Netflix | गेल्या 25 वर्षांत या चित्रपटाच्या DVD ची सर्वाधिक मागणी; नेटफ्लिक्सकडून खुलासा

| Updated on: Oct 06, 2023 | 1:51 PM

बदलत्या काळानुसार मनोरंजनाची माध्यमंसुद्धा बदलत गेली. आधी कॅसेट्स, मग डीव्हीडी आणि आता ओटीटी प्लॅटफॉर्म्स.. या विविध पर्यायांचा अवलंब करून प्रेक्षकांनी आपली मनोरंजनाची भूक मिटवली. एकेकाळी चित्रपटांचे डीव्हीडी खूप मोठ्या प्रमाणावर भाड्याने दिले जायचे.

Netflix | गेल्या 25 वर्षांत या चित्रपटाच्या DVD ची सर्वाधिक मागणी; नेटफ्लिक्सकडून खुलासा
Netflix
Image Credit source: AFP
Follow us on

मुंबई | 6 ऑक्टोबर 2023 : ओटीटी प्लॅटफॉर्म अस्तित्त्वात येण्याच्या आधी चित्रपट किंवा शोज पाहण्यासाठी सर्वसामान्य लोकांकडे फारसे पर्याय उपलब्ध नव्हते. एखादा चित्रपट पाहायचा असेल तर त्यांना थिएटरमध्येच जावं लागायचं किंवा तो चित्रपट टीव्हीवर प्रदर्शित झाल्यावरच ते पाहू शकत होते. अशा जमान्यात डीव्हीडी (DVD) हा एकमात्र असा पर्याय होता, ज्यामुळे सर्वसामान्य लोकांना घरबसल्या त्यांचा आवडता चित्रपट पाहता येत होता. त्यामुळे आधी व्हिसीआरचे कॅसेट्स आणि त्यानंतर डीव्हीडीचा बिजनेस जोमात होता. फार क्वचित लोकांना हे माहीत असेल की, सध्याचा जगप्रसिद्ध ओटीटी प्लॅटफॉर्म ‘नेटफ्लिक्स’सुद्धा एकेकाळी डीव्हीडी भाड्यावर देण्याचा बिजनेस करायचा.

ओटीटी प्लॅटफॉर्मवर आपला जम बसवल्यानंतर यावर्षी 29 सप्टेंबर रोजी नेटफ्लिक्सने डीव्हीडी भाड्यावर देण्याचा बिझनेस बंद केला. गेल्या 25 वर्षांत नेटफ्लिक्सने तब्बल 5.2 अब्ज डीव्हीडी भाड्यावर दिले आहेत. खुद्द नेटफ्लिक्सने याविषयीची पोस्ट इंस्टाग्रामवर शेअर केली आहे. 1998 ते 2022 दरम्यान कोणकोणत्या चित्रपटांच्या डीव्हीडींची सर्वाधिक मागणी होती, याचीही माहिती नेटफ्लिक्सने या पोस्टमध्ये दिली आहे.

हे सुद्धा वाचा

कोणत्या चित्रपटांच्या DVD ची सर्वाधिक मागणी होती?

नेटफ्लिक्सने पोस्ट केलेल्या या यादीत बऱ्याच हॉलिवूड चित्रपटांची नावं आहेत. यामध्ये ‘इन्सेप्शन’ (Inception), ‘द लिंकॉन लॉयर’ (The Lincoln Lawyer), ‘द हंगर गेम’ (The Hunger Game), ‘कॅप्टन फिलिप्स’ (Captain Phillips), ‘द मॉन्यूमेंट्स मॅन’ (The Monuments Men), ‘सुली’ (Sully), ‘वंडर वुमन’ (Wonder Woman), ‘डन्कर्क’ (Dunkirk), ‘द बिग लेबॉस्की’ (The Big Lebowski), ‘ग्लॅडिएटर’ (Gladiator), ‘मेमेंटो’ (Memento), ‘द बॉर्न आयडेंटिटी’ (The Bourne Indentity), ‘मिस्टिक रिव्हर’ (Mystic River), ‘द नोटबुक’ (The Notebook), ‘क्रॅश’ (Crash), ‘द डिपार्टेड’ (The Departed), ‘द बकेट लिस्ट’ (The Bucket List), ‘द हर्ट लॉकर’ (The Hurt Locker), ‘द ब्लाइंड साइड’ (The Blind Side), ‘ग्रीन बुक’ (Green Book), ‘न्यूज ऑफ द वर्ल्ड’ (News Of The World) आणि ‘नो टाइम टू डाय’ (No Time To Die) यांचा समावेश आहे.