म्हणजे नक्कीच घटस्फोट झालाय..; ‘केबीसी’मधील तो व्हिडीओ पाहून ऐश्वर्या-अभिषेकच्या नात्याविषयी चर्चांना उधाण

गेल्या काही महिन्यांपासून ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आलं आहे. आता नुकत्याच पार पडलेल्या 'केबीसी'च्या एपिसोडनंतर पुन्हा एकदा या घटस्फोटाची चर्चा होऊ लागली आहे.

म्हणजे नक्कीच घटस्फोट झालाय..; 'केबीसी'मधील तो व्हिडीओ पाहून ऐश्वर्या-अभिषेकच्या नात्याविषयी चर्चांना उधाण
अमिताभ बच्चन, ऐश्वर्या राय, अभिषेक बच्चनImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Oct 14, 2024 | 9:03 AM

बॉलिवूडचे महानायक अर्थात अभिनेते अमिताभ बच्चन यांनी 11 ऑक्टोबर रोजी 82 वा वाढदिवस साजरा केला. गेल्या अनेक वर्षांप्रमाणे यावर्षीही ‘कौन बनेगा करोडपती’च्या सेटवर बिग बींचा वाढदिवस साजरा करण्यात आला. या एपिसोडमध्ये आमिर खान आणि त्याचा मुलगा जुनैद हे दोघं खास पाहुणे म्हणून उपस्थित होते. या एपिसोडमध्ये बिग बी आणि प्रेक्षकांना एक व्हिडीओ दाखवण्यात आला. या व्हिडीओमध्ये बच्चन कुटुंबीयसुद्धा त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना दिसले. पत्नी जया बच्चन, मुलगी श्वेता बच्चन नंदा, मुलगा अभिषेक बच्चन, नातू अगस्त्य नंदा आणि नात नव्या नवेली नंदा हे सर्वजण या व्हिडीओमध्ये बिग बींना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना दिसले. यासोबतच नात आराध्याचेही काही फोटो त्यात दाखवण्यात आले. मात्र या सर्वांत बिग बींची सून ऐश्वर्या राय कुठेच दिसली नाही. त्यामुळे पुन्हा एकदा अभिषेक आणि ऐश्वर्याच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आलं आहे.

‘केबीसी’मध्ये दाखवलेल्या व्हिडीओत जरी ऐश्वर्या दिसली नसली तरी तिने सोशल मीडियाद्वारे त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ऐश्वर्याने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आराध्यासोबतचा बिग बींचा फोटो शेअर केला. त्यावर तिने लिहिलं, ‘वाढदिवसाच्या शुभेच्छा पा-दादाजी.’ ऐश्वर्याची ही पोस्ट ‘रेडिट’वर व्हायरल झाली. त्यावर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘केबीसी’मधील बिग बींच्या बर्थडे सेलिब्रेशनमधून ऐश्वर्याला का वगळण्यात आलं, असा सवाल नेटकऱ्यांनी केला आहे.

हे सुद्धा वाचा

एका युजरने लिहिलं, ‘जर कोणी आजचा केबीसीचा एपिसोड पाहिला असेल तर त्यातून ऐश्वर्या-अभिषेकचा घटस्फोट झाल्याचं स्पष्टपणे जाणवतंय. केबीसीमध्ये हे सिद्ध झालंय. बिग बींना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणाऱ्या प्रत्येकाचा क्लिप दाखवण्यात आला, पण त्यात ऐश्वर्या कुठेच नव्हती. नव्या, अगस्त्य यांनीसुद्धा शुभेच्छा दिल्या, पण आराध्याचे फक्त फोटो दाखवण्यात आले. ऐश्वर्याचं तर कुठे नावंसुद्धा नव्हतं. जर गोष्टी ठीक असत्या तर त्यांनी त्यांच्या सुनेला अशा पद्धतीने वगळलं नसतं.’

अभिषेक आणि ऐश्वर्याने 2007 मध्ये लग्नगाठ बांधली. त्यानंतर 2011 मध्ये ऐश्वर्याने मुलीला जन्म दिला. गेल्या काही महिन्यांपासून या दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आलं आहे. मात्र त्यावर अद्याप कोणीच प्रतिक्रिया दिली नाही. ऐश्वर्या आणि अभिषेकला बऱ्याच काळापासून एकत्र पाहिलं गेलं नाही. अंबानींच्या लग्नालाही ते दोघं वेगवेगळे आले, म्हणून या चर्चांना आणखी हवा मिळाली.

बाबा सिद्दीकींसह झिशान यांच्याही हत्येचा होता कट, आरोपींची मोठी कबुली
बाबा सिद्दीकींसह झिशान यांच्याही हत्येचा होता कट, आरोपींची मोठी कबुली.
राज ठाकरे राजकीय सस्तन प्राणी, जे साडेचार वर्षे..अंधारेंची बोचरी टीका
राज ठाकरे राजकीय सस्तन प्राणी, जे साडेचार वर्षे..अंधारेंची बोचरी टीका.
आचारसंहितेपूर्वी मंत्रिमंडळ बैठकीत निर्णयाचा धडाका, 19 निर्णय जारी
आचारसंहितेपूर्वी मंत्रिमंडळ बैठकीत निर्णयाचा धडाका, 19 निर्णय जारी.
सरकारकडून टोलमाफी अन् राज ठाकरे म्हणाले, 'ही आनंदाची बाब, पण फक्त...'
सरकारकडून टोलमाफी अन् राज ठाकरे म्हणाले, 'ही आनंदाची बाब, पण फक्त...'.
सरकारकडून टोलमाफी अन् मनसेचा एकच जल्लोष; अविनाश जाधव म्हणाले...
सरकारकडून टोलमाफी अन् मनसेचा एकच जल्लोष; अविनाश जाधव म्हणाले....
सिद्दीकींच्या हत्येमागे बिश्नोई गँग? 'जो सलमान-दाऊद की हेल्प करेगा...'
सिद्दीकींच्या हत्येमागे बिश्नोई गँग? 'जो सलमान-दाऊद की हेल्प करेगा...'.
शिंदे सरकारचा मोठा निर्णय, मुंबईतील 'या' टोलनाक्यांवर आजपासून टोलमाफी
शिंदे सरकारचा मोठा निर्णय, मुंबईतील 'या' टोलनाक्यांवर आजपासून टोलमाफी.
शिंदे सरकारची मोठी घोषणा, आज रात्रीपासून 'या' वाहनांना टोलमाफी
शिंदे सरकारची मोठी घोषणा, आज रात्रीपासून 'या' वाहनांना टोलमाफी.
मराठा कार्यकर्ते अन् भुजबळ समर्थक आमने-सामने, 44 जणांवर गुन्हा दाखल
मराठा कार्यकर्ते अन् भुजबळ समर्थक आमने-सामने, 44 जणांवर गुन्हा दाखल.
सिद्दिकींची भर पावसात अंत्ययात्रा, झिशानच्या डोळ्यात अश्रू, दुःख अनावर
सिद्दिकींची भर पावसात अंत्ययात्रा, झिशानच्या डोळ्यात अश्रू, दुःख अनावर.