IIFA 2023 | अभिषेक बच्चन-विकी कौशलला एकत्र पाहून भन्नाट कमेंट्स; म्हणाले ‘सलमान कोपऱ्यात रडत..’

'सलमान खान एका कोपऱ्यात बसून रडत असेल', असं एकाने लिहिलंय. तर 'सलमान खान एका कोपऱ्यात बसून हसत असेल', असं दुसऱ्याने म्हटलंय. 'दोघंही सलमान खानचे शत्रू आहेत' असंही नेटकऱ्यांनी कमेंटमध्ये लिहिलं आहे.

IIFA 2023 | अभिषेक बच्चन-विकी कौशलला एकत्र पाहून भन्नाट कमेंट्स; म्हणाले 'सलमान कोपऱ्यात रडत..'
Abhishek Bachchan Vicky Kaushal and Salman KhanImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: May 26, 2023 | 3:34 PM

अबू धाबी : इंटरनॅशनल इंडियन फिल्म अकॅडमी अवॉर्ड्स (IIFA) लवकरच अबू धाबीच्या यास आयलँड याठिकाणी पार पडणार आहे. यासाठी बॉलिवूडमधील बरेच सेलिब्रिटी अबू धाबीला पोहोचले आहेत. 27 मे रोजी पुरस्कार सोहळा पार पडणार असून त्यापूर्वी 25 मे रोजी आयोजकांनी पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं. या पत्रकार परिषदेला सलमान खान, अभिषेक बच्चन, विकी कौशल, फराह खान, राजकुमार राव, नोरा फतेही, रकुल प्रीत सिंह, अमित त्रिवेदी, सुनिधी चौहान यांसारख्या सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. फराह खान आणि राजकुमार राव हे शुक्रवारी पार पडणाऱ्या IIFA रॉक्स या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणार आहेत. तर अभिषेक बच्चन आणि विकी कौशल हे शनिवारी मूळ पुरस्कार सोहळ्याचं सूत्रसंचालन करतील.

सध्या सोशल मीडियावर अभिषेक आणि विकीचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. यामध्ये दोघं फोटोग्राफर्स आणि माध्यमांसमोर एकत्र पोझ देताना दिसत आहेत. या दोघांना एकत्र पाहून नेटकऱ्यांनी भन्नाट कमेंट्सचा वर्षाव केला आहे. कारण अभिषेकची पत्नी ऐश्वर्या राय बच्चन एकेकाळी सलमान खानला डेट करायची. तर विकी कौशलची पत्नी कतरिना कैफचंही नातं सलमानसोबत जोडलं गेलं होतं. म्हणूनच ऐश्वर्या आणि कतरिनाच्या पतींना एकत्र पाहून नेटकऱ्यांना सलमान खानची आठवण झाली आहे.

हे सुद्धा वाचा

‘सलमान खान एका कोपऱ्यात बसून रडत असेल’, असं एकाने लिहिलंय. तर ‘सलमान खान एका कोपऱ्यात बसून हसत असेल’, असं दुसऱ्याने म्हटलंय. ‘दोघंही सलमान खानचे शत्रू आहेत’ असंही नेटकऱ्यांनी कमेंटमध्ये लिहिलं आहे. काहींनी तर सलमानचा रडणारा GIF पोस्ट केला आहे. दरम्यान सोशल मीडियावर आणखी एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये सलमान खान विकी कौशलला साफ दुर्लक्ष करताना दिसतोय.

पहा व्हिडीओ

या व्हायरल व्हिडीओमध्ये विकी कौशल सलमानपासून थोडा लांब उभा असल्याचं पहायला मिळत आहे. कारण सलमान त्याच्या बॉडीगार्ड्ससोबत एण्ट्री करत असतो. जसजसा सलमान जवळ येतो, तेव्हा विकी त्याच्याकडे हात पुढे करताना दिसतो. मात्र बॉडीगार्ड्सपैकी एक जण विकीला सलमानपासून दूर ढकलतो. सलमानसुद्धा विकीसमोर त्याचा हात पुढे न करता फक्त त्याच्याकडे पाहून पुढे निघून जातो. यानंतर विकीच्या चेहऱ्यावरील हावभाव स्पष्ट पहायला मिळतात. तरीसुद्धा तो दुसऱ्यांदा सलमानशी हात मिळवण्याचा प्रयत्न करतो, तेव्हासुद्धा सलमान त्याच्याकडे दुर्लक्ष करून निघून जातो.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होताच नेटकरी राग व्यक्त करत आहेत. विकीला सर्वसामान्यांप्रमाणे सलमानपासून दूर ढकललं गेलं, असं काहींनी लिहिलं आहे. तर कतरिनामुळे सलमान आणि विकी यांच्या नात्यात कटुता आल्याचं काहींनी म्हटलंय.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.