Bigg Boss 14 | निक्की तांबोळीने केला राहुल वैद्यवर गंभीर आरोप

| Updated on: Dec 05, 2020 | 12:06 PM

‘बिग बॉस 14’ चा महाअंतिम सोहळाजवळ आला असून शोमध्ये आपले स्थान बळकट ठेवण्यासाठी घरातील सदस्यांमध्ये स्पर्धा बघायला मिळत आहे. आता घरातील सदस्यांनी सिंगर राहुल वैद्यला टार्गेट केले आहे.

Bigg Boss 14 | निक्की तांबोळीने केला राहुल वैद्यवर गंभीर आरोप
Follow us on

मुंबई : ‘बिग बॉस 14’ चा महाअंतिम सोहळाजवळ आला असून शोमध्ये आपले स्थान बळकट ठेवण्यासाठी घरातील सदस्यांमध्ये स्पर्धा बघायला मिळत आहे. आता घरातील सदस्यांनी सिंगर राहुल वैद्यला टार्गेट केले आहे. एजाज खान, रुबीना दिलैक, निक्की तांबोळी, अभिनव शुक्ला आणि जास्मीन भसीन घरात राहून राहुलला चांगुलपणाचे धडे शिकविण्यात गुंतले आहेत. (Nikki Tamboli serious allegations against Rahul Vaidya)

निक्की तांबोळी राहुलची पोल खोलते

निक्कीने राहुलवर एक गंभीर आरोप लावला आहे ती म्हणते की, राहुल माझ्या पीआर टीममधील मुलीला फ्लर्ट करतो. यावर राहुल म्हणतो की, ही गोष्ट 3 ते 4 वर्ष जुनी आहे. राहुल महिलांचा सन्मान करत नाही त्याला महिलांसोबत कसे बोलायचे ते कळत नाही, असे रुबीना दिलैक म्हणाली. निक्की तांबोळी, एजाज खान आणि अभिनव शुक्ला यांनी राहुल महिलांचा सन्मान करत नसल्याचे म्हटले आहे. यावर राहुल वैद्य म्हणतो की, रुबीना दिलैक आणि निक्की तांबोळी यांच्याबद्दल माझा मनात कुठल्याच प्रकारचा आदर नाही. त्यांची ती लायकीच नाही. बाकी मी महिलांचा आदर करतो.

दरम्यान इजाज खान आणि अभिनव शुक्ला शोचे फायनलिस्ट बनले आहेत. बिग बॉसचा फिनाले लवकरच होणार आहे.तर ‘बिग बॉस 14’ मधील स्पर्धक कविता कौशिक सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकलेली आहे. काही दिवसांपूर्वीच कविता आणि एजाज खानच्या वादाची मोठ्या प्रमाणात चर्चा झाली. ही चर्चा संपत नाही तोच, आता तिचा रुबीनासोबत झालेला वाद चर्चेत आला. आता चक्क कविताच्या पतीनं बिग बॉसच्या एका स्पर्धकावर आरोप लावलेत. आश्चर्याची बाब म्हणजे आता हा स्पर्धक एजाज खान किंवा रुबीना नसून कुणी तरी दुसराच व्यक्ती आहे.

अभिनववर साधला निशाणा!
कविता कौशिकचा पती रोनितनं एक पोस्ट शेअर करत नव्या वादाला तोंड फोडलं आहे. त्याच्या या पोस्टमध्ये स्पष्टपणे कुणाचं नाव लिहिलेलं नसलं तरी ही पोस्ट अभिनव शुक्लाबद्दल लिहिली असल्याची चर्चा आहे. अभिनवमुळे कविताला बिग बॉसच्या घरातून बाहेर पडावं लागलं होतं आणि याच व्यक्तीबद्दल कवितानं फ्रेंड्स विथ बेनिफिटचीही गोष्ट बोलून दाखवली होती. आता रोनितच्या या पोस्टनंतर सोशल मीडियावर अभिनव शुक्ला आणि कविता कौशिकचे फॅन्स एकमेकांमध्ये वाद घालत आहेत.

ट्विटमध्ये नक्की काय ?
‘मला तुम्हाला इथं एक खरी गोष्ट सांगायची आहे. मी एका जंटलमनविषयी बोलत आहे जो सज्जन नाही. या व्यक्तीला मद्यपान करण्याची घाणेरडी सवय आहे. मद्यपान केल्यानंतर तो बर्‍याचदा रात्रीच्या वेळी कविताला मेसेज करतो आणि भेटण्याचा हट्ट करतो. त्याच्या या सवयीने त्रस्त झाल्यामुळे कविताला पोलिसांना बोलवावं लागलं’, असं ट्विट रोनितनं ट्विटरवर शेअर केलं आहे.

संबंधित बातम्या : 

Bigg Boss 14 | सलमान खानचा मोठा धमाका, पुढच्या आठवड्यात ‘बिग बॉस 14’चा महाअंतिम सोहळा?

Bigg Boss 14 | ‘इम्युनिटी स्टोन’साठी ‘बिग बॉस’च्या स्पर्धकांचे आयुष्य चव्हाट्यावर, नव्या रहस्यांनी प्रेक्षक स्तब्ध!

(Nikki Tamboli serious allegations against Rahul Vaidya)