चित्रपट पाहून प्रेक्षकांना येतोय पॅनिक अटॅक; काहींनी काढला थिएटरमधून पळ, नेमकी काय आहे कथा?

हा अमेरिकन चित्रपट पाहिल्यानंतर लोकांमध्ये चांगलीच दहशत निर्माण झाली आहे. इतकंच नव्हे तर चित्रपट पाहिल्यापासून रात्री लाइट चालू ठेवून झोपावं लागतंय, अशीही तक्रार काही प्रेक्षकांनी केली आहे.

चित्रपट पाहून प्रेक्षकांना येतोय पॅनिक अटॅक; काहींनी काढला थिएटरमधून पळ, नेमकी काय आहे कथा?
The Outwaters Image Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Mar 24, 2023 | 1:56 PM

मुंबई : जगभरात हॉरर चित्रपटांची आवड असणारा एक वेगळाच गट आहे. अनेकांना थरारपट बघायला आवडतात. विशेषकरून थिएटरमध्ये जाऊन मोठ्या पडद्यावर आणि मोठ्या आवाजात हे हॉरर चित्रपट पाहण्याची एक वेगळीच मजा असते. मात्र एक असा हॉरर चित्रपट सध्या प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे, जो पाहिल्यानंतर भल्याभल्यांची तब्येत बिघडली आहे. काहींना पॅनिक अटॅक्स येत आहेत, तर काही जण चक्क उल्टी करण्यासाठी थिएटरबाहेर जात आहेत. यावरून हा चित्रपट किती भयानक असावा, याचा अंदाज तुम्ही लावू शकता. या चित्रपटाचं नाव आहे ‘द आऊटवॉटर्स’.

‘द आऊटवॉटर्स’ या चित्रपटाने प्रेक्षकांना इतकं बेचैन केलंय की काही जण चित्रपट पाहता पाहताच आजारी पडले आहेत. तर काही प्रेक्षक अर्ध्यावरूनच थिएटरमधून बाहेर पळून आले. या चित्रपटाची दहशत इतकी आहे की काही प्रेक्षकांना त्यांच्या मनगटावरील स्मार्ट वॉच बंद करावी लागली. कारण वाढलेली हार्ट रेट त्यावर दिसू लागली आणि त्यामुळे प्रेक्षकांना पॅनिक अटॅक येऊ लागला.

काय आहे चित्रपटाची कथा?

द आऊटवॉटर्स या चित्रपटात चार मित्रांचा एक ग्रुप मोझावे वाळवंटात एक म्युझिक व्हिडीओ बनवण्यासाठी जातात. मात्र त्याआधीच काही विचित्र घटना घडू लागतात. मेमरी कार्डद्वारे मिळालेल्या फुटेजद्वारे या घटनेला दाखवलं जातं. रॉबी बॅनफिचने हा चित्रपट बनवला आहे. हा चित्रपट पाहिल्यानंतर सोशल मीडियावर नेटकरी विविध प्रतिक्रिया देत आहेत.

हे सुद्धा वाचा

पहा ट्रेलर

हॉरर चित्रपट ‘द आऊटवॉटर्स’ पाहिल्यानंतर एका चाहत्याने लिहिलं, ‘मध्यांतरानंतर मला जणू पॅनिक अटॅक येईल की काय असंच वाटलं.’ तर दुसऱ्याने म्हटलं, ‘मला असं वाटतंय की मी अजूनही तो चित्रपट पाहतोय. त्या चित्रपटाच्या साऊंटने मला खूप बेचैन केलंय आणि त्यामुळे मी थिएटरबाहेर पडलो. मला उल्टी होईल की काय, असं वाटत होतं. माझ्यासोबत याआधी असं कधीच घडलं नव्हतं.’ काही युजर्सनी या चित्रपटाला आतापर्यंतचा सर्वोत्कृष्ट हॉरर चित्रपट असंही म्हटलंय.

हा अमेरिकन चित्रपट पाहिल्यानंतर लोकांमध्ये चांगलीच दहशत निर्माण झाली आहे. इतकंच नव्हे तर चित्रपट पाहिल्यापासून रात्री लाइट चालू ठेवून झोपावं लागतंय, अशीही तक्रार काही प्रेक्षकांनी केली आहे. हा चित्रपट 9 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झाला.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.