200 कोटींच्या खंडणी प्रकरणात निक्की तांबोळीबाबत धक्कादायक खुलासा

निकिता तांबोळी, चाहत खन्ना, सोफिया सिंग आणि अरुषा पाटील यांनी सुकेशची तुरुंगात भेट घेतली होती. सुकेशची सहकारी पिंकी इराणीच्या मार्फत त्यांनी दिल्लीच्या तिहार तुरुंगात त्याची भेट घेतली होती.

200 कोटींच्या खंडणी प्रकरणात निक्की तांबोळीबाबत धक्कादायक खुलासा
Nikki Tamboli, Sukesh Chandrashekhar and Chahat KhannaImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Sep 16, 2022 | 12:45 PM

सुकेश चंद्रशेखरच्या (Sukesh Chandrashekhar) मनी लाँड्ररिंग प्रकरणात आता टीव्ही अभिनेत्री निक्की तांबोळी (Nikki Tamboli) आणि चाहत खन्ना या दोघींचीही नावं समोर आली आहेत. ईडीने दाखल केलेल्या चार्जशीटनुसार, निक्कीला सुकेशकडून साडेतीन लाख रुपये रोख रक्कम आणि गुच्ची बॅग मिळाली होती. याप्रकरणी अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसचीही चौकशी झाली. तर गुरुवारी अभिनेत्री नोरा फतेहीसुद्धा चौकशीसाठी दिल्ली पोलिसांच्या EOW (इकोनॉमिक ऑफेन्स विंग) समोर हजर झाली होती.

निकिता तांबोळी, चाहत खन्ना, सोफिया सिंग आणि अरुषा पाटील यांनी सुकेशची तुरुंगात भेट घेतली होती. सुकेशची सहकारी पिंकी इराणीच्या मार्फत त्यांनी दिल्लीच्या तिहार तुरुंगात त्याची भेट घेतली होती.

“एप्रिल 2018 मध्ये पहिल्या भेटीदरम्यान आरोपी पिंकी इराणी हिला सुकेश चंद्रशेखरकडून 10 लाख रुपये रोख मिळाले होते. त्यापैकी तिने दीड लाख रुपये निक्की तांबोळीला दिले. तर दुसऱ्या प्रसंगी तिच्या पहिल्या भेटीच्या दोन ते तीन आठवड्यांनंतर ती सुकेशला भेटायला एकटी गेली. जिथे तिला सुकेश चंद्रशेखरने 2 लाख रुपये रोख आणि एक गुच्ची बॅग दिली,” असं अंमलबजावणी संचालनालयने (ED) आरोपपत्रात नमूद केलं आहे.

हे सुद्धा वाचा

याच प्रकरणात दिल्ली पोलिसांच्या EOW अधिकाऱ्यांनी जॅकलीनला समन्स बजावल्यानंतर गुरुवारी नोराची चौकशी करण्यात आली. ईडीच्या म्हणण्यानुसार नोरा आणि जॅकलिन या दोघींना सुकेशकडून कार आणि महागड्या भेटवस्तू मिळाल्या होत्या. मूळचा कर्नाटकातील बेंगळुरू इथला रहिवासी असलेला सुकेश सध्या दिल्लीच्या तुरुंगात आहे आणि त्याच्यावर 10 हून अधिक गुन्हे दाखल आहेत.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.