मुंबईलाही गेला नाही, दिल्लीतही पोहोचला नाही, बँक खात्यातून पैश्याचा व्यवहार; प्रसिद्ध अभिनेत्यांचं झालं तरी काय?
Actor Life | प्रसिद्ध अभिनेत्याचं अपहरण झाल्याची शक्यता, संशयास्पद पैशांचे व्यवहार... गेल्या चार दिवसांपासून बेपत्ता असलेल्या अभिनेत्याचं झालं तरी काय? सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेत्याची चर्चा... वडिलांनी पोलिसांत दाखल केली तक्रार...
‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मालिकेमध्ये रोशन सिंग सोढी ही भूमिका साकारत चाहत्यांच्या मनावर राज्य करणारा अभिनेता गुरुचरण सिंग गेल्या चार दिवसांपासून बेपत्ता आहे. 22 एप्रिल पासून अभिनेता बेपत्ता आहे. गुरुचरण सिंग त्याच्या वडिलांच्या घरी दिल्ली येथे गेला होता. दिल्लीहून अभिनेता मुंबईत येणार होता. पण अभिनेता मुंबईत पोहोचला नाही. अभिनेत्याचा फोन देखील बंद असल्यामुळे गुरुचरण सिंग याच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी देखील अपहरणाची तक्रार दाखल करुन घेतली आहे.
याप्रकरणी पोलीस कसून चौकशी करत आहेत. पोलिसांच्या हाती सीसीटीव्ही फुटेज लागले आहेत. ज्यामुळे अभिनेत्याचं अपहरण झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गुरुचरण सिंग 22 एप्रिल रोजी सकाळी दिल्लीहून मुंबईच्या दिशेने निघाला होता. सकाळी 8.30 वाजता अभिनेत्याचा विमान होता. पण अभिनेत्याने विमानातून प्रवास केलाच नसल्याची माहिती समोर येत आहे.
गुरुचरण सिंग याच्यासोबत कोणाचाही संपर्क होत नसल्यामुळे अभिनेत्याच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांच्या हाती सीसीटीव्ही फुटेज लागल्या आहेत. शिवाय अभिनेत्याचे बँकेचे व्यवहार देखील समोर आले आहेत. यामध्ये पोलिसांना पैशांचे संशयास्पद व्यवहार झाल्याची माहिती मिळत आहे. मिळालेल्या माहितीनंतर अभिनेत्याचं अपहरण झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मालिकेतील रोशन सिंग सोढी म्हणजे अभिनेता गुरुचरण सिंग बेपत्ता असल्याची माहिती समोर आल्यानंतर सर्वत्र खळबळ माजली आहे. अभिनेत्याने मालिकेच्या माध्यमातून चाहत्यांचं मनोरंजन केलं. अभिनेत्याच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेता कायम सोशल मीडियावर देखील सक्रिय असायता. पण अभिनेत्याने मालिका सोडल्यानंतर चाहते निराश झाले होते.
मालिकेत काम केल्यानंतर मानधन उशिराने मिळत असल्यामुळे गुरुचरण सिंग याने मालिका सोडण्याचा निर्णय घेतला… अशी चर्चा चाहत्यांमध्ये सुरु होती. पण एका मुलाखतीत खुद्द अभिनेत्याने मालिका सोडण्याचं कारण सांगितलं होतं. मी जेव्हा मालिका सोडली तेव्हा माझ्या वडिलांची शस्त्रक्रिया होणार होती. काही गोष्टी होत्या, ज्याबद्दल बोलायचं नाही, अशी प्रतिक्रिया गुरुचरण सिंग याने दिली होती.