झगमगत्या विश्वात काम नसतानाही राखी सांवत हिच्याकडे कोट्यवधींची संपत्ती
बॉलिवूडपासून दूर असूनही राखी सावंत हिच्याकडे अफाट संपत्ती; ड्रामा क्विन कशी कमावते कोट्यवधींची माया, लग्नाआधी आदिल खान याने राखी सावंत हिला दिली महागडी गाडी
मुंबई : अभिनेत्री राखी सावंत कायम तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. गेल्या काही दिवसांपासून राखी बॉयफ्रेंड आदिल याच्यासोबत असलेल्या नात्यामुळे चर्चेत आली आहे. राखी हिने आदिलसोबत निकाह केल्याचे फोटो पोस्ट करत सर्वांना हैराण केलं. शिवाय मॉडेल आणि अभिनेत्री शार्लिन चोप्रा हिने केलेल्या गंभीर आरोपांमुळे राखी वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. तर दुसरीकडे राखीच्या आईंची प्रकृती देखील चिंताजनक आहे. राखीची आई गेल्या काही दिवसांपासून ब्रेन ट्यूमर या गंभीर आजाराचा सामना करत आहे.
सध्या राखीच्या आईवर रुग्णायलात उपचार सुरु आहेत. राखी आईसोबत देखील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. सोशल मीडियावर कायम सक्रिय असणाऱ्या राखीकडे बॉलिवूडमध्ये कोणतंही काम नाही, तरी देखील ड्रामा क्विन कोट्यवधींची माया कमावतेय.
रिपोर्टनुसार, राखी सावंत हिची नेटवर्थ ३७ कोटी रुपये आहे. शिवाय मुंबईत राखीचं स्वतःचं घर देखील आहे. शिवाय राखीकडे एक महागडी गाडी देखील आहे. ही महागडी गाडी राखीला आदिल खानने भेट म्हणून दिली आहे. शिवाय आदिल याने दुबईमध्ये स्वतःचा व्यवसाय देखील सुरु केल्याचा खुलासा राखीने केला होता.
राखी रिऍलिटी शोच्या माध्यमातून कमाई करते. बिग बॉस तर कधी डान्स शोमध्ये राखी सावंत दिसते. याच शोच्या माध्यमातून राखी कमाई करते. सोशल मीडियावर कायम सक्रिय असणारी राखी प्रचंड रॉयल आयुष्य जगते.
गेल्या काही दिवसांपासून आदिल खानसोबत लग्नाच्या चर्चांमुळे राखी चर्चेत आहे. लग्नानंतर राखीने इस्लाम धर्म कबूल केला आहे. इस्लाम धर्म कबूल करत राखी म्हणाली, आम्ही निकाह केला आहे. आदिलने माझं नाव आता फातिमा ठेवलं आहे. मी इस्लाम स्वीकराला आहे आणि या गोष्टीचा मी स्वीकर करते. माझं प्रेम मिळवता यावं म्हणून मला जे करता आलं ते मी केलं. माझ्या पतीला मिळवण्यासाठी मी सर्व काही केलं आहे. ‘ असं देखील राखी म्हणाली.