Bigg Boss 16: स्पर्धकांच्या कुटुंबियांच्या निशाण्यावर प्रियंका; निमृतच्या वडिलांचं मोठं वक्तव्य
'बिग बॉस १६' च्या घरात प्रियंका चहार वादाच्या भोवऱ्यात, निमृतच्या वडिलांच्या वडिलांनी केली अभिनेत्रीवर गंभीर आरोप
Bigg Boss 16: ‘बिग बॉस १६’ शो दिवसागणिक अधिक रंगत आहे. घरातील खेळ, भांडणं, मैत्री यांच्या पलीकडे आता स्पर्धकांचे कुटुंबिय देखील घरातील सदस्यांवर आरोप करत आहेत. महत्त्वाचं सांगायचं म्हणजे, हा पहिलाच सीझन आहे, जेव्हा स्पर्धकांच्या पालकांना विकेंडच्या वारवर बोलावण्यात आलं आहे. विकेंडच्या वार दरम्यान अभिनेता सलमान खान पालकांना अनेक प्रश्न विचारताना दिसणार आहे. मेकर्सने शोचा नवा प्रोमो प्रदर्शित केला आहे. प्रोमो पाहिल्यानंतर विकेंडचा वार पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. सध्या शोचा प्रोमो तुफान व्हायरल होत आहे.
प्रोमोच्या सुरुवातीला सलमान खान अर्चना गौतम आणि एमसी स्टँनला फटकारताना दिसत आहे. एवढंच नाही, तर सलमान खान अर्चनाला बाहेर जाण्यासाठी देखील सांगतो. ज्यामुळे अर्चना आणि एमसी स्टँन यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. त्यानंतर सर्व स्पर्धकांच्या पालकांना सलमान प्रश्न विचारताना दिसत आहे.
Full Promo #BiggBoss16 | #BB16pic.twitter.com/nREA9ugJU3
— (@bb16_lf_updates) January 6, 2023
प्रोमोमध्ये सलमान विचारतो, तुमच्या मुलांना कोणापासून अधिक धोका आहे? यावर अनेकांच्या पालकांनी प्रियंका चहार हिच्यावर निशाणा साधला. निमृतचे वडील म्हणाले, ‘प्रियंकाने सुरुवातीपासून निमृतला टार्गेट केलं आहे…’ एवढंच नाही, तर शिव ठाकरेच्या आईने देखील प्रियंका आणि अर्चनाला निशाण्यावर धरलं आहे.
तर, दुसरीकडे अर्चनाचा भाऊ तिला पाठिंबा देताना दिसला. त्यामुळे शनिवारी विकेंडचा वार मजेदार होणार आहे. आजच्या शोमध्ये अनेक प्रश्न उपस्थित होणार आहेत. तर प्रोमो पाहिल्यानंतर प्रियंकाचे चाहते तिला सपोर्ट करताना दिसत आहे.
प्रियंकाला सपोर्ट करत चाहते म्हणतात, ‘प्रियंका निमृतला नाही, तर निमृत प्रियंकाला टार्गेट करत आहे.’ तर अन्य एक युजर म्हणतोय, ‘निमृतचे वडील दुसरा बिग बॉस बघत असतील…’ असं देखील म्हणत आहे.