Bobby Deol | ‘वहिनीसाहेब आतासुद्धा 22 वर्षांच्या वाटतात’; बॉबी देओलचा पत्नीसोबत व्हिडीओ व्हायरल

लग्नाआधी बॉबी देओलचं नाव अभिनेत्री नीलम कोठारीशी जोडलं गेलं होतं. हे दोघं जवळपास पाच वर्षे एकमेकांना डेट करत होते. पण धर्मेंद्र यांना दोघांचं नातं मान्य नव्हतं. ते बॉबी आणि नीलम यांच्या नात्याच्या विरोधात होते.

Bobby Deol | 'वहिनीसाहेब आतासुद्धा 22 वर्षांच्या वाटतात'; बॉबी देओलचा पत्नीसोबत व्हिडीओ व्हायरल
Bobby Deol and Tanya DeolImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jun 30, 2023 | 12:08 PM

मुंबई : अभिनेता बॉबी देओलने इंडस्ट्रीत एक काळ गाजवला. त्याचा चाहतावर्ग आजही कायम आहे. चित्रपटांनंतर बॉबीने वेब विश्वातही आपली छाप सोडली आहे. ‘आश्रम’सारख्या सीरिजमध्ये त्याने दमदार काम केलं. नुकताच बॉबी त्याच्या पत्नीसोबत डिनर डेटवर गेला होता. यावेळी पापाराझींनी या दोघांना पाहिलं आणि त्यांचे फोटो क्लिक केले. डिनर डेटसाठी बॉबी आणि त्याची पत्नी तान्या देओलचा पोशाख पाहून नेटकरी थक्क झाले. वांद्रेमधल्या एका रेस्टॉरंटमध्ये जेव्हा ही जोडी पोहोचली तेव्हा हे दोघं जणू कॉलेजमधील कपलसारखेच दिसत होते.

बॉबी देओलने यावेळी ब्लॅक वेस्ट आणि ब्ल्यू रिप्ड जीन्स घातली होती. तर तान्याने डबल लेयर्ड टॉप आणि ब्ल्यू स्कर्ट घातला होता. विशेष म्हणजे यावेळी तान्याचा लूक पाहून नेटकऱ्यांनी आश्चर्य व्यक्त केलं. एका क्षणासाठी बॉबीसोबत त्याची पत्नी नव्हे तर मुलगीच आहे, असं वाटल्याचं नेटकरी म्हणाले. या दोघांच्या फॅशन सेन्सबद्दलही अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत.

हे सुद्धा वाचा

‘ओह माय गॉड, ही पत्नी आहे का? मला वाटलं मुलगी आहे’, असं एकाने लिहिलं. तर ‘बॉबी देओलची पत्नी आताही 20 वर्षांचीच वाटतेय’, असं दुसऱ्याने म्हटलंय. बॉबी आणि तान्याची लव्ह-स्टोरी 1990 मध्ये सुरू झाली. ओळखीच्या मित्रांद्वारे या दोघांची पहिली भेट झाली होती. पहिल्या भेटीतच दोघांमध्ये चांगली मैत्री झाली. अखेर 30 मे 1996 रोजी दोघांनी लग्नगाठ बांधली. बॉबी देओलप्रमाणे तान्या फिल्म इंडस्ट्रीतून नाही. ती इंटेरिअर डिझायनर आहे. या दोघांना आर्यमान आणि धरम देओल ही दोन मुलं आहेत. बॉबी देओल हा धर्मेंद्र आणि त्यांची पत्नी पहिली पत्नी प्रकाश कौर यांचा मुलगा आहे.

लग्नाआधी बॉबी देओलचं नाव अभिनेत्री नीलम कोठारीशी जोडलं गेलं होतं. हे दोघं जवळपास पाच वर्षे एकमेकांना डेट करत होते. पण धर्मेंद्र यांना दोघांचं नातं मान्य नव्हतं. ते बॉबी आणि नीलम यांच्या नात्याच्या विरोधात होते. बॉलिवूडमधील अभिनेत्रीसोबत बॉबीने लग्न केल्याचं धर्मेंद्र यांना मान्य नव्हतं असं सांगण्यात येतं.

बॉबीने करिअरची सुरुवात लहानपणापासूनच केली. ‘धर्मवीर’ चित्रपटात त्याने बालकलाकार म्हणून भूमिका पार पाडली. त्यानंतर बॉबीने ‘बरसात’मधून मुख्य अभिनेता म्हणून इंडस्ट्रीत पदार्पण केलं. ‘सोल्जर’, ‘बादल’, ‘बिच्छू’, ‘हमराज’ आणि ‘अजनबी’ यांसारख्या चित्रपटांमधील त्याच्या भूमिका विशेष गाजल्या.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.