट करत पती रोहनप्रीतसोबत एक फोटो शेअर केला होता. त्यानंतर दोघांनावरही शुभेच्छांचा वर्षाव होऊ लागला. या फोटोसोबत नेहानं ‘ख्याल रखया कर’ असं कॅप्शन दिलं होतं. त्यामुळे नेहा आणि रोहनप्रीतच्या आयुष्यात नव्या पाहुण्याचं आगमन होणार आहे अशी चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली होती. मात्र आता या चर्चेला पूर्णविराम लागला आहे. नेहानं आता तिच्या आगामी गाण्याचं पोस्टर रिलीज केलं आहे. तर नेहा आता प्रेग्नेंट नसून फोटो शेअर करणं हे तिच्या ‘ख्याल रखया कर’या आगामी गाण्याचं प्रमोशन होतं. नेहाचं हे गाणं येत्या 22 डिसेंबरला रिलीज होणार आहे. (Neha Kakkar’s New Song ‘KhyaalRakhyaKar’)

‘ख्याल रखया कर हे नवं गाणं 22 डिसेंबरला येत आहे’ असं कॅप्शन देत तिनं हा फोटो शेअर केला आहे. गाण्याच्या प्रमोशनसाठी नेहानं पुन्हा एकदा चाहत्यांना वेडं केलं आहे. तिनं तिच्या आगामी गाण्याच्या प्रमोशनसाठी प्रेग्नेंसीच्या बातम्यांचा वापर केला आहे. नेहानं तिच्या आणि रोहनच्या लग्नाआधी असाच पब्लिसिटी स्टंट केला होता.’नेहू दा व्याह’ या गाण्यात दोघांचं लग्न दाखवण्यात आलं होतं. त्यानंतर दोघं खरच लग्नबंधनात अडकले.

या पब्लिसिटी स्टंटमुळे नेहाचे चाहते पुन्हा एकदा तिच्यावर चिडले आहेत. नेहाच्या या पोस्टवर भाष्य करत ते आपला संताप व्यक्त करत आहेत.

नेहा कक्कर आणि रोहनप्रीत या दोघांनी 24 ऑक्टोबरला दिल्लीत लग्न केलं. या लग्नातील प्रत्येक कार्यक्रम संस्मरणीय ठरला. लग्नानंतर नेहाचं तिच्या सासरच्या लोकांनी मोठ्या थाटामाटात स्वागत केलं होतं. नेहाच्या स्वागतासाठी रिसेप्शन आयोजित करण्यात आलं होतं. नेहा आणि रोहनच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच ट्रेंडमध्ये होते.

नेहा आणि रोहन यांनी ‘द कपिल शर्मा शो’मध्ये सांगितलं की हे दोघं ऑगस्ट 2020 मध्ये ‘नेहू दा व्याह’ या गाण्याच्या शूटिंगदरम्यान भेटले. त्यानंतर दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडले.

डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.