AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘BookMyShow’ ने सुरु केली व्हिडिओ ऑन डिमांड सर्व्हिस

'BookMyShow' ने सुरु केली व्हिडिओ ऑन डिमांड सर्व्हिस, आता खरेदी करुन किंवा भाड्याने पाहता येणार चित्रपट(new service of book my show for users)

'BookMyShow' ने सुरु केली व्हिडिओ ऑन डिमांड सर्व्हिस
'BookMyShow' ची डिमांड ऑन सर्व्हिस
Follow us
| Updated on: Feb 08, 2021 | 4:33 PM

मुंबई : ऑनलाईन मुव्ही तिकिटची बुकिंग सर्व्हिस देणाऱ्या ‘बुक माय शो’ ने प्रेक्षकांसाठी एक नवी सर्विस उपलब्ध केली आहे. बुक माय शो वर आता ‘बुक माय शो स्ट्रीम’ ही सर्व्हिस प्रेक्षकांसाठी उपलब्ध झाली आहे. या सर्व्हिसला ट्रान्जेक्शनल व्हिडिओ ऑन डिमांड (TVOD) नाव देण्यात आले आहे. युजर्स आता बुक माय शो च्या अॅपवर ऑन-डिमांड मुव्हिज पाहू शकतात. या सर्व्हिसमध्ये युजर्सला चित्रपट खरेदी आणि भाड्याने घेण्याचा पर्याय असेल. प्रत्येक चित्रपटाचा खरेदी आणि भाडे दर वेगवेगळा असेल.(new demand service of book my show for users)

काय विशेष आहे या सर्व्हिसमध्ये?

कोरोनामुळे जे लोक चित्रपटगृहात जाण्यास टाळत आहेत त्यांच्यासाठी ही सुविधा लाभदायी ठरणार आहे. सुरुवातीलाच 72 हजार तासांहून अधिक कंटेन्ट आणि 600 हून अधिक चित्रपट या सर्व्हिसमध्ये उपलब्ध आहे. याव्यतिरिक्त दर शुक्रवारी युजर्ससाठी प्रीमियम कंटेन्ट देण्यात येईल. बुक माय शो चे स्ट्रिम सबस्क्रिप्शन्स बेस्ड मॉडेल नेटफ्लिक्स आणि प्राईम व्हिडिओ सारख्या प्लॅटफॉर्महून खूपच वेगळे आहे. युजर्स प्लॅटफॉर्मवर उपलब्ध कंटेन्ट ऑनलाईनच भाड्याने किंवा खरेदी करु शकतो.

बुक माय शो वर नेटफ्लिक्स आणि अमेझॉन प्राईम व्हिडिओ प्रमाणे अनेक भाषांमध्ये चित्रपट उपलब्ध आहेत. सध्या ‘बुक माय शो स्ट्रीम’वर उपलब्ध चित्रपटांच्या यादीत क्रिस्टोफर नोलनचा ‘टेनट’ या वार्नर ब्रदर्सचा ‘वंडर वुमन 1984’, द गिल्टी, पोर्ट्रेट ऑफ ए लेडी ऑन फायर, आंखों देखी, आराधना (1969) आदी ब्लॉकबस्टर चित्रपटांचा समावेश आहे.

कशी आहे चित्रपट खरेदी भाड्याने घेण्याची प्रक्रिया?

तुम्हाला bookmyshow चे अॅप डाऊनलोड करा किंवा ब्राऊझरमध्ये bookmyshow ची वेबसाईट ओपन करा. आता तुम्हाला रजिस्ट्रेशन करावे लागेल. यासाठी तुम्ही तुमचा मोबाईल क्रमांक किंवा जीमेल, फेसबुकच्या मदतीने साईन इन करु शकता. मुव्ही कॅटेगरीमध्ये जाऊन जी मुव्ही एक्सेस करायची आहे त्याच्यावर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुम्हा बाय किंवा रेंटचा पर्याय निवडावा लागेल. आता कोणताही एक पर्याय निवडा आणि पुढे जा. तुमचा फोन नंबर आणि ई-मेलची डिटेल विचारली जाईल. यानंतर तुम्हाला पेमेंट ऑप्शन दिसेल. पेमेंट पूर्ण झाल्यानंतर तुम्ही बुक माय शो वर सेलेक्ट केलेला चित्रपट पाहू शकता.(new demand service of book my show for users)

इतर बातम्या

शेतकरी आंदोलनावरून प्रियांकाला टोला आता मियाच होतीये ट्रोल, वाचा काय झाल!

कपिल शर्मा शो बंद होताच स्टार प्लसचा ‘कॉमेडी अड्डा’, रणवीर सिंह सारख्या अनेक दिग्गजांची मांदियाळी

(new demand service of book my show for users)

खासदार घाबरले, पंतप्रधानही गायब झाले; पाकिस्तानी नेत्यांमध्ये भीती
खासदार घाबरले, पंतप्रधानही गायब झाले; पाकिस्तानी नेत्यांमध्ये भीती.
वैद्यकीय महाविद्यालयाला अहिल्यादेवी होळकरांचं नाव देणार - मुख्यमंत्री
वैद्यकीय महाविद्यालयाला अहिल्यादेवी होळकरांचं नाव देणार - मुख्यमंत्री.
हल्ल्यापूर्वी अलर्ट दिला होता, म्हणून मोदींनी... काँग्रेसचा मोठा दावा
हल्ल्यापूर्वी अलर्ट दिला होता, म्हणून मोदींनी... काँग्रेसचा मोठा दावा.
वैभवी देशमुख वाढदिवशी वडिलांच्या आठवणीने भावुक
वैभवी देशमुख वाढदिवशी वडिलांच्या आठवणीने भावुक.
रत्नागिरीच्या खोल समुद्रात होणार मॉक ड्रिल, बघा कशी सुरुये तयारी?
रत्नागिरीच्या खोल समुद्रात होणार मॉक ड्रिल, बघा कशी सुरुये तयारी?.
हल्ल्यानंतर ओवैसी पहिल्यांदा काश्मीरमध्ये; म्हणाले, 'भारत सरकारने ..'
हल्ल्यानंतर ओवैसी पहिल्यांदा काश्मीरमध्ये; म्हणाले, 'भारत सरकारने ..'.
युद्धाचं सावट, महाराष्ट्रातील ही 3 शहरं अतिसंवेदनशील, विशेष तयारी काय?
युद्धाचं सावट, महाराष्ट्रातील ही 3 शहरं अतिसंवेदनशील, विशेष तयारी काय?.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत राज्याला 'सुप्रीम' आदेश काय
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत राज्याला 'सुप्रीम' आदेश काय.
पंतप्रधान नरेंद्र मोदींची अजित डोवाल यांच्यासोबत महत्वाची बैठक
पंतप्रधान नरेंद्र मोदींची अजित डोवाल यांच्यासोबत महत्वाची बैठक.
अमरनाथ : बाबा बर्फानीचं घ्या पहिलं दर्शन, यंदा शिवलिंगांची उंची किती?
अमरनाथ : बाबा बर्फानीचं घ्या पहिलं दर्शन, यंदा शिवलिंगांची उंची किती?.