Mission Lion | अक्षय कुमारसोबत पुन्हा एकदा काम करण्यास दिग्दर्शक जगन शक्ती तयार, घेणार 4 कोटी मानधन!

मिशन मंगल हा चित्रपट अक्षय कुमारच्या (Akshay Kumar) कारकीर्दीतील सर्वात हिट चित्रपट ठरला आहे.

Mission Lion | अक्षय कुमारसोबत पुन्हा एकदा काम करण्यास दिग्दर्शक जगन शक्ती तयार, घेणार 4 कोटी मानधन!
Follow us
| Updated on: Jan 08, 2021 | 3:37 PM

मुंबई : मिशन मंगल हा चित्रपट अक्षय कुमारच्या (Akshay Kumar) कारकिर्दीतील सर्वात हिट चित्रपट ठरला आहे. जगन शक्तीने (Jagan Shakti) या चित्रपटाद्वारे दिग्दर्शनात पदार्पण केले आणि पहिल्याच चित्रपटाने सुमारे 200 कोटींची कमाई केली. आता एक नवीन बातमी समोर आली आहे ती म्हणजे जगन शक्ती पुन्हा एकदा अक्षय कुमारसोबत काम करणार आहे. त्यांच्या या चित्रपटाचे नावही समोर आले आहे. बॉलिवूड हंगामाच्या रिपोर्टनुसार, जगन शक्ती आणि अक्षय कुमारसोबत मिशन लायन नावाचा चित्रपट तयार करणार आहेत. (New film by Akshay Kumar and Jagan Shakti)

जगन शक्ती या चित्रपटासाठी चार कोटी रुपये फी घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मिशन मंगळच्या यशानंतर प्रत्येक निर्मात्याला जगन शक्तीसोबत काम करण्याची इच्छा आहे. माहिती अशी आहे की, अक्षय कुमारच्या मिशन लायन चित्रपटासाठी जगन शक्तीने होकार दिला आहे. आणि या चित्रपटासाठी त्याला चार कोटी रुपये फी देखील देण्यात येणार आहे. बेल बॉट चित्रपटाचे प्रोड्यूसर वाशु आणि जॅकी भगनानी या चित्रपटाची निर्मिती करणार आहेत.

या चित्रपटाचे शूटिंग 2021 मध्ये सुरू होणार आहे. येत्या काही दिवसात या चित्रपटाची घोषणा होण्याची शक्यता आहे. या चित्रपटासाठी अक्षय कुमारलाही मोठी फी दिली जात असल्याची बातमी आहे. याशिवाय तो या चित्रपटाचा प्रोडक्शन पार्टनरही असणार आहे.

अक्षय कुमार हिंदी चित्रपटसृष्टीचा सर्वात महाग सुपरस्टार बनला आहे. आता तो त्याच्या एका चित्रपटासाठी 135 कोटी शुल्क घेणार आहे. बॉलिवूड हंगामाच्या वृत्तानुसार, अक्षयने 2022 मध्ये प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांसाठी फी वाढविली आहे. 2020 च्या सुरूवातीस त्याने 102 कोटी शुल्क घेण्याची घोषणा केली होती. नंतर त्याने ते वाढवून 123 कोटी केले. कोरोनापूर्वी त्यांचा सूर्यवंशी हा चित्रपट रिलीज होण्यास तयार होता पण लॉकडाऊनमुळे तो चित्रपट प्रदर्शित होऊ शकला नाही.

संबंधित बातम्या : 

माझ्यावर अन्याय होतोय म्हणत कंगनाचा ‘नारीचा पाढा’, म्हणते, ‘देशहिताची गोष्ट बोलले की माझ्यावर टीका’

Photos | रिया चक्रवर्तीची मित्रांबरोबर पार्टी, दंगा आणि बरंच काही, सुशांतचे चाहते नाराज

(New film by Akshay Kumar and Jagan Shakti)

मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.