साऊथसारखाच थ्रील, अंगावर काटा आणणारी स्टोरी, ‘143 काळीज हाय आपलं’ चित्रपट 4 मार्चला प्रदर्शित होणार
'143... हे काळीज हाय आपलं' हा चित्रपट येत्या 4 मार्चला प्रदर्शित होणार आहे. मात्र त्याआधीच या चित्रपटाचा पोस्टर मागच्या दोन महिन्यांपासून सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय. योगेश भोसले दिग्दर्शित ' १४३ ' या फिल्ममधून प्रेक्षकांना एक आगळीवेगळी कथा मोठ्या पडद्यावर अनुभवायला मिळणार आहे.
मुंबई : ‘143… हे आपलं काळीज हाय’ हा चित्रपट येत्या 4 मार्चला प्रदर्शित होणार आहे. मात्र त्याआधीच या चित्रपटाचा पोस्टर मागच्या दोन महिन्यांपासून सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय. योगेश भोसले दिग्दर्शित ‘ १४३ ‘ या फिल्ममधून प्रेक्षकांना एक आगळीवेगळी कथा मोठ्या पडद्यावर अनुभवायला मिळणार आहे. मराठी चित्रपटात साऊथच्या चित्रपटासारखं भव्यदिव्य काही नसतं असा गैरसमज झालेल्यांनी १४३ बघायलाच हवा. एक्शन, लव्ह, रोमान्स आणि इमोशन यांनी १४३ परिपूर्ण असा चित्रपट येत्या ४ मार्चपासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.
143 मधे योगेश भोसले आणि शीतल अहीरराव ही प्रेमजोडी दिसणार आहे तर वृषभ शहा हा खलनायकी भूमिका वठवत असून त्याचं या मराठी चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण होत आहे. या चित्रपटात इतरही नामांकित कलाकार असणार आहेत. चित्रपटाला संगीत पी. शंकरम यांनी दिले असून लखन चौधरी व अमिताभ आर्य यांनी या चित्रपटातील गीते लिहिली आहेत. आनंद शिंदे, आर्या आंबेकर या गायकांनी या चित्रपटात गाणी गायली आहेत.
2022 मधे अनेक चांगले मराठी चित्रपट येत आहेत. अश्यातच 143 हा सिनेमाही प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज झाला आहे. हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल, असा चित्रपटाच्या टीमला विश्वास आहे.
‘143… हे काळीज हाय आपलं’ हा चित्रपट येत्या 4 मार्चला प्रदर्शित होतोय. त्यामुळे या चित्रपटाला प्रेक्षक कसा प्रतिसाद देतात, हे पाहणं महत्वाचं आहे.
संबंधित बातम्या