जेव्हा तो त्याच्या लग्नाबद्दल..; नील भट्टकडून अंकिता-विकीची पोलखोल

अंकिता आणि विकी हे सोशल मीडियावर एका व्हिडीओमुळे चर्चेत आले होते. विकीने अंकितावर हात उचलण्याचा प्रयत्न केला, असा आरोप नेटकऱ्यांनी तो व्हिडीओ पाहिल्यानंतर केला होता. आता घरातून बाहेर पडल्यानंतर नील भट्टने या दोघांच्या नात्याची पोलखोल केली आहे.

जेव्हा तो त्याच्या लग्नाबद्दल..; नील भट्टकडून अंकिता-विकीची पोलखोल
Neil Bhatt on Ankita and VickyImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jan 02, 2024 | 3:35 PM

मुंबई : 2 जानेवारी 2024 | ‘बिग बॉस 17’च्या घरात अंकिता लोखंडे आणि तिचा पती विकी जैनला सतत भांडताना पाहिलं गेलंय. अभिनेता नील भट्ट या शोमधून नुकताच बाहेर पडला. घराबाहेर आल्यानंतर दिलेल्या एका मुलाखतीत त्याने अंकिता-विकीच्या नात्याची पोलखोल केली आहे. विकीला नात्यांची कदर नाही, म्हणूनच त्या दोघांमध्ये सतत भांडणं होतात, असं नील म्हणाला. ‘बिग बॉस 17’च्या पहिल्या एपिसोडपासूनच अंकिता आणि विकी या दोघांमध्ये सतत खटके उडताना दिसत आहे. सोशल मीडियावर ही जोडी जरी एकमेकांबद्दल प्रेम व्यक्त करत असली तरी त्यांच्या नात्याची एक वेगळीच बाजू प्रेक्षकांना बिग बॉसच्या घरात पहायला मिळत आहे.

या मुलाखतीत नील म्हणाला, “विकी त्याच्या सोयीनुसार वागतो. त्याला कोणत्याचं गोष्टीची किंमत नाही. ना नात्यांची, ना कोणाच्या भावनांची. बिग बॉसच्या घरात विकीचं वागणं पाहून हे प्रत्येकाला समजतंय की तो अंकितापेक्षा वरचढ ठरण्याचा प्रयत्न करतोय. मी माझी पत्नी ऐश्वर्यासोबत कधीच असं वागलो नाही. आमच्यात नेहमीच समजुतदारपणा होता.” बिग बॉसच्या घरात विकी जेव्हा कधी लग्नाचा उल्लेख करायचा, तेव्हा स्वत:ला पीडित असं म्हणायचा, असंही नीलने सांगितलं.

“एखाद्याच्या लग्नावरून टिप्पणी करणे खूप चुकीचं आहे. विकीमध्ये खूप अहंकार आहे. अंकिताचा आवाज खूप मजबूत आहे. तर विकीचं व्यक्तीमत्त्व दबंगगिरी करणारं आहे. तो सतत दुसऱ्यांना हे दाखवू इच्छितो की मी जे काही बोलतोय ते सर्व योग्यच बोलतोय आणि तुम्ही सर्वजण माझी साथ द्या”, असंही नील पुढे म्हणाला. अंकिता लोखंडेनं डिसेंबर 2021 मध्ये बिझनेसमन विकी जैनशी लग्न केलं. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात दोघांनी बिग बॉसच्या घरात एण्ट्री केली.

हे सुद्धा वाचा

‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री अंकिता आणि तिचा पती विकी जैन या जोडीने बिग बॉसच्या घरात विशेष लक्ष वेधलं आहे. या जोडीचं सोशल मीडियावर एक रुप आणि बिग बॉसच्या घरात दुसरं रुप पाहून सर्वजण अवाक् झाले आहेत. दररोज अंकिता-विकीमध्ये कोणत्या ना कोणत्या कारणामुळे भांडणं होताना दिसतात. नुकत्याच पार पडलेल्या एपिसोडमध्ये अंकिताने विकीला थेट घटस्फोटाची धमकी दिली होती.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.